गंगाखेड शहरात प्रत्येक शनिवारी जनावरांच्या खरेदी-विक्रीचे व्यवहार होतात. तालुक्यातील पशुपालक या बाजारपेठेतून पशुधनाची खरेदी करतात. कोरोनाचा प्रतिबंध करण्यासाठी जिल्हाधिकाऱ्यांनी जनावरांचे बाजारही बंद ठेवण्याचे आदेश दिले आहेत. मागील दहा महिन्यांपासून ही बाजारपेठ ठप्प आहे. गंगाखेड येथील जनावरांचा बाजार परिसरात प्रसिद्ध आहे. या ठिकाणी म्हैस, बैल, शेळ्या, गायींची खरेदी-विक्री मोठ्या प्रमाणात होते. दुधाच्या व्यवसायासाठी म्हशींची खरेदी करणाऱ्या व्यावसायिकांची संख्याही लक्षणीय आहे. प्रत्येक बाजारपेठेत साधारणत: ४० ते ५० लाख रुपयांपर्यंत उलाढाल होते. खरीप हंगाम जवळ आल्याने बैलांना मागणी वाढली आहे. या काळात बैलांची खरेदी वाढते. बैल जोडीच्या खरेदी-विक्रीतूनही मोठ्या प्रमाणात उलाढाल होते. फेब्रुवारी महिन्यापासून ही बाजारपेठ बंद आहे. या तीन महिन्यांत जवळपास १० आठवड्यांमध्ये या बाजारपेठेत सुमारे १० कोटींची उलाढाल ठप्प आहे.
जनावरांच्या विक्रीतून १० कोटींची उलाढाल थांबली
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 20, 2021 04:18 IST