- भाग्यश्री मुळे(भाग्यश्री ‘लोकमत’च्या नाशिक आवृत्तीत उपसंपादक/वार्ताहर आहे.)फिटनेसप्रेमींच्या जगातनाचत व्यायामाची नवी क्रेझआपण झुंबा शिकतोयम्हणजे डान्स शिकत नाही,डान्स क्लासला जात नाही,की जस्ट टाइमपास करत नाही.आपल्याला व्यायामप्रकार शिकून, आरोग्याचा विचार करायचा आहे, हे समजून घेऊनदिमाग की बत्ती वेळेवर पेटली नाहीतर फिटनेसची दांडी गूल होऊ शकते!झुंबा.या शब्दाची एक भन्नाट क्रेझ सध्या शहरी तारुण्यामध्ये दिसते. अनेकांना वाटतं (म्हणजे ज्यांना डेस्परेटली झुंबा शिकायचा आहे त्यांना पण), झुंबा हा एक डान्सप्रकार आहे. साल्सा नी बॉलिवूड डान्स, रॉक अॅण्ड रोल शिकायची क्रेझ असते त्यातलाच एक प्रकार. पण हे प्रकरण तसं नाही. झुंबा हा डान्स नाही, तर नृत्यावर आधारित व्यायामप्रकार आहे.म्हणजे काय, तर आपल्याला झुंबा शिकायचा पण डान्स शिकायचा नाही, तर व्यायामप्रकार शिकून फिटनेसचा विचार करायचा आहे. ही दिमाग की बत्ती वेळेवर पेटलेली असणं महत्त्वाचं! काहींची अर्थातच उशिरा पेटते आणि घोळ होतोच.घोळ काय तर कुठलाही व्यायामप्रकार आपण शिकतो तेव्हा तो केवळ हौसेपुरता उरत नाही तर त्याची एक विशिष्ट शिस्त असते, काही नियम असतात. ते सारं पाळलं नाही, तर दुष्परिणाम अटळ! मात्र क्रेझ वाढली आणि सगळे करतात म्हणून काहीतरी ‘हेप’ करायचं खूळ डोक्यात शिरलं तर माहिती न घेताच क्लासेस लावले जातात आणि नंतर पस्तावायची वेळ येते.आता परीक्षा संपल्या की हॉबी क्लासेस लावण्याचा सिझन येतो. या सिझनमध्ये अनेकांच्या लिस्टमध्ये हमखास आताशा झुंबा दिसतो. अनेक ठिकाणी तर तीन दिवसांचे फुकट वर्कशॉपही आयोजित केले जातात. त्यामुळे फुकट ते पौष्टिकच्या नादात अनेकजण हे क्लासेस लावतातही.आणि फसतात. पैशाला गंडा घातला जातोच पण व्यायामही चांगला होत नाही. त्यात आता लहानमोठ्या शहरामध्येही गल्लोगल्ली झुंबा क्लासेसचे बोर्ड दिसतात. कसलीही खातरजमा न करता केवळ उत्साहाच्या भरात अनेकजण तिथं क्लास लावतात. मात्र असा आततायीपणा न करता, आपल्याला जे शिकायचं त्याची माहिती करून घेणं, शिकण्यासाठीचा वेळ देणं, व्यायामाची रोजची शिस्त शिकणं हे सारं यातही महत्त्वाचं आहेच.म्हणून ही चर्चा झुंबाची!जर तुम्ही झुंबा शिकणारच असाल, तर तुम्हाला काही गोष्टी माहिती हव्याच!झुंबा कुणासाठी? - सगळ्यांसाठी!!कितीही पोषक आहार घेतला आणि लाइफस्टाइल सांभाळली पण व्यायाम नाही केला तर मात्र आपलं शरीर लवकर थकतं. सकाळी टवटवीत फुलाप्रमाणं असणारं आपलं शरीर सायंकाळी मान टाकलेल्या फुलासारखं गळून गेलेले दिसतं. आणि मग जो तो म्हणतो, यार स्टॅमिना वाढवायला हवा. तो स्टॅमिना वाढवण्यासाठीच अनेकजण व्यायाम करतात, काहीजण सायकलिंग करतात आणि आताशा काहीजण झुंबा या नृत्याचा आनंद देणाऱ्या आणि नकळतपणे सगळ्या शरीराचा व्यायाम करून घेणाऱ्या प्रकाराकडे वळू लागले आहेत. सुडौलता, हाडांना बळकटी, स्टॅमिना आणि मुख्य म्हणजे अपार आनंद या गोष्टी कमी वेळेत मिळतात असं झुंबा करणाऱ्यांचं म्हणणं आहे. म्हणून तर सध्या जगभर या झुंबाचा प्रचारप्रसार होतो आहे. आणि विशेष म्हणजे, सर्व प्रकारच्या बॉडी टाइपची माणसं हा झुंबा करू शकतात. * ज्यांचं वजन कमी आहे, ज्यांचं वजन थोडं जास्त आहे, किंवा जास्तकमी काही नाही, फक्त व्यायाम करायचा आहे अशा सर्व प्रकारची शरीरयष्टी असलेल्या तरुण-तरुणींना झुंबा शिकता येतो, करता येतो. * या व्यायामप्रकारामुळे शरीर लवचिक होण्यास मदत होते. प्रामुख्याने पाय, मांड्या, हात, कंबर आणि शरीरातील सर्व स्नायूंना व्यायाम होतो. हृदयाची गती वाढणे, शरीरात खूप ऊर्जा निर्माण होणे आणि शरीर फीट होणे असे फायदे या व्यायामप्रकारात होतात. इतर यंत्राधारित व्यायामांप्रमाणे झुंबा मध्येच थांबविला तरी वजन वाढणं, तब्येत सुटणं आदि साइडइफेक्ट होत नाहीत. * हाडं बळकट होऊन शरीराची प्रतिकारशक्ती वाढते. लहान मुलांपासून म्हाताऱ्या व्यक्तींपर्यंत सर्व वयोगटासाठी वेगवेगळ्या प्रकारचा झुंबा तयार करण्यात आला आहे. लहान मुलांसाठीच्या झुंबाचे सॉँग आणि डान्स स्टेप वेगवेगळ्या असतात. तरुणाईसाठी त्यांच्यातील ऊर्जा, क्षमता आणि गरज पाहून त्यानुसार सॉँग आणि डान्स स्टेप वेगळे असतात. प्रौढांसाठीच्या झुंबात थोडा फरक केला जातो. त्यांचे वय आणि शरीराची स्थिती पाहून त्यानुसार गाणी आणि डान्स स्टेप निवडल्या जातात. * अर्थात म्हणूनच आपल्या वयानुरूपच झुंबा शिकायला हवा. * झुंबामध्ये संपूर्ण शरीराचा व्यायाम होईल अशी रचना असल्याने तो सलग आठवडाभर करून चालत नाही. त्यामुळे तुम्ही झुंबाबरोबरच जिमही करत असाल तर उत्तम. आठवड्यातून तीन दिवस झुंबा आणि तीन दिवस जिम असा समतोल साधावा. जिमऐवजी दररोज चालायला गेलं तरी हरकत नाही. हे प्रकार एकमेकांना पूरक ठरतात. क्लासमध्ये झुंबा झाल्यावर घरी परत करण्याची गरज नाही. क्लासमधला झुंबा पुरेसा असतो आणि तो शास्त्रोक्त पद्धतीने केलेला असेल तर दिवसाचा अपेक्षित कोटा पूर्ण झालेला असतो. त्यामुळे मनात आलं म्हणून नाचा असं करून चालत नाही.त्याची काही एक शिस्त असते, नियम असतात. मात्र सध्या तेच धाब्यावर बसवून झुंबा सर्रास केला जातो आहे.त्यासाठी ही चर्चा.. जोखीम टाळून अधिकाधिक चांगला झुंबा कसा करता येईल, याचं एक उत्तर!चुकतं काय?फसतं कोण?मुळात हे डोक्यातून काढून टाकलं पाहिजे की, हे ‘हेप’ प्रकरण मला आल्यानंच मी ‘मॉडर्न’ किंवा ‘फॅशनेबल’ असेल! याचा फॅशनशी नाही, तर डायरेक्ट आपल्या शरीराशी आणि परिणामी आरोग्याशी संबंध आहे हे लक्षात ठेवायला पाहिजे. आणि त्यामुळे पैसे वाचवण्याच्या नादात किंवा फॅशनच्या भरात नुस्तं सीडी लावून नाचायचंच तर आहे असं म्हणत जर आपण झुंबा शिकायला जात असू तर तिथंच आपली पहिली फसगत अटळ आहे. त्यामुळेच ही फसगत आणि काही चुका आपल्याला टाळता येतील का, हे बघायला हवं.१) झुंबा करताना चुकीच्या पोश्चरमध्ये उभे राहिल्यास गुडघ्यांना इजा होऊ शकते. चुकीच्या पोश्चरमध्ये नृत्य करत राहिल्यास त्याचाही परिणाम शरीरावर होतो आहे. २) त्या त्या वयोगटासाठी जे झुंबा क्लास तेच आपण आपल्या वयानुसार निवडायला हवेत. आणि जिथं हा क्लास चालतो तिथंही मिक्स वयोगटाचा एकत्र क्लास असता कामा नये. कारण विशीतल्या मुलीला जे व्यायामप्रकार जमतील ते चाळिशीत करून चालत नाही. त्यामुळे जिथं मिक्स वर्ग भरतो तिथं जाऊ नये. ३) झुंबा शिकण्यासाठी वयाची अट नाही. कुणीही झुंबा शिकू शकते. फक्त गुडघेदुखी, पाठदुखीचा त्रास असणाऱ्या व्यक्तींनी झुंबाच्या वाट्याला जाऊ नये. कारण त्यामुळे आपल्या त्रासात आणखी भर पडू शकते. ४) जे अती स्थूल आहेत त्यांनी डायरेक्ट झुंबा सुरू करू नये. वजन प्रमाणापेक्षा खूप जास्त असेल तर नाचण्याचा ताण पायांवर, गुडघ्यावर येऊ शकतो. त्यामुळे आधी वेगळे व्यायामप्रकार करून मग झुंबा शिकणं उत्तम. ५) झुंबा क्लासव्यतिरिक्त घरी वा इतर कुठे सराव करण्याची अजिबात गरज नाही. कारण झुंबा डान्स हा झुंबाच्या ठरावीक गाण्यांवरच केला जातो. झुंबा अकॅडमीकडून पुरविलेल्या अधिकृत सीडीवरच त्याचा क्लास घेतला जातो. ही सीडी आॅन आॅफ करण्याची सिस्टीम एखाद्या पैशाच्या तिजोरीप्रमाणे लॉक केली जाते. प्रशिक्षकाखेरीज कुणी ती ओपन अथवा प्ले करू नये असा दंडक असतो. अतिउत्साही विद्यार्थी ती गाणी कॉपी करून आपल्या सीडीत घेऊ इच्छितात. क्लासमध्ये नाही मिळाले तर ते यू ट्यूबवरून डाउनलोड करण्याचा प्रयत्न करतात. प्रशिक्षकाच्या मार्गदर्शनाखेरीज झुंबा करणं घातक ठरू शकतं.६) झुंबाचा क्लास पूर्ण केल्यानंतर पास नापास असं काही नसतं. प्रमाणपत्रही दिलं जात नाही. तुमचं शरीर आणि मन यांच्यावर झालेला चांगला परिणाम हेच या झुंबा करण्याचं यश मानलं जातं.झुंबा शिकायचा,पण कुणाकडून?* लायसन्सप्राप्त, उत्तम प्रशिक्षित व्यक्तीकडूनच झुंबा शिकायला हवा. * आपल्या आरोग्याचा इतिहास, तक्रारी, वय, गरज समजून घेऊन झुंबाप्रकार सुचवला जातो की काहीतरी गाणी लावून सुरू होतं प्रशिक्षण, हे जरा बारकाईनं तपासून पाहा.* झुंबा करताना कुणाला गुडघेदुखीचा त्रास झाला तर तिथल्या तिथे काही उपचार करून ती गुडघेदुखी सेटल करता येते का प्रशिक्षकाला, हे तपासा. कारण ते फार महत्त्वाचं आहे.* झुंबा केल्यामुळे गुडघेदुखी मागे लागली असं व्हायला नको. भविष्यात गंभीर आजार जडायला नकोत त्यासाठी काय करायचं याचं पूर्ण ज्ञान उत्तम प्रशिक्षित, लायसन्सप्राप्त झुंबा प्रशिक्षकाला असतं. त्यामुळे त्याच्याकडून ही सारी माहिती समजावून घ्या.* प्रत्येक विद्यार्थ्याकडे क्लासमध्ये व्यक्तिगत लक्ष दिलं जातं का, हे विचारा. कारण तसं पूर्ण अटेन्शन मिळालं तरच झुंबा उत्तम करता येऊ शकतो. * झुंबा प्रशिक्षक जरा पुरेसा तज्ज्ञ नसेल तर तो सांगतो की, तुम्ही एक गाण्यापुरती विश्रांती घ्या, बाजूला बसा. गुडघा दुखतोय तर दोन- तीन दिवस क्लासला येऊ नका. पण असे सल्ले हे काही उत्तम प्रशिक्षकाचे लक्षण नाही. * प्रशिक्षित झुंबा प्रशिक्षक एका बॅचमध्ये कमीत कमी विद्यार्थी आणि सहायक प्रशिक्षक ठेवतात, जेणेकरून प्रत्येक विद्यार्थ्याकडे नीट लक्ष देता येईल. * क्लासमध्ये चारीबाजूने आरसे लावलेले असले पाहिजे जेणेकरून विद्यार्थ्यांना प्रशिक्षक व प्रशिक्षकांना विद्यार्थ्यांचे नृत्य, त्यातील चुका तत्काळ लक्षात येतात. * भराभर सेशन संपवणं, व्यायामप्रकाराची माहिती न देता व्यायाम करवणं, विद्यार्थी सगळं व्यवस्थित करत आहेत की नाही हे न तपासता केवळ घड्याळाच्या काट्यावर धावणं हे सारं जिथं घडतं, त्या झुंबा क्लासच्या दिशेनं न फिरकलेलं बरं! * मान्यताप्राप्त झुंबा प्रशिक्षक प्रत्येक विद्यार्थ्याचं रेकॉर्ड ठेवतात. त्याचं वजन किती कमी झालं किंवा वाढलं, त्याचा स्टॅमिना किती वाढला, कमी तर नाही ना झाला? घेर किती कमी झाला की वाढला? या साऱ्या गोष्टींची सूक्ष्म नोंद ठेवतो. वेळोवेळी विद्यार्थ्यांशी बोलून, त्यांच्या प्रतिक्रिया जाणून घेऊन त्यांना त्याप्रमाणे मार्गदर्शन करतो.* हे सारं तपासून मगच झुंबा क्लास लावणं योग्य!नव्या करिअरची वाट..कोलंबियातून उगम पावून जगभर लोकप्रिय झालेल्या झुंबाच्या भारतातील नियंत्रणाची जबाबदारी मुंबईस्थित सुचेता पाल यांच्याकडे आहे. वर्षाचे तीनशे पासष्ट दिवस सुचेता भारताच्या विविध भागांमध्ये झुंबाचे बेसिक ते अॅडव्हान्स सर्व प्रकारचे प्रशिक्षण व लायसन्स देण्याचे काम करतात. हैदराबाद, पुणे, मुंबई अशा ठिकठिकाणी हे प्रशिक्षण शिबिरे चालतात. यासाठी झुंबाच्या संकेतस्थळावरच सर्व काही नियोजन आॅनलाइन केले जाते. ज्यांना प्रशिक्षण घ्यायची इच्छा आहे अशांनी संकेतस्थळावर अपडेट्स सातत्यानं पाहत राहणं अपेक्षित असतं. त्यावर प्रशिक्षणाचं ठिकाण, वेळ, फी आदि दिले जाते. आॅनलाइन नावनोंदणी, आॅनलाइन फी भरून प्रवेश निश्चित होतो.आणि ज्यांना यात करिअर करायचं त्यांच्याकडे झुंबाचं लायसन्स असणं गरजेचं असतं. झुंबाचं रीतसर प्रशिक्षण घेऊन लायसन्स मिळविल्यानंतर करिअर म्हणूनही हे काम करता येतं. त्यातून पुढे स्वत:चा झुंबा क्लास सुरू करता येऊ शकतो किंवा मोठ्या जिममध्ये, हॉटेलात झुंबा इन्स्ट्रक्टर म्हणून नोकरीही मिळू शकते. महिन्याला २५ हजार ते दोन लाख रुपयांपर्यंत कमाई अनेक झुंबा टीचर सध्या करत आहेत. आणि या व्यायामप्रकाराची क्रेझ आणि फिटनेसच्या तक्रारीही वाढतच जाणार असल्याने झुंबाला मागणी वाढेल असं या क्षेत्रात काम करणाऱ्यांचं म्हणणं आहे. त्यामुळे आवड आणि गती असेल, कामाप्रती पुरेसा प्रामाणिकपणा असेल तर हे एक नवीन करिअर चांगला पर्याय ठरू शकतं. स्टॅमिना, स्नायूंची लवचिकता, वजन नियंत्रणात ठेवणं, मानसिक ताणतणावांपासून मुक्ती आणि आपलं ध्येय प्राप्त करण्यासाठी मिळवण्याची उत्साही ऊर्जा या साऱ्या गोष्टी देणारा झुंबा तरुणाईसाठी खूप उपयुक्त आहे. फक्त त्याकडे गमतीचा व्यायाम म्हणून न पाहता गांभीर्यानं पाहायला हवं. आणि त्याची शिस्त सांभाळून मनापासून ते शिकायलाही हवं. तसं केलं तर जगणं अधिक फिट होऊ शकतं!- पूनम आचार्य, झुंबा प्रशिक्षककुठलेही साइड इफेक्ट नसणारा आणि अपार आनंद देणारा सर्वांगसुंदर व्यायामप्रकार म्हणजे झुंबा. मात्र अप्रशिक्षित प्रशिक्षक कसंबसं शिकवत असल्यानं तो बदनाम होतो आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांनीच जागरूक होत उत्तम क्लास निवडला पाहिजे. - अंकिता पारीकसर्टिफाइड झुंबा इन्स्ट्रक्टर
झुंबा
By admin | Updated: March 17, 2016 22:15 IST