शहरं
Join us  
Trending Stories
1
Chhagan Bhujbal: हेलिकॉप्टर हेलिपॅडऐवजी पार्किंगमध्ये का उतरवलं? स्वतः भुजबळांनी सांगितलं त्यामागचं कारण!
2
इराणची संपत्ती होणार मुक्त! अमेरिकेचा मोठा निर्णय; होर्मुझची सामुद्रधुनी पुन्हा खुली होणार?
3
'सुनेत्रा पवारांच्या जीवाला रुपाली चाकणकर यांच्याकडून धोका', एसआयटीकडे तक्रार, राजकारणात खळबळ
4
Travel : कशाला हवा परदेश? भारताच्या दक्षिण टोकावर दडलंय निसर्गाचं नंदनवन; पाहा ७ बेस्ट हिल स्टेशन्स
5
गुड न्यूज! आता चूक सुधारता येणार; Instagram ने आणलं 'एडिट' फीचर, टाईम लिमिट किती?
6
छगन भुजबळ थोडक्यात बचावले, पायलटने भलतीकडेच हेलिकॉप्टर उतरवले; अनर्थ टळला, नेमका प्रकार काय?
7
Varuthini Ekadashi 2026: भाग्य पालटणारा सोमवार! वरुथिनी एकादशीला 'या' राशींवर होणार विष्णू कृपेचा वर्षाव!
8
IPL 2026 PBKS vs SRH : अभिषेक शर्माची कडक फिफ्टी; SRH नं पॉवर प्लेमध्येच ठोकली सेंच्युरी
9
नियतीचा क्रूर खेळ! लग्नानंतर अवघ्या काही तासांत संसाराचा अंत; नवरा-नवरीसह ४ जणांचा मृत्यू
10
Share Market Holiday: मंगळवारी शेअर बाजारात ट्रेडिंग होणार नाही; कामकाज राहणार बंद, पाहा काय आहे यामागचं कारण?
11
२३ वर्षांनी महिला व बालकल्याण विभागाचे सक्षमीकरण, २,३३,००५ पदांना मान्यता; मेगा भरती होणार!
12
मुंबईत स्वस्तात मिळणार घरे, २८ एकरात उभी राहणार नवी टाउनशिप; मध्यमवर्गीयांसाठी सरकारचं 'गिफ्ट'
13
PBKS vs SRH : कोण आहे Praful Hinge? ईशान किशनच्या कॅप्टन्सीत विदर्भकराला पदार्पणाची संधी मिळणार?
14
आता तुमच्या सुट्ट्या वाया जाणार नाहीत! उरलेल्या सुट्ट्यांच्या मोबदल्यात मिळणार पैसा; नव्या कामगार कायद्यात काय?
15
Shocking: बापरे! फ्रीडायव्हिंग करताना शार्कनं जबड्यात पकडला पाय; पाहा अंगाचा थरकाप उडवणारा व्हिडिओ
16
मोबाईल विकला अन् बँक खाते रिकामे झाले? कानपूर पोलिसांनी उघडले सायबर गुन्हेगारीचे नवीन रॅकेट
17
डोसा प्रकरणात नवा ट्विस्ट, आजी-आजोबांवर संशय; २ मुलींच्या वडिलांनी पोलिसांना काय सांगितलं?
18
Video: फक्त २ वर्षातच मुलीने फेडलं ३० लाखांचं शैक्षणिक कर्ज; सांगितल्या ४ सोप्या ट्रीक
19
“शालेय वाहतूक अधिक सुरक्षित, पारदर्शक, उत्तरदायी करण्यास सरकार कटिबद्ध”: प्रताप सरनाईक
20
धक्कादायक! कोणीही मुली देईना, मच्छरांच्या त्रासामुळे 'या' गावातील मुलांचं लग्नच जमेना
Daily Top 2Weekly Top 5

९३ लाख टन उसाचे होणार गाळप

By admin | Updated: November 5, 2014 13:29 IST

नांदेड विभागात यावर्षीच्या हंगामात एकूण ३४ साखर कारखाने उसाचे गाळप करणार असून यातील सहा कारखान्याने या वर्षीच्या हंगामासाठी नवीन प्रस्ताव दाखल केले आहेत.

रामेश्‍वर काकडे /नांदेड

नांदेड विभागात यावर्षीच्या हंगामात एकूण ३४ साखर कारखाने उसाचे गाळप करणार असून यातील सहा कारखान्याने या वर्षीच्या हंगामासाठी नवीन प्रस्ताव दाखल केले आहेत. एकूण कारखान्याकडून ९३ लाख १८ हजार मेट्रिक टन उसाचे गाळप होण्याचा अंदाज आहे.
नांदेड येथील प्रादेशिक साखर उपसंचालक कार्यालयातंर्गत नांदेडसह, परभणी, हिंगोली, लातूर, उस्मानाबाद या पाच जिल्ह्यांचा समावेश आहे. सदर पाच जिल्ह्यात एकूण १ लाख ५८ हजार ८८९ हेक्टर क्षेत्रावर ऊस लागवड करण्यात आलेली आहे. यात लातूर जिल्ह्यात ४६३९७ हेक्टर, परभणी ३२ हजार हेक्टर, नांदेड २३५२९ हेक्टर, उस्मानाबाद ३९८१६ हेक्टर तर हिंगोली जिल्ह्यात १७१४६ हेक्टरवर उसाची लागवड करण्यात आली आहे.
गतवर्षी नांदेड विभागातील साखर कारखान्यांनी ८२ लाख७८ हजार टन उसाचे गाळप केले होते. तर यंदा ९३ लाख टन उसाचे गाळप होण्याचा अंदाज आहे. यावर्षासाठी केंद्र शासनाने योग्य किफायतशीर भाव ऊसाच्या ९.५ टक्के उतार्‍यासाठी प्रतिटन २२00 रुपये तर यानंतर उतार्‍यात एक टक्का वाढल्यास प्रतिटक्का २३२ रुपये दर मिळणार आहे. तर गतवर्षी हेच दर साडेनऊ टक्क्यांसाठी २१00 रुपये व त्यानंतर २२१ रुपये प्रतिटक्का याप्रमाणे होते.
विभागातील एकूण ३४ कारखान्यांपैकी १८ खाजगी तर १५ सहकारी कारखाने आहेत. यात परभणी ६, हिंगोली ३, नांदेड ५, उस्मानाबाद १0 तर लातूर जिल्ह्यात १0 कारखाने आहेत.साखर सहसंचालक कार्यालयाकडे प्राप्त झालेल्या एकूण ३४ प्रस्तावांपैकी सहा कारखाने यावर्षीच ऊस गाळप करणार आहेत. तर उर्वरित २८ कारखान्यानी गतवर्षीही उसाचे गाळप केले होते.