शहरं
Join us  
Trending Stories
1
बिहार विधानसभा निवडणुकीचा फैसला; ५ कोटी मतांच्या मोजणीकडे देशाचे लक्ष! मतमोजणीची वेळ काय?
2
दिल्ली हल्ल्यापूर्वी पैसा आला कुठून? एनआयएसोबत ईडी करणार चौकशी, गृह मंत्रालयात उच्चस्तरीय बैठकीत झाला निर्णय
3
मराठी अधिकारी करणार दिल्लीच्या स्फोटाचा तपास
4
द. आफ्रिकेच्या फिरकीपुढे परीक्षा, पहिली कसोटी ईडनवर आजपासून, ‘डब्ल्यूटीसी’मध्ये स्थान बळकट करण्याची भारताकडे संधी
5
व्हाइट कॉलर टेरर मॉड्यूल : काश्मिरात १३ ठिकाणी छापे
6
वाचवा, वाचवा..! ट्रक क्लिनरची मदतीसाठी याचना, कार पूर्णपणे जळून खाक
7
नवले पूल पुन्हा 'डेथ स्पॉट'; कंटेनर अपघातातील ९ मृतांमध्ये एका कुटुंबाचा समावेश
8
गोळ्या झाडून व्यावसायिकाचा खून करणाऱ्या संशयितांच्या शोधात पाच पथके रवाना
9
नवले पुलावर मृत्यूचा तांडव..! कंटेनर ट्रॅव्हलवर पलटी, कार पेटली, आठ जणांचे बळी
10
दिल्ली कार बॉम्बस्फोटानंतर अल-फलाह विद्यापीठावर कारवाई, सदस्यत्व रद्द
11
इराणच्या जनतेत पसरलीये संतापाची लाट! खामेनींकडे फिरवली पाठ; नेमकं कारण काय?
12
लाल किल्ला ब्लास्ट : एक-दोन नव्हे, तब्बल 32 कारचा होणार होता वापर; दहशतवाद्यांनी आखला होता 'बाबरीचा' बदला घेण्याचा भयंकर कट
13
कारमधील सीएनजीचा स्फोट...? दोन कंटेनरमध्ये कार सापडून लागली आग 
14
अजून किती निष्पाप लोकांचे बळी घेणार? प्रशासन ठोस उपाययोजना कधी करणार? स्थानिकांचा सवाल
15
'माझ्या मृत्युला आईच जबाबदार, तिला कडक शिक्षा करा', सोलापुरात वकील तरुणाने बेडरुममध्येच संपवले आयुष्य
16
भाजपाला वनमंत्री गणेश नाईकांच्या जनता दरबाराचे बळ;  शिंदेसेनेच्या मंत्री सरनाईकना रोखण्यासाठी नाईक मैदानात 
17
दिल्लीनंतर आता मुंबईच्या आकाशावर जीपीएस स्पूफिंगचे सावट; सिग्नलमध्ये बिघाडबाबत एएआयने दिला इशारा
18
बिहारमध्ये NDA कडून मुख्यमंत्रीपदाची शपथ कोण घेणार? मतमोजणीपूर्वीच चिराग पासवान यांच्या पक्षाचा मोठा दावा!
19
'इलेक्ट्रिक व्हेईकल्सना प्रोत्साहन देण्यासाठी पेट्रोल-डिझेलवरील लग्झरी वाहनांवर...', सर्वोच्च न्यायालयाचा केंद्राला सल्ला
20
Pune Accident : नवले पुलावर भीषण अपघात; अनेक वाहनं पेटली..! बचावकार्य सुरू
Daily Top 2Weekly Top 5

कोल्हापूरच्या मातीत फुटबॉलचा थरार रंगतो तेव्हा..

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 15, 2018 14:21 IST

कोल्हापूरच्या रांगडय़ा मातीत फुटबॉलचा थरार रुजतोय. फुटबॉलचे संघच नाही, तर त्यांचे समर्थकही चुरशीनं इरेला पेटतात तेव्हा एक नवा गोल करायला हे शहर सज्ज होतं.

ठळक मुद्देभारतीय संघातून 17 वर्षाखालील विश्वचषक स्पर्धा खेळलेला एकमेव महाराष्ट्रीय फुटबॉलपटू अनिकेत जाधव याच मातीतून तयार झालेला आहे. तो प्रथम पुणे क्रीडा प्रबोधिनीतून शिक्षण घेतानाच पुणे एफसी व आता फुटबॉल महासंघाच्या ‘इंडियन अ‍ॅरोज’कडून आयलीग सामन्यांत खेळ करीत आहक्रीडा प्रबोधिनीचाच आणखी एक खेळाडू निखिल कदम हा पुणे एफसी, मुंबई एफसी व आता कोलकात्याचा नामांकित क्लब ‘मोहन बागान’कडून स्ट्रायकर म्हणून खेळत आहे. क्रीडा प्रबोधिनीचा तिसरा खेळाडू सुखदेव पाटील हाही येथीलच. तो पुणे एफसी, दिल्ली डेअर डेव्हिल्स आणि आता गोवा एफसी या नामांकित संघांकडून खेळत आहे. लोकल हिरो ‘हृषीकेश’ पाटाकडील तालीम मंडळाचा हृषीकेश मेथे पाटील याने पाच स्पर्धात 50हून अधिक गोलची नोंद केली आहे. स्ट्रायकर म्हणून तो संघात खेळतो. मॅच विनर म्हणून तो कोल्हापूरकरांच्या गळ्यातील ताईत बनला आहे. आयलीग संघाचीही स्थापना उद्योजक चंद्रकांत जाधव व ‘विफा’चे उपाध्यक्ष मालोजीराजे यांच्या पुढाकाराने ‘फुटबॉल क्लब कोल्हापूर सिटी’ या 13, 15 आणि 18 वर्षाखालील आयलीग संघाची स्थापना मे 2018 मध्ये करण्यात आली. या संघास स्पेनचा फुटबॉलपटू व व्यावसायिक फुटबॉल प्रशि

- सचिन भोसले

कोल्हापूर. असं म्हटलं की काय येतं डोळ्यांसमोर?बरंच काही, प्रत्येकाची यादी मोठी पण त्यात फुटबॉलचं नाव आहे का? नसेल तर कोल्हापूरच्या फुटबॉलच्या जगातही एक सफर करायला हवी. कोलकाता, गोवा याप्रमाणे कोल्हापुरातही आता सहा महिन्यांचा फुटबॉल हंगाम भरतो. यात लाखो रुपयांच्या बक्षिसांची लयलूट उत्कृष्ट खेळाडूंसह संघावर केली जाते. या हंगामात स्थानिक पातळीवरील लीग सामने पाहण्यासाठी दररोज सरासरी सात हजार तर अंतिम सामन्यासाठी 25 हजारांहून अधिक फुटबॉलप्रेमी हजेरी लावतात. ऑल इंडिया फुटबॉल महासंघासह नामांकित फुटबॉल प्रशिक्षकांनीही आता कोल्हापूरच्या या फुटबॉलप्रेमाची दखल घेतली आहे.  फुटबॉलच्या प्रेमासह स्टार फुटबॉलपटूंचे म्हणजे मेस्सी, नेमार, रोनॉल्डो, जिनेदिन जिदान यांचे चाहतेही इथं कमी नाहीत. एवढंच काय इथल्या नावाजलेल्या ‘पाटाकडील तालीम मंडळा’चे किटही ब्राझिलसारखं आहे. त्यांचा पारंपरिक प्रतिस्पर्धी दिलबहार तालीम, या मंडळाचेही किट अर्जेटिनासारखे आहे. फुटबॉलची पंढरी असे ज्या मैदानावरून बोलले जाते, अशा शाहू स्टेडियमवरील स्थानिक संघात सामने होतात तर इथं खेळाडूच काय पाठीराखेही इरेला पेटलेले दिसतात. 

 कोल्हापुरात रांगडय़ा कुस्तीबरोबर हा रांगडा फुटबॉलही आता मूळ धरतो आहे. अर्थात इतिहासातही या फुटबॉलच्या पाऊलखुणा दिसतात. कोल्हापूर संस्थानचे राजाराम छत्रपती महाराज यांच्या आश्रयाखाली मेजर जनरल शहाजी छत्रपती महाराज यांच्या मार्गदर्शनाखाली व क्रीडामहर्षी कै. मेघनाथ नागेशंकर यांच्या प्रयत्नातून कोल्हापुरात ‘कोल्हापूर स्पोर्ट्स असोसिएशन’  (केएसए) ही संस्था 8 एप्रिल 1940 रोजी स्थापन झाली. ‘बोलण्यापेक्षा कृती करा’ हे ब्रीदवाक्यही महाराजांनी अंगीकारलं. त्यानुसार सर्वच खेळांची मातृ संस्था म्हणून या संस्थेकडे पाहिलं जाऊ लागलं. विशेषतर्‍ फुटबॉल आणि केएसए हे समीकरणच बनून गेलं. फुटबॉल म्हटलं की हक्काचं मैदान हवंच, हे ओळखून केएसएचे तत्कालीन पेट्रन-इन-चिफ मेजर जनरल श्रीमंत शहाजी छत्रपती यांनी 1940-41 दरम्यान शहरातील ए, बी, सी, डी, ई असे पाच वॉर्डच्या संघांचे सामने लीग पद्धतीने घेतले होते. यात प्रथमच सी वॉर्ड संघाने अजिंक्यपदही पटकाविलं. अशा पद्धतीने कोल्हापूर फुटबॉलची मुहूर्तमेढ  रोवली गेली. तेव्हापासून केएसए लीग फुटबॉल स्पर्धाना प्रारंभ झाला. आजही तितकाच प्रतिसाद या लीग फुटबॉल स्पर्धाना लाभतो आहे. काळानुसार स्पर्धाचं प्रमाणही वाढत गेलं आणि फुटबॉलचे पाठीराखेही. कालांतरानं राज्यस्तरीय, राष्ट्रीय फुटबॉल स्पर्धाचे आयोजनही करण्यात येऊ लागले.  मैदानातही सुधारणा होऊन अत्याधुनिक पद्धतीचे स्टेडियमही बांधण्यात आलं. त्याची धुरा सध्याचे पेट्रन-इन-चिफ शाहू छत्रपती, वेस्टर्न इंडिया फुटबॉल असोसिएशनचे उपाध्यक्ष माजी आमदार मालोजीराजे, खासदार संभाजीराजे, ‘विफा’च्या महिला समिती अध्यक्षा मधुरिमाराजे यांच्याकडे आहे. विशेष म्हणजे खेळाडूंबरोबर ऑल इंडिया फुटबॉल फेडरेशनची सी व डी लायसन्स पंच परीक्षा उत्तीर्ण झालेले 48 पंचही येथे आहेत. फुटबॉल खेळणार्‍या या संघांमध्ये काही संघ मोठे नावाजलेले आहेत. पाटाकडील तालीम मंडळ (अ), (ब), शिवाजी तरुण मंडळ, दिलबहार तालीम मंडळ (अ), (ब), प्रॅक्टिस क्लब (अ) व (ब), बालगोपाल तालीम मंडळ, संध्यामठ तरुण मंडळ, खंडोबा तालीम मंडळ, साईनाथ, उत्तरेश्वर प्रासादिक वाघाची तालीम, संयुक्त जुना बुधवार पेठ तालीम मंडळ, कोल्हापूर पोलीस दल. या संघांत तुफान चुरस रंगते.  गेल्या पाच वर्षात केएसए लीग स्पर्धासह हंगामातील सर्व स्पर्धा पाटाकडील तालीम मंडळ (अ) या संघाने जिंकल्या आहेत. मानांकनातही प्रथम क्रमांक पटकाविला आहे. एकीकडे चुरशीचे मातब्बर संघ तयार होत आहेत दुसरीकडे पायाभूत सुविधाही उभ्या राहत आहेत. छत्रपती शाहू स्टेडियमची क्षमता 35 हजार प्रेक्षक बसण्याची आहे. नोव्हेंबर ते जूनर्पयतच्या हंगामात मानाची लीग व सहाहून अधिक स्पर्धेदरम्यान 200हून अधिक सामने या मैदानात खेळविले जातात. याच शाहू स्टेडियममध्ये  गेल्यावर्षी इंडियन वुमेन्स लीगमधील पात्रता फेरीचे सामने झाले. यात ईस्टर्न युनियन हा संघ विजयी झाला. या स्पर्धाना रसिकांतून भरभरून प्रतिसाद लाभला. कोल्हापूरच्या रांगडय़ा मातीत फुटबॉल रुजतोय, त्याला पोषकपूरक वातावरण मात्र मिळायला हवं.

sachinbhosale912@gmail.com

 

टॅग्स :Footballफुटबॉल