शहरं
Join us  
Trending Stories
1
एनआयए ऑन द स्पॉट : हल्ल्याचे धागेदोरे तपासणे सुरू, फॉरेन्सिक टीमही घटनास्थळी
2
आजचे राशीभविष्य, २८ एप्रिल २०२५: नोकरीत पदोन्नती अन् व्यापारात व उत्पन्नात वाढ होईल
3
हल्ल्याची छायाचित्रे पाहून भारतीयांचे रक्त उसळते आहे; दहशतवाद्यांना होईल शिक्षा, पीडितांना न्याय मिळेल : मोदी
4
संघर्ष, सीमेच्या ‘आतला’... अंतर्गत संघर्षाचा मुद्दा देशासाठी तेवढाच गंभीर
5
उल्हासनगर शहरात अजूनही १७ सिंधी पाकिस्तानी नागरिक; आज देश सोडून मायदेशात जाणार
6
बडतर्फ पीएसआय कासलेला हर्सूलला हलविले; कराड अन् कासले एकाच कोठडीत होते
7
सुगंध येण्यासाठी तांदळाला लावत होते केमिकल; एफडीएने दाेन दिवसानंतर दिली कारवाईची माहिती
8
सीईटीच्या मॅथ्स पेपरमध्ये घोळ, निम्मे पर्याय चुकीचे; विद्यार्थ्यांचा गोंधळ, सीईटी पर्यवेक्षकांचे कानावर हात
9
भारत-पाक सीमेवरील पीक काढणी दोन दिवसांत पूर्ण करा, सीमा सुरक्षा दलाचे सीमाभागातील शेतकऱ्यांना निर्देश
10
रक्त संतापाने उसळते आहे, आता बास! आम्ही भारतीय लोक पोकळ धमक्या देत नसतो
11
ईडी कार्यालयाला आग; संशयाचा धूर , मुंबई साखर झोपेत असताना दुर्घटना, कारण अस्पष्ट
12
किती अधिकाऱ्यांना मंत्रालयात सुनावणीसाठी बोलावणार?
13
एनसीईआरटीच्या पाठ्यपुस्तकांतून मुघल, दिल्ली सल्तनतचे संदर्भ हटविले
14
गणेश नाईकांचा वारू शिंदेसेना रोखेल काय?; दोघेही एकमेकांना शह देण्याची संधी सोडत नाहीत
15
एकही पाकिस्तानी महाराष्ट्रात राहणार नाही : देवेंद्र फडणवीस
16
भारत-फ्रान्स यांच्यात आज होणार Rafale-M jetsचा करार; भारतीय नौदल होणार अधिक सामर्थ्यवान
17
DC vs RCB : भर मैदानात कोहली-केएल राहुल यांच्यात वाजलं? नेमकं काय घडलं? (VIDEO)
18
पाकिस्तानी नागरिकांनी दिलेल्या वेळेत भारत सोडला नाही तर बसणार मोठा दणका, काय होणार शिक्षा?
19
Shocking!! सायबर चौकात दहशत! कोल्हापुरात सराईत गुंडाकडून तलवारीने हल्ला; दोघे जखमी
20
राज्याला हादरवणाऱ्या शिक्षण घोटाळ्याची ईडीने मागविली माहिती; SIT गठीत करण्याच्या हालचालींना वेग

कामाचा मॅड झपाटा आहे तुमच्यात?

By admin | Updated: July 24, 2014 18:37 IST

पॅशन काय आहे तुमचं? हा प्रश्न कधी स्वत:ला विचारला आहे का?

पॅशन काय आहे तुमचं?
हा प्रश्न कधी स्वत:ला विचारला आहे का? 
नोकरी मागण्यासाठी येणार्‍या स्मार्ट-हुशार मुलांचाही या प्रश्नाशी काही संबंधच नसतो. त्यांनी घेतलेल्या शिक्षणाचा आणि पॅशनचा संबंध ते जोडतात, तसं सांगतातही.
पण ते नेहमी खरंच असतं असं नाही. अनेक जण तर पॅशन म्हणून काहीतरी थातूरमातूर सांगत वेळ मारून नेतात. पण आपलं पॅशन काय याचा त्यांनी काही विचारच केलेला नसतो. 
खरंतर ज्यानं त्यानं आपलं पॅशन काय हे जरा तपासायलाच हवं. पॅशन या शब्दाला आपण ‘झपाटलेपण’ असं म्हणू. ते जे आपलं झपाटलेपण आहे किंवा असतं ते आपल्या वृत्तीत दिसायला हवं, ते उपजत आहे असं वाटायला हवं. 
अमुक झालं म्हणून मी कमी झपाटलो, जास्त झपाटलो असं कधीच असू शकत नाही. असलाच तर माणूस झपाटलेला असतो किंवा नसतोच. आपण व्यवसाय म्हणून, नोकरी म्हणून जे निवडतो त्याच्यात आलं पाहिजे. जगलं पाहिजे, तर आपण इतरांपेक्षा वेगळे दिसतो. वेगळं काहीतरी करतो. पण म्हणजे काय, असा प्रश्न काही जणांना पडेलच. कॉलेजमध्ये आल्यानंतर मित्रमैत्रिणींसोबत टाइमपास करता, तेव्हा सारं विसरून एन्जॉय करता, तेही एकप्रकारचं झपाटलेपणच असतं. तेच आणि तेवढंच झपाटलेपण तुमच्या शिक्षणासाठी आणि त्यानंतर नोकरी-व्यवसायासाठी जर तुमच्यात असेल तर आजच्या घडीला तुम्हाला संधीची कमी नाही. 
दुर्दैवानं मुलाखतीच्या वेळेस आम्हाला हे झपाटलेपण, हे पॅशन, काहीतरी करण्याची धमक, हिंमत खूप कमी मुलांमध्ये दिसते. ‘चलता है’ म्हणत अनेक जण काम करतात.  खरंतर बरेच जण स्पर्धेमध्ये टिकण्यासाठी पात्र असतात. स्पर्धेत सरसही ठरतात. त्यांना कामंही मिळतात, पण आपलं पॅशन काय हेच त्यांना कळत नाही. स्पर्धेत टिकण्यासाठी काही जण तर आपलं पॅशन बाजूला ठेवून पैसे कमावून देणारी एखादी डिग्री घेतात, त्यांचा जीव त्या डिग्रीत, त्या कामात नाही हे स्पष्ट दिसतं. 
आजही बर्‍याच विद्यार्थ्यांचा आणि उमेदवारांचा त्यांच्या शिक्षणाबद्दल खूप मोठा गैरसमज असतो. इंजिनिअरिंग अथवा एमबीएची पदवी घेतली की आयुष्याचं सार्थक झालं आता नोकरी चालत येणार, असा त्यांचा समज असतो. पण नव्या काळात या डिग्य्रांकडे पाहून नोकर्‍या मिळणं बंद होतंय. डिग्य्रा अनेकांकडे आहेत, त्यानुसार पात्रही अनेक जण ठरतात. पण कामाविषयी पॅशन नसल्यानं त्यांना फक्त पैसे कमवण्याची संधी म्हणून कुणी का नोकरी द्यावी? आपण पैसे कमावण्यासाठी शिकतो असं वाटायला लागलं की आपल्या वृत्तीत ते झपाटलेपण झिरपतच नाही. आणि जे तुमच्यातच नाही ते तुम्ही मुलाखत घेणार्‍याला ओढूनताणून कसं दाखवला. हा उमेदवार जे करेन ते अगदी झपाटून करेन हा विश्‍वास मुलाखतकर्त्याला वाटला तरंच तुम्हाला यापुढे संधी मिळू शकेन.
बर्‍याचदा मी कॉलेजमध्ये विद्यार्थ्यांसोबत बोलतो तेव्हा अनेकांचे चेहरे निर्विकार असतात. वाटतं,  या क्लासमध्ये बसलेल्या मुलांना त्यांच्या आईवडिलांनी शिक्षणासाठी पाठवलं आणि शिक्षकांनी वर्गात बसवलं म्हणून ते नाईलाजानं बसलेत. पण त्याच ग्रुपमध्ये    २0 % मुलं अगदी पॅशनेटली ऐकत असतात, प्रश्न विचारतात. त्यांच्या प्रश्नातूनही त्यांचं करिअरबद्दल झपाटलेपण दिसतं.
 उत्तम संधी आणि उत्तम करिअरही फक्त या २0 टक्के मुलांनाच मिळणार आहे.
स्वत:ला विचारा, तुमचा नंबर या २0 टक्क्यांमध्ये आहे का? 
- विनोद बिडवाईक