दरवर्षीच्या पावसाळ्यात जिल्ह्यात ७६१ मि.मी. पाऊस होत असतो. आतापर्यंत ६५८.५ मि.मी. पावसाची नोंद झाली आहे. पाथरी तालुक्यात सर्वाधिक ७२२ मि.मी. पाऊस झाला आहे. तर पालम तालुक्यात ६७७ मि.मी., पूर्णा ६६९ मि.मी., सोनपेठ ६६७ मि.मी., मानवत ६६४, सेलू ६४८, परभणी ६५५ आणि गंगाखेड तालुक्यात सर्वात कमी ५७६ मि.मी. पाऊस झाला आहे. एकूण पावसाच्या टक्केवारीचा विचार करता सोनपेठ तालुक्यात ९८टक्के पाऊस झाला. त्याचप्रमाणे पाथरी, मानवत, पालम आणि जिंतूर या तालुक्यात वार्षिक सरासरीच्या ९० टक्क्यांपेक्षा अधिक पाऊस झाला आहे.
तालुकानिहाय अधिक झालेला पाऊस (टक्के)
परभणी : २० गंगाखेड : २६ पाथरी : ५१ जिंतूर : ३५ पूर्णा : ३१ पालम : ४२ सेलू : ३२ सोनपेठ : ५४ मानवत : ३४