४० रुग्ण घरीच घेतात उपचार
परभणी : जिल्ह्यात सध्या कोरोनाचे ७८ रुग्ण असून, त्यापैकी ४० रुग्ण त्यांच्या घरीच उपचार घेत आहेत. कमी लक्षणे असणाऱ्या रुग्णांना त्यांच्या घरी राहून उपचार घेण्याची सुविधा आरोग्य विभागाने दिली आहे. या रुग्णांवर वैद्यकीय अधिकारी व्हिडिओ कॉन्फरन्सच्या साह्याने वैद्यकीय उपचार करीत आहेत.
१६७२ खाटा जिल्ह्यात उपलब्ध
परभणी : कोरोना रुग्णांची संख्या कमी झाल्याने जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात खाटा रिक्त झाल्या आहेत. मंगळवारी दिलेल्या अहवालानुसार कोरोना रुग्णांसाठी १ हजार ६७२ खाटा उपलब्ध आहेत. येथील आय.टी.आय. रुग्णालयात १९ रुग्ण उपचार घेत आहेत. या रुग्णालयात १८१ खाटा रिक्त आहेत. त्याचप्रमाणे सेलू येथील उपजिल्हा रुग्णालयात २, डॉ. बाबासाहेब आंबेडकर वसतिगृहात १ आणि खाजगी रुग्णालयात १६ रुग्ण उपचार घेत आहेत.