शहरं
Join us  
Trending Stories
1
Trump Putin Call: '...तोपर्यंत युद्ध थांबवणार नाही'; व्लादिमीर पुतीन यांनी डोनाल्ड ट्रम्प यांना ठणकावलं
2
अमित शाह पुणे दौरा: झाडाझडतीत तरुणाकडे मिळाले पिस्तुल, पोलिसांनी केले जप्त
3
Pune Accident Video: कार थांबली, ते जवळ गेले अन् पाठीमागून...; काळजाचा ठोका चुकवणारा अपघात
4
Stock Market Today: शेअर बाजाराची फ्लॅट ओपनिंग; सेन्सेक्स ७० अंकांनी वधारला, मेटल-ऑटो शेअर्समध्ये घसरण
5
BJP New President: भाजपच्या राष्ट्रीय अध्यक्ष महिला? निर्मला सितारामन यांच्यासह 'ही' ३ नावे चर्चेत!
6
महाराष्ट्रात रजिस्ट्रेशन, चालवली बंगळुरूत; फरारीच्या मालकाला भरावा लागला १.४२ कोटींचा टॅक्स; प्रकरण काय?
7
Post Office च्या PPF स्कीममध्ये महिन्याला ₹२००० जमा कराल तर १५ वर्षांनंतर किती रक्कम मिळेल, पैसेही राहतील सुरक्षित
8
One Big Beautiful Bill Passed : डोनाल्ड ट्रम्प यांचा मोठा विजय, अमेरिकेच्या संसदेत 'वन बिग ब्यूटीफुल बिल' मंजूर; नेमकं काय आहे यात?
9
शेफाली जरीवालाच्या मृत्यूनंतर पती पराग त्यागीची डोळ्यात पाणी आणणारी पोस्ट, म्हणाला- "आजूबाजूच्या अफवांमध्ये.."
10
"गरीब हिंदूंना कशाला मारताय? हिंमत असेल तर नळबाजार, मोहम्मद अली रोड येथे जाऊन…’’, नितेश राणेंनी दिलं आव्हान 
11
"एअर इंडियाने कोलंबोला जातोय, इच्छापत्र बनवून ठेवलंय...", प्रसिद्ध अभिनेत्याने शेअर केला Video
12
Today Daily Horoscope: कोणत्या राशीला आज धनलाभाचा योग? जाणून घ्या तुमचे राशीभविष्य
13
‘लोकमत सरपंच अवॉर्ड’ विजेत्या गावांना प्रत्येकी २५ लाख; ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरे यांची घोषणा
14
पदवी आहे, पण काम भलतेच! नोकरीचे वास्तव; पीरियॉडिक लेबर फोर्स सर्व्हेमधून समोर
15
रायकर पाड्यातील विद्यार्थ्यांचा शाळेत जाण्यासाठी जीवघेणा प्रवास; वैतरणा नदी तराफ्यावरून करावी लागते पार
16
पुणे हादरले : घरात घुसून तरुणीवर बलात्कार, तिच्याच मोबाइलवर काढले फोटो ; संगणक अभियंता तरुणी राहात होती उच्चभ्रू सोसायटीत
17
उद्धव-राज : जुन्या जखमांचा हिशेब कसा होणार?
18
यूपीतील शेतकऱ्यांच्या नावे नांदेडमध्ये पीक विमा; ४० सुविधा केंद्र चालकांवर गुन्हा; त्यात ९ जण परळीचे
19
कार चालकाची चूक असल्यास भरपाई मिळणार नाही; सर्वोच्च न्यायालयाने दिले निर्देश
20
लंडनची डॉक्टर मैत्रीण पोलिसांच्या रडारवर; दादरमधील अत्याचार प्रकरणातील शिक्षिकेच्या वैद्यकीय चाचण्या पूर्ण; १४ दिवसांची न्यायालयीन कोठडी

पहचान कौन

By admin | Updated: April 2, 2015 18:10 IST

लग्न मग ते लव्ह असू देत नाहीतर अरेंज. जोडीदाराविषयी अपेक्षाच जास्त. आणि आता त्या

- लीना कुलकर्णी (विवाह समुपदेशक)
लग्न मग ते लव्ह असू देत नाहीतर अरेंज. जोडीदाराविषयी अपेक्षाच जास्त. आणि आता त्या अपेक्षाही काही पूर्वींसारख्या ‘टॉल-डार्क-हॅण्डसम’ आणि ‘सुंदर-सोज्वळ-सुशील’ या चौकटीतल्या राहिल्या नाहीत.
मुलीला नवरा म्हणून हवा असलेला मुलगा उत्तम करिअरवाला, चांगले पैसे कमावणारा, बायकोला समजून घेणारा, स्पेस देणारा, आपली मतं जोडीदारावर न लादणारा, कोणत्याही चौकटीत आणि बंधनात न अडकवणारा असा हवा असतो तर मुलांनाही बायको शिकलेली, नोकरी करणारी, पैसे कमावणारी, लग्नानंतर घरातल्या आणि बाहेरच्या जबाबदार्‍या स्वतंत्रपणे हाताळू शकणारी, आपल्या घरच्यांशी अँडजेस्ट करू शकणारी, घराच्यांचं आणि आपलं मन राखणारी, आपल्यात आणि आपल्या मित्र-परिवारात सहजपणे मिसळून जाणारी अशी हवी असते. 
ही अपेक्षांची यादी मोठी आहे कदाचित न संपणारीही. 
पण या सार्‍यात ‘जरा स्वत:विषयी सांग’ हा अवघड प्रश्न कुणी विचारलाच तर नाव-गाव-आवड-निवड-नोकरी यापुढे उत्तराची गाडी काही सरकत नाही.  आणि ज्या व्यक्तीला स्वत:लाच हे माहिती नाही की, आपण नेमके कसेय, ते जोडीदाराकडून अपेक्षा काही का बाळगेनात; स्वत:ला नेमकं काय हवंय हे त्यांना कळणं अवघडच!
तुम्हाला स्वत:ची ओळख व्हावी, आपल्याला स्वत:कडून, जगण्याकडून आणि जोडीदाराकडून नेमकं काय हवंय हे कळायला मदत व्हावी म्हणून हे काही प्रश्न. खरं तर परीक्षेच्या काळातले हे पेपरच; त्यांची उत्तरं तुमची तुम्ही सोडवा आणि तपासा, तुम्ही नेमके कुठं उभे आहात ते?
पेपर पहिला
स्वत:शी आहे ओळख?
१) मी कसा किंवा कशी आहे?
२) माझी जडणघडण कशी झाली आहे? त्याचा माझ्या विचारसरणीवर कोणता परिणाम झाला आहे?
३) माझ्या अवती-भवतीचा माझ्यावर चांगला-वाईट काय परिणाम झाला आहे?
४) माझी मूल्यं काय आहेत? माझे विचार सकारात्मक आहे की नकारात्मक? 
५) मला काय जमतं? काय जमत नाही?
हे प्रश्न स्वत:ला विचारले आणि खरी खरी उत्तरं दिली तर चटकन कळतील आपले स्टॉंग आणि विकपॉइंट! 
 
पेपर दुसरा
माझी लाइफस्टाइल कशी आहे?
लग्नाआधी नोकरी करणार्‍या मुलींना आई हातात डबा देते. लग्न झाल्यावर मात्र ऑफिसला जाताना डबा आयता हातात मिळत नाही. उलट कधी कधी सगळ्यांच्या हातात देऊन मग निघावं लागतं. लग्नानंतर ही कसरत करायला आपण तयार आहोत का?
लग्नाआधी मोबाइल, कम्प्युटर, फिल्म्स, मित्र, पाटर्य़ा हीच लाइफस्टाइल असलेल्या आपल्या आयुष्यात आता बायको म्हणून जी मुलगी येणार आहे तिला आपला वेळ द्यावा लागणार आहे, तिच्यासोबत आपली प्रत्येक गोष्ट शेअर करण्याची सवय लावावी लागणार आहे.  हे करणं आपल्याला सोपं जाणार की अवघड? 
असे लाइफस्टाइलबाबतचे प्रश्न विचारा स्वत:ला.
१) लग्नाआधीची माझी जीवनशैली कशी आहे?
२) लग्नानंतर माझी जीवनशैली किती बदलणार आहे?
३) लग्नानंतर आयुष्यात आलेल्या नवीन घराशी, घरातल्या माणसांशी, नवीन नात्यांशी मी जुळवून घेऊ शकेल का? जुळवून घेण्यासाठी मला काय करावं लागेल?
४) मी कोणत्या प्रकारच्या माणसांमध्ये राहू शकतो/शकते? कोणाशी आणि कोणत्या प्रकारच्या माणसांशी जुळवून घेऊ शकतो/ शकते? 
५) मला कसं कुटुंब हवं आहे? एकत्र की वेगळं?
या प्रश्नांमुळे आपल्या क्षमता जशा कळतात तशाच आपल्या र्मयादांचा अंदाजही येतो. फक्त या प्रश्नांची खरी उत्तरं द्या, स्थळ चांगलं असेल तर जमवू असं म्हणत स्वत:ला फसवू नका.
 
पेपर तिसरा
पैशाचं काय?
१) माझ्या आर्थिक सवयी कशा आहेत?
२) मला उधळपट्टी करायला आवडतं की काटकसर करायला?
३) लग्नानंतर माझ्या कोणत्या आर्थिक सवयींवर मला र्मयादा घालाव्या लागतील?
४) लग्नानंतर माझ्यावर कोणत्या नवीन आर्थिक जबाबदार्‍या पडतील आणि त्या मी कशा पार पाडेल?
आर्थिक सवयींचा विचार जर आधीच केला तर लग्नानंतर पैशांमुळे नात्यात निर्माण होणारी कचकच वेळीच टाळता येऊ शकते. 
 
पेपर चौथा
मी समाजात कसा वागतो? 
१) जात-पात-धर्म याकडे बघण्याचा माझा दृष्टिकोन खुला आहे की संकुचित आहे?
२) मी समाजप्रिय आहे की एकलकोंडा?
३) मी समाजात वावरताना कायदे पाळतो/पाळते की कायदे तोडतो/तोडते?
४) वीज-पाणीबचत याबाबत माझे विचार घरातल्या सवयी कशा आहेत?
५) मी इतरांचा आदर, नात्यांचा सन्मान करतो/करते का?
६) नवरा-बायको या नात्याकडे मी कसा बघतो/बघते? या नात्यातली आपल्याला समानता प्रिय आहे की बायको कानाखालचीच हवी असं मत आहे?
 
या प्रश्नातून आपली सामाजिक वृत्ती तपासता येते. खरं तर दोन विरुद्ध प्रकृतीच्या व्यक्ती उत्तमपणे आपलं सहजीवन जगू शकतात की नाही याचं उत्तर सामाजिक विचारसरणीतल्या या प्रश्नांच्या उत्तरात दडलेलं आहे. 
 
( शब्दांकन : माधुरी पेठकर)