शहरं
Join us  
Trending Stories
1
"वारकरी संप्रदायात प्रतिगामी लोकांची घुसखोरी, धर्मांध शक्तींना बळ देणारी मांडणी", शरद पवार यांचे विधान
2
'सरपंच साब' श्रेयस सह प्रियांश-प्रभसिमरनचा जलवा! सनरायझर्स हैदराबादसमोर पंजाब किंग्सचा भांगडा
3
ज्येष्ठ गायिका आशा भोसले यांना ह्रदयविकाराचा झटका, ब्रीच कँडी हॉस्पिटल उपचार सुरू
4
इराणने इस्लामाबादमध्ये अमेरिकेसमोर ठेवल्या ४ कडक अटी; आता चेंडू बायडेन-ट्रम्पच्या कोर्टात
5
Chhagan Bhujbal: हेलिकॉप्टर हेलिपॅडऐवजी पार्किंगमध्ये का उतरवलं? स्वतः भुजबळांनी सांगितलं त्यामागचं कारण!
6
IPL 2026, PBKS vs SRH: Priyansh Arya चं वादळी अर्धशतक! Nicholas Pooran चा विक्रम मोडला
7
Relationship: तुमचं जोडीदारावर खूप प्रेम आहे? फक्त 'या' ५ गोष्टी करा! कधीच तुटणार नाही तुमचं नातं!
8
इराणची संपत्ती होणार मुक्त! अमेरिकेचा मोठा निर्णय; होर्मुझची सामुद्रधुनी पुन्हा खुली होणार?
9
IPL 2026: भर मैदानात विराट कोहलीचा नागिन डान्स; आरसीबीच्या खेळाडूंसह प्रेक्षकांनाही हसू आवरलं नाही!
10
'सुनेत्रा पवारांच्या जीवाला रुपाली चाकणकर यांच्याकडून धोका', एसआयटीकडे तक्रार, राजकारणात खळबळ
11
अंधश्रद्धेचा अघोरी कळस! सापाने चावलेल्या मुलाला हात-पाय बांधून गंगा नदीत लटकवले; १२ तास मृत्यूशी झुंज, शेवटी...
12
Travel : कशाला हवा परदेश? भारताच्या दक्षिण टोकावर दडलंय निसर्गाचं नंदनवन; पाहा ७ बेस्ट हिल स्टेशन्स
13
गुड न्यूज! आता चूक सुधारता येणार; Instagram ने आणलं 'एडिट' फीचर, टाईम लिमिट किती?
14
छगन भुजबळ थोडक्यात बचावले, पायलटने भलतीकडेच हेलिकॉप्टर उतरवले; अनर्थ टळला, नेमका प्रकार काय?
15
Varuthini Ekadashi 2026: भाग्य पालटणारा सोमवार! वरुथिनी एकादशीला 'या' राशींवर होणार विष्णू कृपेचा वर्षाव!
16
IPL 2026 PBKS vs SRH : अभिषेक शर्माची कडक फिफ्टी; SRH नं पॉवर प्लेमध्येच ठोकली सेंच्युरी
17
नियतीचा क्रूर खेळ! लग्नानंतर अवघ्या काही तासांत संसाराचा अंत; नवरा-नवरीसह ४ जणांचा मृत्यू
18
Share Market Holiday: मंगळवारी शेअर बाजारात ट्रेडिंग होणार नाही; कामकाज राहणार बंद, पाहा काय आहे यामागचं कारण?
19
२३ वर्षांनी महिला व बालकल्याण विभागाचे सक्षमीकरण, २,३३,००५ पदांना मान्यता; मेगा भरती होणार!
20
मुंबईत स्वस्तात मिळणार घरे, २८ एकरात उभी राहणार नवी टाउनशिप; मध्यमवर्गीयांसाठी सरकारचं 'गिफ्ट'
Daily Top 2Weekly Top 5

धारासूर येथील प्राचीनकालीन मंदिर नामशेष होण्याच्या मार्गावर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 8, 2020 04:14 IST

गंगाखेड: तालुक्यातील धारासूर येथे असलेले प्राचीनकालीन हेमाडपंती गुप्तेश्वर मंदिर देखभाल व दुरुस्तीअभावी नामशेष होण्याच्या मार्गावर असल्याचे सद्यस्थितीत झालेल्या मंदिराच्या ...

गंगाखेड: तालुक्यातील धारासूर येथे असलेले प्राचीनकालीन हेमाडपंती गुप्तेश्वर मंदिर देखभाल व दुरुस्तीअभावी नामशेष होण्याच्या मार्गावर असल्याचे सद्यस्थितीत झालेल्या मंदिराच्या अवस्थेवरून दिसून येत आहे. प्राचीनकालीन ठेवा जपण्यासाठी पुरातत्त्व विभागाने याकडे वेळीच लक्ष देऊन नामशेष होण्याच्या मार्गावर असलेल्या पुरातनकालीन हेमाडपंती मंदिराला नामशेष होण्यापासून वाचवून मंदिराचा जीर्णोद्धार करून जतन करावे, अशी आशा धारासूर येथील ग्रामस्थांसह तालुकावासियांतून व्यक्त केली जात आहे.

गंगाखेड तालुक्यातील गोदावरी नदीकाठावर असलेल्या धारासूर या गावात सुमारे १३ व्या शतकामध्ये हेमाडपंती चालुक्यकाळात ७२८ चौरस मीटर क्षेत्रात बांधलेले भूमिज प्रकारचे प्राचीनकालीन गुप्तेश्वर मंदिर आहे. हेमाडपंती चालुक्य काळात बांधलेल्या या मंदिराचे बांधकाम दगडी शिळापासून केलेले आहे. तर शिखर विटापासून बनविलेले आहे. मंदिराच्या दगडी बांधकामावर सुंदर असे नक्षीकाम करून सुबक बांधणीच्या मंदिरावर चोहोबाजूंनी कोरलेले सूरसुंदरीचे चित्र अत्यंत मनमोहक असे आहे. या मंदिराला २७ फेब्रुवारी १९९८ साली राज्य शासनाने प्राचीन व ऐतिहासिक स्मारक असल्याचे घोषित केलेले आहे. शेकडो वर्षांपासून उभे असलेले हे हेमाडपंती मंदिर पुढील पिढीसाठी प्रेरणादायी ठरण्याबरोबर हॅरीटेज वॉक झालेले आहे. मात्र, गेल्या काही वर्षांत गुप्तेश्वर मंदिराच्या उत्तर व पश्चिमेकडील बाजू ढासळल्याने व मंदिराच्या गाभाऱ्यात असलेल्या शिळा अर्धा इंच इतक्या अंतरावर टेकलेल्या असल्याने गाभाऱ्यातील शिळा निसटून मंदिराची हानी होण्याची भीती निर्माण झाली आहे. गाभाऱ्यातील शिळा ढासळून भविष्यात मंदिरात येणाऱ्या भाविक-भक्तांसाह मंदिराच्या बाजूला राहणाऱ्या नागरिकांना यापासून कुठलीही हानी होऊ नये, यासाठी मंदिरातील शिळांना पोलादी भीमचा टेका देऊन मंदिराची हानी टाळण्याची गरज असल्याची भावना धारासूरवासियांतून व्यक्त केली जात आहे. या मंदिराच्या जीर्णोद्धार व जतनासाठी ग्रामस्थांनी सुमारे २०१४ पासून राज्याचे पुरातत्त्व विभाग व सांस्कृतिक मंत्रालय तसेच शासनाकडे वेळोवेळी पाठपुरावा करूनही मंदिर जीर्णोद्धार व जतनासाठी निधी उपलब्ध झाला नाही. नामशेष होण्याच्या मार्गावर असलेल्या या मंदिराच्या जीर्णोद्धारासाठी तात्काळ निधी उपलब्ध करून द्यावा, अशी मागणी धारासूरवासियांतून होत आहे.