शहरं
Join us  
Trending Stories
1
हॉर्मुझबाबत इराणची नवी चाल, टोलवसुलीवर ठाम; अडवणुकीमुळे तणाव कायम,  सुप्रीम लीडर म्हणाले...
2
Latest Marathi News LIVE Updates: 'ऑपरेशन टायगर'च्या चर्चेनं राजकारणात खळबळ, शिंदेसेना-ठाकरेसेना आमनेसामने
3
तो लय बेक्कार मारतो! Mukul Choudhary च्या वादळी खेळीनंतर Arjun Tendulkar चा 'तो' व्हिडिओ व्हायरल
4
मोठी घडामोड, रशियाकडून युद्धविरामाची घोषणा; २ दिवस युक्रेन हल्ले नाही, अचानक नेमके काय घडले?
5
KKR vs LSG: "जास्त विचार करू नको, फक्त मार...!" ऋषभ पंतचा तो एक सल्ला मुकुल चौधरीसाठी 'गुरुमंत्र' ठरला; ईडन गार्डन्स गाजवलं 
6
मध्य पूर्वेतील संकटकाळात भारताचा मॉरिशसला मदतीचा हात; तेल आणि वायूचा पुरवठा करणार
7
“शशिकांत शिंदे हे मूळचे शिवसैनिक, शिवसेनेत आल्यास पहिले स्वागत मी करेन”; कुणी दिली ऑफर?
8
आजचे राशीभविष्य, १० एप्रिल २०२६: कोणताही महत्त्वाचा निर्णय घेणे टाळा; प्रवास संभवतो
9
TCS Salary Hike 2026: टीसीएस जवळपास ६ लाख कर्मचाऱ्यांसाठी आनंदाची बातमी! सॅलरी वाढीवर आली मोठी अपडेट, जाणून घ्या
10
शेअर बाजाराची दमदार सुरुवात, Sensex ५०० अंकांनी वधारला; Bank Nifty मध्ये ७०० अंकांची जोरदार तेजी, मात्र IT Stocks मध्ये विक्री
11
STचा सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांना मोठा दिलासा; मोफत प्रवास पाससोबत डिजिटल NCMC प्रणालीची जोड
12
विशेष लेख: बारामती पोटनिवडणुकीत काँग्रेसने माघार घेतली तर आधी अट्टाहास का केला?
13
‘घोस्ट मर्मर’! ६४ किमीवरून ओळखली धडधड.. अमेरिकेच्या इतिहासातील सर्वांत धाडसी शोध
14
मध्यस्थीच्या नादात पाकिस्तान तोंडघशी! मध्यस्थी करताना निष्पक्ष राहा म्हणत इस्रायलने सुनावले खडेबोल
15
“हे सगळे लगेचच थांबवा, आमचा करार...”; होर्मुझवर टोल आकारणीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
16
अग्रलेख: कुंभमेळा श्रद्धेचा, संघर्षाचा नव्हे! ‘नवे नाशिक’ उभे राहताना ‘आपले नाशिक’ हरवतंय..?
17
फोन ४०% महागले, किंमत आणखी वाढणार? विक्रीत १० टक्क्यांपर्यंत घट होण्याची शक्यता
18
न्यू इंडिया बँक १२२ कोटींचा घाेटाळा: माजी महाव्यवस्थापक हितेश मेहता यांना जामीन नाकारला
19
भारतात मुलांच्या मृत्यूचे १० वे कारण ठरतोय ‘कॅन्सर’; वर्षभरात १७ हजार बालकांचा मृत्यू
20
पुढील ४ आठवडे उन्हाच्या झळा; पूर्वेकडील वाऱ्यांचा प्रभाव, पारा चाळिशी पार जाण्याचा अंदाज
Daily Top 2Weekly Top 5

लसीकरणासाठी ५ हजार मनुष्यबळाची तयारी (दिल्लीसाठी)

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 6, 2020 04:18 IST

परभणी : कोरोनाची लस अंतिम टप्प्यात आली असून प्रशासनाने आता लसीकरण करण्यासाठी लागणाऱ्या मनुष्यबळाची तयारी सुरु केली आहे. शहरीभाग ...

परभणी : कोरोनाची लस अंतिम टप्प्यात आली असून प्रशासनाने आता लसीकरण करण्यासाठी लागणाऱ्या मनुष्यबळाची तयारी सुरु केली आहे. शहरीभाग वगळता ग्रामीण भागात शासकीय आणि खासगी असे मिळून ५ हजार ५७ अधिकारी, कर्मचाऱ्यांची आवश्यकता भासणार असून त्यादृष्टीने आरोग्य विभागाने तयारी केली आहे.

एप्रिल ते ऑगस्ट महिन्यापर्यंत कोरोनाने जिल्ह्यासह राज्यभरात धुमाकूळ घातला होता. आता जिल्ह्यातील संसर्ग कमी झाला असून कोरोनाची लस उपलब्ध होण्याची आशा निर्माण झाली आहे. या पार्श्वभूमीवर जिल्हा परिषदेच्या आरोग्य विभागाने ग्रामीण भागातील मनुष्यबळाची तयारी सुरु केली आहे. लसीकरण करण्यासाठी वैद्यकीय अधिकारी, आशा वर्कर, एएनएम, एमपीडब्ल्यू, वैद्यकीय कर्मचाऱ्यांना मदत करणारे कर्मचारी अशा शासकीय आणि खासगी कर्मचाऱ्यांची माहिती संकलित करण्यात आली आहे. या कर्मचाऱ्यांना प्रत्यक्ष लसीकरणाच्या मोहिमेत सहभाग नोंदवावा लागणार आहे. जिल्ह्यात ५ हजार ५७ अधिकारी आणि कर्मचाऱ्यांचे मनुष्यबळ लागेल, असा अंदाज असून त्याचा अहवालही वरिष्ठ विभागाकडे पाठविण्यात आला आहे. परभणीचा शहरीभाग वगळता ग्रामीण भागात १ हजार ५७, पाथरी ४१३, पूर्णा ६४८, सेलू ५१९, सोनपेठ ३०९, गंगाखेड ६६०, जिंतूर ६६२, मानवत ३५८ आणि पालम तालुक्यामध्ये ४७१ अधिकारी- कर्मचाऱ्यांची आवश्यकता भासणार आहे. तशी तयारी आरोग्य विभागाने केली आहे.

साडेसातशे कर्मचारी प्रशिक्षित

लसीकरण मोहिमेत सहभाग नोंदविण्यासाठी ५ हजार ५७ कर्मचाऱ्यांची यादी तयार केली असली तरी प्रत्यक्षात त्यातील ७७८ कर्मचारीच लसीकरणासाठी प्रशिक्षित कर्मचारी आहेत. उर्वरित ४ हजार ३०९ कर्मचाऱ्यांना प्रशिक्षण द्यावे लागणार आहे. या कर्मचाऱ्यांच्या प्रशिक्षणाच्या अनुषंगानेही जिल्हा परिषद प्रशासन तयारी करीत आहे. प्रशिक्षित कर्मचाऱ्यांमध्ये गंगाखेड तालुक्यात ७५, जिंतूर १०१, मानवत १०३, पालम ३३, परभणी २८०, पाथरी २७, पूर्णा ५९, सेलू ४७ आणि सोनपेठ तालुक्यात ४३ कर्मचाऱ्यांचा समावेश आहे.

असे लागणार कर्मचारी

वैद्यकीय अधिकारी ३२६, क्षेत्रीय कर्मचारी ४ हजार २३३, परिचारिका, पर्यवेक्षक १७३, वैद्यकीय कर्मचारी ६८, सहकारी कर्मचारी १०१, प्रशासकीय कर्मचारी १५६