शहरं
Join us  
Trending Stories
1
मालेगाव स्फोटातून मुक्तता झाल्यानंतर कर्नल पुरोहित यांचे मोठे प्रमोशन; आता ब्रिगेडियर पदावर होणार पदोन्नती
2
"माझे कॉल रेकॉर्ड तपासा, हिंमत असेल तर फोटो दाखवा; अरविंद सावंतांनी लिहून दिला निष्ठेचा पुरावा
3
'अमेरिकेने मूर्खपणा करू नये, नेतान्याहूंच्या जाळ्यात अडकू नये...'; इराणचा थेट इशारा!
4
बीएसएनएल पुन्हा मार्केटमध्ये परतली...! Jio आणि Airtel ला टाकलं मागे; ठरली देशातील नंबर-१ कंपनी
5
Latest Marathi News LIVE Updates: "गेल्या एक-दीड वर्षांपासून अशा...; ठाकरेंच्या खासदारांसोबतच्या बैठकीवर एकनाथ शिंदेंचे स्पष्टीकरण
6
“फडणवीसांकडून शिंदेंच्या पक्षाचे ऑपरेशन सुरू, आमचे सर्व खासदार एकत्र”; संजय राऊतांचा दावा
7
डोशाच्या पिठात विष कुणी कालवले? सख्ख्या पित्यावर पोलिसांचा संशय; घरामध्ये सापडल्या सल्फासच्या गोळ्या!
8
इस्रायलचा एक इशारा अन् पाकिस्तानचे संरक्षण मंत्री घाबरले! कॅन्सरची पोस्ट डिलीट केली
9
Stress Management: तणावमुक्त जगण्यासाठी थेरपीशिवाय मन प्रसन्न ठेवण्याचे काही सोपे आणि घरगुती उपाय
10
सोने, चांदी, फ्लॅट, गाड्या... सरकारी अधिकाऱ्याकडे कोट्यवधींचं घबाड; कमाईपेक्षा संपत्ती जास्त
11
Gold-Silver च्या दरात आजही मोठी घसरण; पाहा तुमच्या शहरात किती स्वस्त झालं सोनं? पाहा नवी किंमत
12
"रणवीर सिंहने पोटात स्टेपलर...", अनुराग कश्यपने अभिनेत्याचा किस्सा; 'धुरंधर'चा सीनही विसराल
13
हॉर्मुझबाबत इराणची नवी चाल, टोलवसुलीवर ठाम; अडवणुकीमुळे तणाव कायम,  सुप्रीम लीडर म्हणाले...
14
इस्लामाबाद ठरणार 'शांतीदूत'? इराण-अमेरिका संघर्षात पाकिस्तानची मोठी मध्यस्थी; जगभराचे लक्ष!
15
तो लय बेक्कार मारतो! Mukul Choudhary च्या वादळी खेळीनंतर Arjun Tendulkar चा 'तो' व्हिडिओ व्हायरल
16
IPL 2026: कोलकाताच्या तोंडातून विजयी घास हिसकावला; मुकुल चौधरीची फलंदाजी पाहून ऋषभ पंत गेला भारावून!
17
मोठी घडामोड, रशियाकडून युद्धविरामाची घोषणा; २ दिवस युक्रेन हल्ले नाही, अचानक नेमके काय घडले?
18
KKR vs LSG: "जास्त विचार करू नको, फक्त मार...!" ऋषभ पंतचा तो एक सल्ला मुकुल चौधरीसाठी 'गुरुमंत्र' ठरला; ईडन गार्डन्स गाजवलं 
19
मध्य पूर्वेतील संकटकाळात भारताचा मॉरिशसला मदतीचा हात; तेल आणि वायूचा पुरवठा करणार
20
“शशिकांत शिंदे हे मूळचे शिवसैनिक, शिवसेनेत आल्यास पहिले स्वागत मी करेन”; कुणी दिली ऑफर?
Daily Top 2Weekly Top 5

आंध्रातून आणलेला १२ किलो गांजा सेलूत पकडला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 30, 2021 04:21 IST

परभणी : चोरटी विक्री करण्यासाठी आंध्र प्रदेशातून आणलेला ११.९६७ किलो गांजा येथील स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने सेलू शहरातील फुलेनगर ...

परभणी : चोरटी विक्री करण्यासाठी आंध्र प्रदेशातून आणलेला ११.९६७ किलो गांजा येथील स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने सेलू शहरातील फुलेनगर भागात छापा टाकून जप्त केला. २९ एप्रिल रोजी पहाटे २.३० वाजण्याच्या सुमारास पोलिसांनी ही कारवाई केली.

स्थानिक गुन्हा अन्वेषण शाखेचे पोलीस उपनिरीक्षक चंद्रकांत पवार हे सेलू शहरात गस्त घालत असताना शहरातील फुलेनगर भागात एका घरामध्ये गांजा साठविल्याची माहिती त्यांना मिळाली. त्यानंतर चंद्रकांत पवार यांनी ही माहिती उपविभागीय पोलीस अधिकारी राजेंद्र पाल यांना दिली. या माहितीच्या आधारे पंचांसमक्ष छापा टाकण्याची तयारी करण्यात आली. २८ एप्रिल रोजी स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस उपनिरीक्षक चंद्रकांत पवार, विश्वास खोले, सुग्रीव केंद्रे, निलेश भुजबळ, अरुण पांचाळ, शंकर गायकवाड, अरुण कांबळे तसेच सेलू पोलीस ठाण्याचे निरीक्षक गोवर्धन भुमे, तहसीलदार बालाजी शेवाळे, सहायक निरीक्षक सरला गाडेकर यांच्यासह दोन शासकीय पंच घेऊन फुलेनगर परिसरामध्ये २९ एप्रिल रोजी

मध्यरात्री २ वाजता छापा टाकण्यात आला.

फुलेनगर परिसरातील संबंधित घरात जाऊन पोलिसांनी तपासणी केली, तेव्हा आरोपी मल्‍हारी रावसाहेब मुकणे याच्या घरामध्ये निळ्या रंगाच्या प्रवासी बॅगमध्ये गांजाची दोन पाकिटे आढळली. एका पाकिटामध्ये ६.०६७ ग्रॅम, तर दुस-या पाकिटामध्ये ५.९०० ग्रॅम असा एकूण ११.९६७ किलो गांजा पोलिसांनी या ठिकाणी जप्त केला. जप्त केलेल्या गांजाची किंमत १ लाख १९ हजार ६७० रुपये एवढी आहे. याप्रकरणी आरोपी मल्हारी रावसाहेब मुकणे यास पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. पोलीस उपनिरीक्षक विश्वास खोले यांच्या फिर्यादीवरून आरोपी मल्हारी मुकणे याच्याविरुद्ध सेलू पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

याप्रकरणी पोलिसांनी आरोपी मल्हारी मुकणे याच्याकडे विचारणा केली तेव्हा हा गांजा आंध्र प्रदेशातून चोरटी विक्री करण्याच्या उद्देशाने आणला असल्याचे त्याने कबूल केले. विशेष म्हणजे या पथकाने यापूर्वीही चरस, गांजाच्या विरोधात कारवाई केली असून, सेलूच्या आणखी एका कारवाईत याची भर पडली आहे.