शहरं
Join us  
Trending Stories
1
कल्याण-अहिल्यानगर महामार्गावर भीषण अपघात; ११ जणांचा मृत्यू, दोन गंभीर
2
इस्रायलचा महात्मा गांधी हॉस्पिटलवर हल्ला; सगळीकडे विध्वंस, इराणनं शेअर केला Video
3
पाकिस्तानचा दुहेरी डाव! US-इराण शांतता चर्चा निष्फळ ठरताच १३००० सैनिक सौदीत पाठवले, कारण काय?
4
IPL 2026: बॉल बॉयनं पाय धरताच व्यंकटेश अय्यरनं केलं असं काही, सर्वत्र होतंय कौतुक! 
5
'एक अब्ज डॉलर आणि लग्नासाठी एक सुंदर तरुणी द्या, अन्यथा...', या देशाच्या लष्कर प्रमुखाची तुर्कीला धमकी
6
Latest Marathi News LIVE: कर्मचाऱ्यांच्या आंदोलनामुळे नोएडामधील सेक्टर क्र. ५९, ६० आणि ६२ मधील कारखान्यातील काम ठप्प
7
"हृदयात काबा आणि डोळ्यांत मदिना..."; कोण आहेत सभांमध्ये गाणे गाणाऱ्या TMC खासदार सायनी घोष?
8
भावनांचा बांध फुटला! आशा भोसले यांच्या अंत्यदर्शनावेळी नात जनाई भावुक, तब्बूने केलं सांत्वन
9
घराची सफाई करताना सापडलं 'सर्वात सुंदर' नाणं; १.३७ कोटी रुपयांना झाली विक्री, काय आहे खास?
10
VIDEO: लाडक्या 'आशाताईं'ना शेवटचा निरोप देताना सचिन तेंडुलकरला अश्रू अनावर
11
कागदावर २५ हजार सॅलरी अन् प्रत्यक्षात १५००० देतात...; कंपन्यांकडून शोषण, कर्मचारी भडकले
12
IPLमध्ये भाऊबंदकी, पांड्या बंधूंमध्ये बेबनाव? MI Vs RCB लढतीत दिसलं असं दृश्य, चाहत्यांना धक्का
13
"शरद पवारांनी बारामती उभी केली नसती, तर महाराष्ट्रात..."; संजय राऊतांचे रोखठोक विधान
14
फक्त ७ वर्ष...! चीन आणि अमेरिकेलाही मागे टाकणार भारताची ऑटो इंडस्ट्री, नितीन गडकरींनी सांगितला 'मास्टर प्लॅन'
15
Swapna Shastra: सावधान! स्वप्नात 'या' गोष्टी दिसणे म्हणजे संकटाची चाहूल? वाईट प्रभाव रोखण्यासाठी करा 'हे' प्रभावी उपाय!
16
Middle East War: खर्ग बेट, बंदर अब्बासवर अमेरिकेचा डोळा; इराणची कोंडी करण्यासाठी ट्रम्प यांचा मास्टरप्लॅन
17
'होर्मुझ'वरून तणाव वाढला! अमेरिका आजपासून करणार इराणची नाकेबंदी, सेंट्रल कमांडचा इशारा
18
UPI अ‍ॅप्समध्येही असतं का 'Undo' बटण, चुकीच्या UPI ID वर पैसे गेल्यास कसे मिळवाल परत?
19
प्रशासनाचा प्रस्ताव धुडकारला, वाहनांना लावली आग; नोएडात ३ दिवसांपासून रस्त्यावर का उतरले कर्मचारी?
20
Aditya Dhar Net Worth: ‘धुरंधर’च्या दिग्दर्शकाकडे किती आहे संपत्ती? मुंबई ते हिमाचलपर्यंत आहे प्रॉपर्टी
Daily Top 2Weekly Top 5

महसूलच्या दुर्लक्षामुळे २० कोटींचा फटका

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 26, 2021 04:13 IST

गौण खनिज वसुलीतून दरवर्षी जिल्ह्याला मोठा महसूल प्राप्त होतो. त्यासाठी दरवर्षी जिल्हा प्रशासनाला उद्दिष्टही निश्चित करून दिले जाते. २०२०-२१ ...

गौण खनिज वसुलीतून दरवर्षी जिल्ह्याला मोठा महसूल प्राप्त होतो. त्यासाठी दरवर्षी जिल्हा प्रशासनाला उद्दिष्टही निश्चित करून दिले जाते. २०२०-२१ या वर्षासाठी जिल्ह्याला ७३ कोटी ५० लाख रुपयांचे वसुलीचे उद्दिष्ट दिले होते. गौण खनिज उपशातून मिळणारी रॉयल्टी, गौण खनिज उपशाचे लिलावाद्वारे सोडलेले धक्के आणि अवैध गौण खनिज उपसा करणाऱ्यांविरुद्ध केलेल्या दंडात्मक कारवाईतून ही रक्कम वसूल केली जाते.

जिल्ह्यातील वाळू घाटांच्या लिलावांमधून मोठ्या प्रमाणात महसूल प्रशासनाला प्राप्त होतो. मात्र यावर्षी वाळू घाटांचे लिलाव रखडले. जिल्ह्यातील २२ वाळू घाटांचे लिलाव करण्याची परवानगी राज्यस्तरावरून मिळाली होती. मात्र त्यातील केवळ १४ वाळू घाटच लिलावात गेले. जिल्हा प्रशासनाला काही वाळू घाटांची अपसेट प्राईसही कमी करावी लागली होती. त्यामुळे वाळू घाटांच्या लिलावातून मिळणाऱ्या मोठ्या महसुलावर पाणी सोडावे लागले. २०२०-२१ या वर्षासाठी जिल्हा प्रशासनाला ७३ कोटी ५० लाख रुपयांची गौण खनिज वसुली करण्याचे उद्दिष्ट दिले होते. मात्र मार्च महिन्याअखेर केवळ ५३ कोटी ४७ लाख ४१ हजार ९६९ रुपयांचीच गौण खनिज वसुली झाली आहे. त्यामुळे यावर्षी प्रशासनाला ७२.७५ टक्के वसुलीवरच समाधान मानावे लागले. वर्षभरात २० कोटी २ लाख रुपयांची वसुली कमी झाल्याने महसूलचे मोठे आर्थिक नुकसान झाले आहे.

दुसरीकडे वाळू घाटांचे लिलाव झाले नसताना, या वाळू घाटांमधून होणारा वाळू उपसा रोखण्यात प्रशासनाला अपयश आले आहे. दररोज लाखो रुपयांच्या वाळूचा उपसा होत असताना, महसूल प्रशासनाकडून मोठ्या प्रतिबंधात्मक कारवाया झाल्या नाहीत. त्याचवेळी पोलिसांनी मात्र वेळोवेळी कारवाया करून अवैध वाळू उपसा रोखण्याचा प्रयत्न केला. त्यामुळे अवैध वाळू उपशातून कोट्यवधी रुपयांच्या महसुलावर पाणी सोडावे लागले. कोरोनाच्या संसर्गामुळे वसुली कमी होऊ शकते. मात्र अवैध गौण खनिज उपसाही थांबविण्याचे काम प्रशासनाकडून होणे अपेक्षित होते. त्याकडे दुर्लक्ष झाल्याने जिल्ह्याला कोट्यवधी रुपयांचा फटका बसला आहे.

नदी काठांवरील तालुक्यातच सर्वात कमी वसुली

गोदावरी, पूर्णा आणि दुधना या नद्यांचे मोठे कार्यक्षेत्र असणाऱ्या तालुक्यांतच यावर्षी कमी वसुली झाली आहे. याउलट नद्यांचे कमी कार्यक्षेत्र असणाऱ्या तालुक्यांत मात्र वसुलीचे प्रमाण अधिक आहे.

गंगाखेड तालुक्यात गोदावरी नदीचे मोठे क्षेत्र आहे. या तालुक्याला मागीलवर्षी ८ कोटी ५० लाख रुपयांचे उद्दिष्ट दिले होते. मात्र तालुक्यात केवळ १ कोटी ६० लाख २३ हजार २९१ रुपयांची (१८.८५ टक्के) वसुली झाली. पालम तालुक्याला ८ कोटी रुपये वसुलीचे उद्दिष्ट होते. या तालुक्यात १ कोटी ५६ लाख २ हजार ७९७ (१९.५० टक्के) आणि सोनपेठ तालुक्यात १ कोटी १२ लाख ४२ हजार ८८८ (१३.२३ टक्के) वसुली झाली. याउलट नद्यांचे क्षेत्र कमी असलेल्या परभणी तालुक्याने ५ कोटी ५ लाख ४६ हजार ९६९(५३.२१ टक्के) वसुली केली आहे.

तालुकानिहाय झालेली वसुली

परभणी : ५३.२१ गंगाखेड : १८.८५ पूर्णा : २७.२० पालम : १९.५० पाथरी : २९.९१ सोनपेठ : १३.२३ मानवत : ४०.२४ जिंतूर : २५.५६