शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिकेच्या 'टॅरिफ'विरुद्ध चीन भारतासोबत उभा! चीनच्या राजदूताने डोनाल्ड ट्रम्प यांच्यावर टीका केली
2
"शेर हमेशा शेर ही रहता है..."  २०२६ ची निवडणूक स्वबळावर; DMK, भाजपासोबत युती नाही, विजयची घोषणा
3
१८ किमी अंतर, २० मिनिटांचा वेळ...फिल्मी स्टाईलनं अर्चना तिवारीनं बदलला लूक, CCTV मध्ये कैद
4
रेल्वे प्रवाशांना नियमापेक्षा जास्त सामानावर दंड भरावा लागणार? रेल्वेमंत्री वैष्णव म्हणाले...
5
रशियन सैन्यात अजूनही भारतीय...एस जयशंकर यांची रशियाकडे मागणी; 'मॉस्को'नेही दिला शब्द
6
धुळे: तरुण-तरुणीचं होतं जीवापाड प्रेम, पण घरच्यांनी...; लग्नाला चार वर्ष झाल्यानंतर एकत्रच मृत्यूला कवटाळले 
7
KGF Gold Mine : KGF मधून आतापर्यंत किती सोने काढले? आकडा ऐकून धक्का बसेल, भारतातील सर्वात खोल खाण
8
नागपुरात ‘छम छम बार’, अश्लील नृत्य करणाऱ्या ‘डान्सर्स’वर पैशांची उधळण; २५ जणांविरोधात गुन्हा
9
'रशियाकडून भारत नाही, चीन सर्वाधिक तेल खरेदी करतो', जयशंकर यांचा अमेरिकेवर निशाणा
10
हे महाराष्ट्रात घडलं! ताटात उष्टे अन्न ठेवले म्हणून मुलाने वडिलांचे कुऱ्हाडीने केले तुकडे, पोत्यात भरून...
11
मोठी बातमी! पालघरमधील मेलोडी फार्मा कंपनीमध्ये वायू गळती; चार जणांचा मृत्यू
12
ट्रम्प खोटारडे निघाले! अमेरिकेच्याच दूतावासाने उघडे पाडले; भारतात निवडणूक फंडिंग केल्याचा केलेला दावा
13
२ लग्नानंतरही 'ती' थांबली नाही, तिसऱ्यासाठी दबाव टाकला; माजी सरपंचाशी वैर महिलेला जीवावर बेतलं
14
कोकणात जाणाऱ्या गणेशभक्तांसाठी टोलमाफीची घोषणा; वाहनधारकांना कुठे मिळणार विशेष पास?
15
Shreyas Iyer: बापानं व्यक्त केलं लेकाच्या मनातील दु:ख! कॅप्टन्सीची इच्छा नाही; फक्त संघात घ्या!
16
नागपुरात आई अन् मुलानेच सुरू केलं सेक्स रॅकेट, व्हॉट्सअ‍ॅपवर फोटो पाठवायचे; रात्री...
17
12th Pass Job: बारावी उत्तीर्णांसाठी हायकोर्टात चांगल्या पगाराची नोकरी; ८१,१०० पर्यंत पगार मिळणार!
18
स्वतःच्याच जाळ्यात अडकले डोनाल्ड ट्रम्प...! अमेरिकेत याच वर्षात 446 कंपन्या झाल्या दिवाळखोर!
19
मोदी सरकारच्या टार्गेटवर कोण?; दोषी PM, CM, मंत्र्यांना पदावरून हटवणाऱ्या विधेयकाची इनसाइड स्टोरी
20
'मुघल आणि ब्रिटिशांनंतर जे काही उरले, काँग्रेस-सपाने लुटले', योगी आदित्यनाथांची बोचरी टीका

तरुण मुलं का म्हणतात ‘नसलं’ तरी काय बिघडतं?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 26, 2019 07:30 IST

अलीकडेच गोल्डमन सॅश या ख्यातनाम संस्थेने अमेरिकेत केलेल्या एका सर्वेक्षणातून अमेरिकेतील मिलेनिअल्स पिढीचे प्राधान्यक्रम समोर आले आहेत. बारकाईने वाचाल तर लक्षात येईल, की भारतातल्या निदान एक विशिष्ट आर्थिक वर्गातल्या मिलेनिअल्सचं चित्र याहून फार वेगळं नाही..

ठळक मुद्दे त्यांना  ‘अनुभव’ घेण्यासाठी पैसे खर्च करायचे आहेत, त्यामानाने ‘वस्तूं’चा सोस त्यांना  नाही.

ऑक्सिजन  टीम 

मिलेनिअल्सच्या आई-बाबांच्या पिढीत इच्छा आणि गरजांची मोठी यादी होती. घर-गाडी-टीव्ही-फ्रीज-सोफा-वॉशिंग मशीन-गरम पाण्याचं गिझर हे सारं त्यांच्या ‘हवंच’ यादीत होतं. ते कमावलं म्हणजे आपण काहीतरी कमावलं असा त्यांचा आग्रह होता.आता मिलेनिअल्सचं म्हणणं आहे की, हे हवंच असं काही नाही, नसलं तरी चालेल. जमलं तर घेऊ, नसलं तरी काही बिघडत नाही.

गाडी हवी; पण ‘मालकीची’ कशाला?आपल्या दारात  आपल्या मालकीची चारचाकी गाडी हवी, असं स्वपA आधीच्या पिढय़ांनी पाहिलं. मिलेनिअल्सना सुलभ प्रवासाची सोय म्हणून गाडी हवी आहे; पण ती ‘आपल्याच मालकीची’ असली पाहिजे, असा या पिढीचा हट्ट नाही.30 टक्के मिलेनिअल्स म्हणतात, भविष्यात आम्ही कधीच गाडी घेणार नाही, त्याची गरज नाही. 25 टक्के म्हणतात, फारच गरज निर्माण झाली तर घेऊ, नाही तर नाही. 25 टक्के मिलेनिअल्ससाठी मालकीची गाडी ही प्रायॉरिटी नाही.

घर हवं; पण ‘मालकीचं’ कशाला?49 टक्के मिलेनिअल्स म्हणतात, घर हवंच ! 30 टक्के म्हणतात, घर हवंच; पण ते मालकीचंच हवं, याची काही गरज नाही. 15 टक्के म्हणतात, कर्ज काढून भविष्यात मालकीचं घर घेण्याचा अजिबात विचार नाही.

विकत कशाला?- भाडय़ानं घ्या !मिलेनिअल्सच्या आयुष्याचा हा जणू मूलमंत्रच आहे र्‍ विकत कशाला, भाडय़ाने घ्या ! एखादी वस्तू, सेवा वापरायला त्यांची ना नाही; पण ती विकतच घ्यायला हवी, त्यात इमोशनल गुंतवणूक करायला हवी हे त्यांना गरजेचं  वाटत नाही.

सोय हवी, मालकी नको!चारचाकी कार, मोठं घर, लक्झरी वस्तूंचा वापर हे कुणाला नकोय? पण ते मालकीचं असावं असं (अमेरिकन) मिलेनिअल्सं म्हणत नाहीत. सव्र्हिसेस म्हणून हे सारं भाडय़ानं, तात्पुरत्या वापरासाठी घेणं, परत करणं, नवीन घेणं हे चक्र त्यांना सोयीचं वाटतं. मालकी, त्यासाठी मोठी रक्कम देणं, हे त्यांना ओझं वाटतं. लगA, मूल, स्वतर्‍चं घर, गाडी हे सारं त्यांच्या आयुष्यात लांबणीवर पडताना दिसतं.  ‘अनुभव’ हवेत,  ‘वस्तू’ नकोत!पैसे मिळविण्यासाठी अतोनात कष्ट करून, ते साठवून मालकीच्या  ‘वस्तू’ - म्हणजे घर, गाडी, दागिने जमवणं ही आधीच्या पिढय़ांच्या सुखाची व्याख्या होती. मिलेनिअल्स हे सूत्रच बदलायला निघाले आहेत. त्यांना  ‘अनुभव’ घेण्यासाठी पैसे खर्च करायचे आहेत, त्यामानाने ‘वस्तूं’चा सोस त्यांना  नाही.