शहरं
Join us  
Trending Stories
1
सगळे बघतच राहिले, PM मोदी-राहुल गांधी एकत्र; आपुलकीने विचारपूस अन् चर्चा; नेमके काय घडले?
2
पाकिस्तानात इराण-अमेरिका चर्चा अयशस्वी ठरली तर काय असेल डोनाल्ड ट्रम्प यांना पुढचा प्लॅन?
3
गोल्ड ETF मधील गुंतवणूक ५७% नं घसरली, चांदीत सलग दुसऱ्या महिन्यात 'एक्झिट'; आता गुंतवणूकदारांनी काय करावं?
4
स्लीपर वंदे भारत आता मुंबईतून धावणार, रेल्वे मंत्रालयाची मंजुरी; कुठल्या मार्गावर सुरू होणार?
5
IPL 2026: वैभव सूर्यवंशीच्या बॅटिंगवर किंग कोहली फिदा; सामन्यानंतर दिलं खास गिफ्ट!
6
चिंताजनक! युद्धविरामानंतरही होर्मुझ मार्ग असुरक्षित; सागरी सुरुंग कुठे पेरले? इराणच विसरला
7
२००० कोटींचा महाघोटाळा! ६.३ कोटी कॅश, ७.५ कोटींचे दागिने; १९ हजार लोकांना गंडा, ED ची मोठी कारवाई
8
मंत्री झिरवाळ 'व्हिडिओ' प्रकरणाला नवं वळण; FIR रद्द करण्यासाठी आरोपीची कोर्टात धाव; आरोपांनी खळबळ
9
लग्नाची मागणी फेटाळली, रागीट युवकाने युवतीला टोचलं HIV संक्रमित इंजेक्शन, मग १ महिन्यांनी...
10
“प्रत्येक गोष्टीसाठी कोर्टाची पायरी चढू नका”; सुप्रीम कोर्टाने फेटाळल्या २५ जनहित यचिका
11
IPL 2026: वैभव सूर्यवंशी नावाचं वादळ थांबेना! मुंबई, सीएसकेनंतर विराटच्या आरसीबीलाही दाखवला हिसका
12
अंधश्रद्धेचा बळी! मुलीच्या मृत्यूनंतर ६ महिने अंत्यसंस्कार नाहीत; बापाच्या कृत्याने पोलीस हादरले
13
Video - किती गोड! बीट, ब्रोकली, स्ट्रॉबेरी... पप्पांनी केला लाडक्या लेकीचा 'नॅचरल' मेकअप
14
"खरातमुळे दिल्लीत आमची चेष्टा होतेय, महाराष्ट्राचं हसू झालंय"; भोंदू बाबाच्या कृत्यांवर सुप्रिया सुळे संतापल्या
15
पतीच्या डोळ्यासमोरच बुडत होती पत्नी, पण...; बोट दुर्घटनेमुळे हसतं-खेळतं कुटुंब झालं उद्ध्वस्त
16
Gold Price Today: महिन्याभरात सोनं १०,१३१ रुपयांनी झालं स्वस्त; चांदी ३२,८९६ रुपयांनी घसरली; पाहा काय आहे नवी किंमत?
17
मराठवाडा हादरला! हिंगोली, परभणी आणि नांदेड जिल्ह्यांना भूकंपाचे सौम्य धक्के; नागरिकांची घराबाहेर धाव
18
कस्टम ऑफिसर बनून फिल्मी स्टाईलने १५ किलो सोन्याची लूट; दीड वर्ष रेकी, रचला भयंकर कट
19
Mathura Boat Tragedy : मथुरा दुर्घटनेआधीचा Video व्हायरल; बोट उलटण्यापूर्वी भजन-कीर्तनात तल्लीन होते भाविक
20
₹७.५ कोटींना खरेदी केलेलं अपार्टमेंट, ८.८७ कोटींना विकून कमावलं १८% प्रॉफिट; इनव्हेस्टमेंटचा 'टायगर' निघाला श्रॉफ
Daily Top 2Weekly Top 5

कारवाईसाठी गेलेल्या पथकाच्या अंगावर जेसीबी घालण्याचा प्रयत्न

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 18, 2021 04:18 IST

परभणी : अवैधरीत्या होत असलेले माती उत्खनन थांबविण्यासाठी गेलेल्या स्थानिक गुन्हा अन्वेषण शाखेच्या पथकातील कर्मचाऱ्यांच्या दिशेने भरधाव जेसीबी चालवून, ...

परभणी : अवैधरीत्या होत असलेले माती उत्खनन थांबविण्यासाठी गेलेल्या स्थानिक गुन्हा अन्वेषण शाखेच्या पथकातील कर्मचाऱ्यांच्या दिशेने भरधाव जेसीबी चालवून, जीवे मारण्याचा प्रयत्न केल्याची घटना पालम तालुक्यातील भोगाव येथे १५ मे रोजी रात्री दीड वाजण्याच्या सुमारास घडली.

सहायक पोलीस अधीक्षक अविनाश कुमार यांच्यासह स्थानिक गुन्हा अन्वेषण शाखेचे पोलीस कर्मचारी पालम तालुक्यात गस्तीवर असताना, तालुक्यातील भोगाव येथे गायरान जमिनीतून अवैधरीत्या मातीचे उत्खनन होत असल्याची माहिती त्यांना मिळाली. शनिवारी रात्री दीड वाजण्याच्या सुमारास सहायक पोलीस अधीक्षक अविनाश कुमार, स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस उपनिरीक्षक विश्वास खोले, लटपटे, घोडके, कांबळे आदी कर्मचारी भोगाव परिसरात दाखल झाले. तेव्हा ३ ट्रॅक्टर आणि एका जेसीबीच्या साह्याने माती उत्खनन होत असल्याचे निदर्शनास आले. हे कर्मचारी घटनास्थळी जाऊन माती उत्खनन थांबवित असताना ३ ट्रॅक्टर चालकांनी ट्रॅक्टरसह तेथून पोबारा केला. मात्र, जेसीबीच्या चालकाने पोलिसांच्या दिशेने भरधाव जेसीबी चालविली. पोलीस कर्मचाऱ्यांनी रस्त्याच्या बाजूला होऊन स्वतःचा जीव वाचविला. त्यानंतर, जेसीबी चालकाने तेथून पोबारा केला. त्यानंतर, पथकातील कर्मचाऱ्यांनी जेसीबीचा पाठलाग केला. मात्र, चालकाने जेसीबी जागेवर सोडून तेथून पळ काढला.

या प्रकारानंतर पोलीस उपनिरीक्षक विश्वास खोले यांनी पालम पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. जेसीबी चालकाने भरधाव जेसीबी चालवून जीवे मारण्याचा प्रयत्न केल्याचे तक्रारीत म्हटले आहे, तसेच सरकारी कामात अडथळा निर्माण करणे यासह इतर कलमान्वये ३ ट्रॅक्टर चालक, जेसीबी चालक व मालकाविरुद्ध गुन्हा दाखल झाला आहे. पोलिसांनी जेसीबी जप्त केला आहे. आरोपींचा शोध सुरू आहे.