पालम येथून गंगाखेडकडे भरधाव जाणाऱ्या टँकरच्या (क्र. एम.एच.०४/ जे. के .६२२७) चालकाने निष्काळजीपणे वाहन चालवून समोरून येणाऱ्या कारला (क्र.एम.एच.२२/ टी. १७७) उजव्या बाजूने जोराची धडक दिली. या अपघातात कारचे नुकसान झाले, तसेच कारचालक प्रा. मुंजाजी चोरघडे जखमी झाले. जखमी प्रा. मुंजाजी रंगनाथराव चोरघडे (रा. धारखेड, ता.पालम) यांनी ही माहिती गंगाखेड येथे फोनद्वारे निवृत्ती भडके व विष्णू मुरकुटे यांना दिली. भडके व मुरकुटे यांनी गंगाखेड शहरात हा टँकर थांबवून टँकरचालक संतोष ज्ञानोबा गुट्टे (रा. कासारवाडी, ता. परळी) याला ताब्यात घेऊन पालम येथे आणले. याप्रकरणी प्रा. मुंजाजी चोरघडे यांनी दिलेल्या फिर्यादीवरून पालम पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
भरधाव टँकरची कारला धडक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 3, 2021 04:18 IST