शहरं
Join us  
Trending Stories
1
"आमच्यात नाक खुपसू नका", डोनाल्ड ट्रम्प यांना दिला इशारा, इराणच्या बाजूने उभा राहिला चीन
2
Asha Bhosale: सूरसम्राज्ञी आशा भोसले अनंतात विलीन, दिग्गज गायकांनी गाणं गाऊन दिली अखेरची स्वरांजली
3
होर्मुझ सामुद्रधुनीवर ब्रिटन-फ्रान्सचा 'बिग प्लॅन'; ४० देशांना एकत्र आणणार, ट्रम्प यांना डच्चू
4
दिल्ली, हरयाणा, पंजाबमधील CCTV चे फुटेज थेट पाकिस्तानला, चिनी कॅमेऱ्यातून भारताची हेरगिरी
5
Rohit Sharma Injury : मुंबई इंडियन्ससाठी वाजली धोक्याची घंटा; रोहित शर्मा पुढच्या सामन्याला मुकणार?
6
Latest Marathi News LIVE: होर्मुझ सामुद्रधुनीचा पेच, तणाव वाढला; ४० देशांची होणार बैठक, ब्रिटन-फ्रान्सने घेतला पुढाकार
7
सिंगल चार्जवर ३२० KM रेंज...किंमत फक्त ₹१.२९ लाख! Ola ची नवीन EV स्कूटर लॉन्च
8
बालेन शाह यांनी PM मोदींना भेटण्यासाठी ठेवली अट; नेपाळ-भारत संबंध पुन्हा सुधारणार
9
"काही लोकांना ४ लग्नांची सूट, भाजप सत्तेत आल्यास...";  अमित शाह यांनी बंगालमध्ये सभा गाजवली, स्पष्टच बोलले
10
इराणी नेत्यांच्या सुरक्षेसाठी पाकिस्ताननं अख्खी ताकद पणाला लावली; कसं केले होते नियोजन?
11
सीलिंग फॅन की टेबल फॅन? वीज बिल वाचवण्यासाठी कोणता पर्याय सर्वोत्तम? खरेदीपूर्वी नक्की वाचा
12
"US-इराणमध्ये तयार होता अंतिम करार; शेवटच्या क्षणी आला एक कॉल अन् २१ तासांची चर्चा फिस्कटली"
13
श्रीलंकेत भारताची मोठी खेळी; खरेदी केली मोठी शिपबिल्डिंग कंपनी, चीन पाहतच राहिला
14
आशा भोसलेंची नात जनाईला धीर द्यायला पोहोचला 'मानलेला भाऊ' मोहम्मद सिराज, पाहा VIDEO
15
Garud Puran: गरुड पुराणानुसार मृत्यूपूर्वी मिळतात 'हे' रहस्यमयी संकेत; अखेरच्या काळात नेमकं काय घडतं?
16
MPSC भरती प्रक्रियेत मोठा बदल; राज्य मंत्रिमंडळाने घेतले ७ महत्त्वाचे निर्णय, जाणून घ्या
17
आले कधी अन् गेले कधी, समजलंच नाही! आयपीएलमध्ये सर्वात कमी धावसंख्येवर ऑलआउट झालेले संघ
18
८ व्या वेतन आयोगाची बंपर भरती; १.८० लाख रुपये महिना पगार, जाणून घ्या अर्ज करण्याची प्रक्रिया
19
पत्नीला काम सांगायचे म्हणून मुलाने केला पित्याचा खून; गडचिरोलीतील धक्कादायक घटना
20
Kalyan Accident: कल्याण-अहिल्यानगर महामार्गावर भीषण अपघात; ११ जणांचा मृत्यू, दोन गंभीर
Daily Top 2Weekly Top 5

एक हजार मुलांमागे ९७६ मुली

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 5, 2021 06:03 IST

गत पाच वर्षात मुलींच्या जन्मदरात खूपच घट होऊन तो जन्मदर ७७०पर्यंत कमी झाला होता. मुलींच्या कमी जन्मदरामुळे प्रशासन चिंता ...

गत पाच वर्षात मुलींच्या जन्मदरात खूपच घट होऊन तो जन्मदर ७७०पर्यंत कमी झाला होता. मुलींच्या कमी जन्मदरामुळे प्रशासन चिंता व्यक्त करीत होते. याला पर्याय म्हणून बेटी बचाओ, बेटी पढाओ यासह स्त्री जन्माचे स्वागत हे उपक्रम राबवले. त्याचबरोबर महिला व बालकल्याण विभागाच्या वतीने गर्भवती मातेची वेळोवेळी तपासणी करणे, त्यांना सकस आहार पुरविणे, या सुविधांमुळे मुलींचा जन्मदर वाढण्यास मदत होत आहे. नजीकच्या काळात स्त्री भ्रूण हत्या कायद्याची प्रभावी अंमलबजावणी झाल्याने वैद्यकीय व्यवसायातील डॉक्टर मंडळींनी प्रसुतीपूर्व गर्भलिंगनिदान बंद केले आहे. त्यामुळे गर्भलिंग चाचणी करून घेणारे दाम्पत्य यांचा पर्याय नाहीसा झाल्याने महिलांचे गर्भपात करून घेण्यावर एकप्रकारे निर्बंध आले आहेत. त्यामुळे यावर्षी मुलींच्या जन्मदरात वाढ झाल्याचे आशादायक चित्र समोर येत आहे. ९ महिन्यांच्या नोंदीनुसार २९८ मुलगे, तर २९१ मुलींचा जन्म झाला असून, त्याचा जन्मदर हा १ हजार मुलांमागे ९७६ मुली असा असून तो वाढत आहे. असे वैद्यकीय सुत्रांनी सांगितले.

मागील ९ महिन्यातील मुलींचा जन्मदर

एप्रिल (मुलगे २२, मुली २४)

मे (मुलगे २१, मुली २४)

जून (मुलगे १४, मुली १७)

जुलै (मुलगे ४३, मुली ३१)

ऑगस्ट ( मुलगे ४८, मुली ३७)

सप्टेंबर ( मुलगे ३६, मुली ४०)

ऑक्टोबर ( मुलगे ४६, मुली ४७)

नोव्हेंबर( मुलगे ३५, मुली ४०)

डिसेंबर ( मुलगे ३३, मुली ३१)

शासनाच्या योजना ठरल्या फलदायी

प्रधानमंत्री मातृ वंदना योजनेअंतर्गत शासनाकडून महिलांकरिता अनुदान रक्कम दिली जात असल्यामुळेही मुलींच्या जन्मदरात वाढ होत असून, ती आशादायक अशीच आहे. त्याचबरोबर स्त्रीभ्रूणहत्या कायद्याअंतर्गत येणाऱ्या नियमांचे पालन करून सोनोग्राफी व एमटीपी केंद्राची नियमित तपासणी करण्यात येते.

सेलू तालुक्यात अनियमितता दिसून येत नसल्याने मुलींच्या जन्मदरात वाढ होत आहे. सद्यस्थितीत हे प्रमाण चांगले आहे, ही समाधानाची बाब आहे.

डॉ. संजय हरबडे, वैद्यकीय अधीक्षक, उपजिल्हा रुग्णालय, सेलू.