शहरं
Join us  
Trending Stories
1
सगळे बघतच राहिले, PM मोदी-राहुल गांधी एकत्र; आपुलकीने विचारपूस अन् चर्चा; नेमके काय घडले?
2
पाकिस्तानात इराण-अमेरिका चर्चा अयशस्वी ठरली तर काय असेल डोनाल्ड ट्रम्प यांना पुढचा प्लॅन?
3
गोल्ड ETF मधील गुंतवणूक ५७% नं घसरली, चांदीत सलग दुसऱ्या महिन्यात 'एक्झिट'; आता गुंतवणूकदारांनी काय करावं?
4
स्लीपर वंदे भारत आता मुंबईतून धावणार, रेल्वे मंत्रालयाची मंजुरी; कुठल्या मार्गावर सुरू होणार?
5
IPL 2026: वैभव सूर्यवंशीच्या बॅटिंगवर किंग कोहली फिदा; सामन्यानंतर दिलं खास गिफ्ट!
6
चिंताजनक! युद्धविरामानंतरही होर्मुझ मार्ग असुरक्षित; सागरी सुरुंग कुठे पेरले? इराणच विसरला
7
२००० कोटींचा महाघोटाळा! ६.३ कोटी कॅश, ७.५ कोटींचे दागिने; १९ हजार लोकांना गंडा, ED ची मोठी कारवाई
8
मंत्री झिरवाळ 'व्हिडिओ' प्रकरणाला नवं वळण; FIR रद्द करण्यासाठी आरोपीची कोर्टात धाव; आरोपांनी खळबळ
9
लग्नाची मागणी फेटाळली, रागीट युवकाने युवतीला टोचलं HIV संक्रमित इंजेक्शन, मग १ महिन्यांनी...
10
“प्रत्येक गोष्टीसाठी कोर्टाची पायरी चढू नका”; सुप्रीम कोर्टाने फेटाळल्या २५ जनहित यचिका
11
IPL 2026: वैभव सूर्यवंशी नावाचं वादळ थांबेना! मुंबई, सीएसकेनंतर विराटच्या आरसीबीलाही दाखवला हिसका
12
अंधश्रद्धेचा बळी! मुलीच्या मृत्यूनंतर ६ महिने अंत्यसंस्कार नाहीत; बापाच्या कृत्याने पोलीस हादरले
13
Video - किती गोड! बीट, ब्रोकली, स्ट्रॉबेरी... पप्पांनी केला लाडक्या लेकीचा 'नॅचरल' मेकअप
14
"खरातमुळे दिल्लीत आमची चेष्टा होतेय, महाराष्ट्राचं हसू झालंय"; भोंदू बाबाच्या कृत्यांवर सुप्रिया सुळे संतापल्या
15
पतीच्या डोळ्यासमोरच बुडत होती पत्नी, पण...; बोट दुर्घटनेमुळे हसतं-खेळतं कुटुंब झालं उद्ध्वस्त
16
Gold Price Today: महिन्याभरात सोनं १०,१३१ रुपयांनी झालं स्वस्त; चांदी ३२,८९६ रुपयांनी घसरली; पाहा काय आहे नवी किंमत?
17
मराठवाडा हादरला! हिंगोली, परभणी आणि नांदेड जिल्ह्यांना भूकंपाचे सौम्य धक्के; नागरिकांची घराबाहेर धाव
18
कस्टम ऑफिसर बनून फिल्मी स्टाईलने १५ किलो सोन्याची लूट; दीड वर्ष रेकी, रचला भयंकर कट
19
Mathura Boat Tragedy : मथुरा दुर्घटनेआधीचा Video व्हायरल; बोट उलटण्यापूर्वी भजन-कीर्तनात तल्लीन होते भाविक
20
₹७.५ कोटींना खरेदी केलेलं अपार्टमेंट, ८.८७ कोटींना विकून कमावलं १८% प्रॉफिट; इनव्हेस्टमेंटचा 'टायगर' निघाला श्रॉफ
Daily Top 2Weekly Top 5

पालमसाठी १५ कोटींची पाणीपुरवठा योजना

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 5, 2021 06:03 IST

पालम : शहराला गेल्या अनेक वर्षांपासून पिण्याच्या पाण्याची समस्या भेडसावत आहे. हा प्रश्‍न सोडविण्यासाठी तत्कालिन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, ...

पालम : शहराला गेल्या अनेक वर्षांपासून पिण्याच्या पाण्याची समस्या भेडसावत आहे. हा प्रश्‍न सोडविण्यासाठी तत्कालिन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, पाणीपुरवठा मंत्री बबनराव लोणीकर यांनी पाणीपुरवठा योजना मंजूर केली असून, आगामी २० वर्ष पुरेल एवढ्या क्षमतेची ही योजना आहे, अशी माहिती भाजपचे राज्य कार्यकारिणी सदस्य गणेशराव रोकडे यांनी २७ जानेवारी रोजी दुपारी २ वाजता आयोजित पत्रकार परिषदेत दिली.

पालम शहराच्या विकासासाठी भाजप सरकारच्या काळात मोठ्या प्रमाणात निधी उपलब्ध झाला असून, येथील नगर पंचायतीच्या माध्यमातून शहराच्या विकासाची विविध कामे मार्गी लागली आहेत. पालम शहरासाठी १५ कोटी रुपयांच्या नळ योजनेच्या कामाला लवकरच सुरुवात होणार आहे. गेल्या वीस वर्षांपासून पालमच्या नागरिकांना पाण्यासाठी भटकंती करावी लागत होती. ही भटकंती आता संपणार आहे. शहरातील नागरिकांना सुविधा मिळाव्यात, यासाठी संपूर्ण शहरात सिमेंट रस्त्यांची कामे झाली असून, गल्लोगल्लीतील रस्त्यांचा प्रश्‍न आता पूर्णपणे मिटला आहे. विशेष करुन पालमवासीयांच्या जिव्हाळ्याचा प्रश्‍न असलेल्या पाणीपुरवठा योजनेसाठी गणेशराव रोकडे यांनी सातत्याने पाठपुरावा करुन तत्कालिन मंत्री बबनराव लोणीकर यांच्याकडून ही योजना मंजूर करुन घेतली. आता या योजनेच्या कामाला सुरुवात होत असून, आगामी २० वर्षे या पाणीपुरवठा योजनेद्वारे पालमकरांना मुबलक प्रमाणात पाणीपुरवठा होणार आहे. तीन नवीन पाण्याच्या टाक्यांद्वारे शहराला पाणीपुरवठा केला जाणार आहे.

पालम शहराचा विकास हाच आपला ध्यास असून, शहराच्या विकासासाठी आपण नेहमीच आग्रही राहिलो असून, आपण केलेल्या सततच्या पाठपुराव्यामुळे पालमकरांना ही पाणीपुरवठा योजना मिळाली असल्याचेही रोकडे यांनी सांगितले. या सर्व कामामध्ये नगराध्यक्ष बाळासाहेब रोकडे, अनिताताई हतिअंबीरे, नगरसेवक यांचाही मोलाचा वाटा आहे. या पत्रकार परिषदेला नगराध्यक्ष बाळासाहेब रोकडे, लक्ष्मण रोकडे, नगसेवक असदखाँ पठाण, आजीम पठाण, विजय घोरपडे, ऊबेदखाँ पठाण आदी उपस्थित होते.