शहरं
Join us  
Trending Stories
1
"शरद पवारांनी बारामती उभी केली नसती, तर महाराष्ट्रात..."; संजय राऊतांचे रोखठोक विधान
2
'होर्मुझ'वरून तणाव वाढला! अमेरिका आजपासून करणार इराणची नाकेबंदी, सेंट्रल कमांडचा इशारा
3
UPI अ‍ॅप्समध्येही असतं का 'Undo' बटण, चुकीच्या UPI ID वर पैसे गेल्यास कसे मिळवाल परत?
4
प्रशासनाचा प्रस्ताव धुडकारला, वाहनांना लावली आग; नोएडात ३ दिवसांपासून रस्त्यावर का उतरले कर्मचारी?
5
Top Marathi News LIVE Updates: कल्याण- अहिल्यानगर महामार्गावर भीषण अपघात; ८ जण ठार झाल्याची माहिती
6
पिंपरी: धक्कादायक! प्राध्यापकाच्या छळामुळे विद्यार्थिनीने उचललं टोकाचं पाऊल, एकाला अटक
7
Aditya Dhar Net Worth: ‘धुरंधर’च्या दिग्दर्शकाकडे किती आहे संपत्ती? मुंबई ते हिमाचलपर्यंत आहे प्रॉपर्टी
8
Gold Silver Price Today: आज सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी घसरण; खरेदी करणार असाल तर पाहा तुमच्या शहरातील २४K, २२K, १८K Gold चे नवे दर
9
IPL 2026 Points Table : गत चॅम्पियन RCB टॉप ३ मध्ये; पाचवेळच्या विजेत्या MI अन् CSK ची अवस्था बिकट
10
CET Exam: 'सीईटी'ची केंद्रे दूर; विद्यार्थ्यांचे प्रचंड हाल, पालकांमध्ये तीव्र नाराजी
11
धर्मांतर प्रयत्नप्रकरणी नाशिकमधील 'त्या' बहुराष्ट्रीय कंपनीतील आरोपी निलंबित
12
गोकूळमध्ये गैरप्रकार? शिवाजीराव पाटलांच्या आरोपांवर हसन मुश्रीफ यांचं स्पष्टीकरण
13
ABMCM: अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळाच्या बचावासाठी सरसावले चित्रपट व्यावसायिक
14
Asha Bhosle: सूरसम्राज्ञी आशा भोसलेंचा पहिला नमस्कार अंबाबाईला.. दुसरा सरस्वतीला
15
Kolhapur: 'केडीसीसी'ची खुर्ची एवढी वजनदार, की कर्मचाऱ्यांना दहा वर्षे सोडवेना
16
वेतनवाढीच्या मागणीवरून कामगार आक्रमक; वाहनांची तोडफोड आणि दगडफेक, नोएडातील घटना!
17
ट्रम्प यांच्या धमकीनंतर शेअर बाजारात भूकंप; सेन्सेक्स १४०० अंकांनी आपटला; निफ्टी २४ हजारांच्या खाली
18
सिंधुदुर्ग जिल्ह्यात ग्रामपंचायतीच्या १००हून अधिक रिक्त जागांसाठी पोटनिवडणुकीची नोटीस जारी
19
SBI Home Loan: स्टेट बँकेतून ५० लाख रुपयांचं होम लोन घ्यायचंय; पाहा किती असावी लागेल सॅलरी?
20
IPL 2026: भर मैदानात टिम डेव्हिडची ‘दादागिरी’! पंचांच्या हातून चेंडू हिसकावला अन्...; पाहा नेमकं काय घडलं?
Daily Top 2Weekly Top 5

मातीची झीज थांबविण्यासाठी बांबू फायदेशीर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 6, 2021 04:29 IST

परभणी : पावसामुळे मातीची होणारी झीज थांबविण्यासाठी बांबूची लागवड खूप फायदेशीर असून, जिल्ह्यातील गोदाकाठच्या व नदी, नाले, ओढ्याच्या दोन्ही ...

परभणी : पावसामुळे मातीची होणारी झीज थांबविण्यासाठी बांबूची लागवड खूप फायदेशीर असून, जिल्ह्यातील गोदाकाठच्या व नदी, नाले, ओढ्याच्या दोन्ही बाजूस बांबू लागवड केल्यास पर्यावरणाचा ऱ्हास रोखता येईल, असे मत राज्य कृषी मूल्य आयोगाचे अध्यक्ष पाशा पटेल यांनी व्यक्त केले.

येथील जिल्हाधिकारी कार्यालयातील सभागृहात ४ फेब्रुवारी रोजी बांबू लागवडीसंदर्भात बैठक घेण्यात आली. यावेळी ते बोलत होते. यावेळी जिल्हाधिकारी दीपक मुगळीकर, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी शिवानंद टाकसाळे, जिल्हा पुरवठा अधिकारी मंजूषा मुथा, आदींची प्रमुख उपस्थिती होती.

पटेल म्हणाले, गोदावरी व मांजरा खोऱ्यात ११ उपनद्या असून, त्यांची लांबी २२५० कि.मी. आहे. या किनाऱ्यावर ४ हजार हेक्टरवर बांबू लागवड करावयाची आहे. नॅशनल बांबू मिशन अंतर्गत बांबूचे रोप वाटप केले जाणार असल्याचे त्यांनी सांगितले. ‘नदी झांकी तो जल राखी’ असा हा उपक्रम आहे. बांबूचे झाड कार्बन घेणारे, तापमान कमी करणारे, पाऊस पाडणारे असे बहुउपयोगी आहे. नद्यांच्या काठाचे गाव शोधून त्या गावांची बांबू लागवडीकरिता निवड अधिक सोयीची असून, बांबू लागवड योजना मराठवाड्यात यशस्वी करण्याचे आवाहन त्यांनी केले.

बांबू हा दररोज जवळपास एक फूटपर्यंत वाढतो. ३० टक्क्यांपेक्षा अधिक कार्बन खाण्याची क्षमता बांबूत आहे. माणसाला एका वर्षाला २८० किलो ऑक्सिजन लागतो, तर बांबूचे झाड ३२० किलो ऑक्सिजन वर्षाला निर्माण करते. इथेनॉल व सीएनजी तयार करण्यासाठीही बांबूची मदत होते, असे पटेल यांनी सांगितले. जिल्हाधिकारी मुगळीकर यांनी प्रास्ताविक केले. बांबू लागवडीचा कार्यक्रम हाती घेऊन शेतकऱ्यांनी बांधावर बांबू लागवड करणे सोयीचे होईल, तसेच बांबूची रोपे शेतकऱ्यांना उपलब्ध करून दिले जातील, असे त्यांनी सांगितले.