शहरं
Join us  
Trending Stories
1
"पुढील २४ ते ३६ तासांत...", पाकिस्तानी मंत्र्यांची झोप उडाली; मध्यरात्री घेतली पत्रकार परिषद
2
पहलगाम हल्ल्याला प्रत्युत्तर द्यायला सैन्याला संपूर्ण मुभा; पंतप्रधान नरेंद्र मोदींचा कठोर पवित्रा
3
आजचे राशीभविष्य, ३० एप्रिल २०२५: उत्पन्न वाढेल, इतर मार्गानी पण आर्थिक लाभ होतील
4
आरटीआय अर्ज अन् उत्तरेही वेबसाइटवरच; मुख्यमंत्र्यांच्या चिंतेनंतर माहिती आयुक्तांचे निर्देश
5
इलेक्ट्रिक वाहनांना मिळेल करात सूट आणि टोलमाफी; राज्य सरकारने जाहीर केले ईव्ही धोरण
6
लेकीच्या डोईवर अक्षता टाकून वधुपित्याने लग्न मांडवातच सोडले प्राण
7
एक रुपयात विम्याची योजना अखेर गुंडाळली; राज्यामध्ये आता पूर्वीचीच पीक विमा योजना लागू करणार
8
पुण्यातील बी. जे. मेडिकल कॉलेजमध्ये रॅगिंग; मंत्रालयातून चक्रे फिरल्यावर घेतली दखल
9
नस कापली... नंतर गळा चिरून डॉक्टरची आत्महत्या; डॉ. वळसंगकरांनंतर १२ दिवसांत दुसरी घटना
10
हवाई सीमेवर बंदी पाकच्याच मुळावर; पाकिस्तानच उत्पन्न स्रोत बंद होणार
11
अतिरेक्यांविरोधात स्पायवेअर वापरात चूक काय? पेगॅससप्रकरणी सुप्रीम कोर्टाने केला सवाल
12
शुभ मुहूर्तावर सोनेखरेदीसाठी बाजार सज्ज; अमेरिकन टॅरिफमुळे आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत चढ-उतार
13
फिअरलेस ‘वैभव’; ‘एक बिहारी सौ पर भारी!’ म्हणत १४ वर्षांच्या वैभव सूर्यवंशीचं शतकी यश
14
‘सोन्या’चे तात्पर्य?- बायका पुरुषांपेक्षा हुशारच!
15
ग्राहकांना योग्य किमतीत वीज मिळूच नये की काय?
16
अक्षय्य तृतीयेच्या पूर्वसंध्येला नागपूर जिल्ह्यात दोन बालविवाह; काटोल, कन्हान हद्दीतील घटना
17
ड्रग्जमाफियांनी पोखरली मुंबई विमानतळाची सुरक्षा; ड्रग्जचे पार्सल करायचे क्लिअर : कस्टम अधीक्षकासह दोन पोलिसांना अटक
18
ब्रेकरने खड्डे करत फाउंडेशन केले मजबूत! क्रीडा संकुलातील महिलांच्या ओपन जीमची नव्याने दुरुस्ती
19
आता पाकिस्तानची खैर नाही! पीएम मोदींचे सैन्याला फ्री हँड, उच्चस्तरीय बैठकीत ठरली रणनीती
20
जय हिंद म्हणत अतुल कुलकर्णीं यांनी लाल चौकातून देशवासीयांना दिला जबरदस्त संदेश, म्हणाले...  

तरुण मुलांनी लॉकडाउनमध्ये घरी राहून नेमकं केलं काय ?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 21, 2020 16:21 IST

लॉकडाउनमुळे परीक्षा टळल्या, वरच्या वर्गात सहज अनेकजण ढकलले गेले; मात्र या मिळालेल्या सुटीत तरुण मुलामुलींनी केलं काय? हे शोधणारं एक सर्वेक्षण.

ठळक मुद्देसतत बाहेर फिरणारी तरुणाई लॉकडाउन कृपेने घरात बांधली गेली.

- प्राजक्ता नागपुरे

‘जग कोरोना विषाणूशी लढत असताना, भारतातील उत्साही आणि  नव्या विचारांचे तरु ण, निरोगी आणि समृद्ध भविष्याचा मार्ग दाखवू शकतील.’- असं ट्विट पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केलं होतं.मात्र खरोखरच कोरोना कोंडीच्या या संकटात नव्या उमेदीनं स्वत:चं आयुष्य उभारायचं म्हणून कामाला लागलेत की हातावर हात धरून, मनात कुढत बसलेत.सोशल मीडियात बोलतात खूप की प्रत्यक्षात खरंच काही कृती करत आहेत?याचाचा शोध घ्यायचा आणि टाळेबंदीकडे तरुण कोरत्या दृष्टिकोनातून बघतात याचा अभ्यास करायचा असं ठरवलं. नाशिकच्या एचपीटी महाविद्यालयातील जनसंज्ञापन आणि पत्रकारिता विभागात शिकत असताना विभागप्रमुख डॉ. वृन्दा भार्गवे यांच्या मार्गदर्शनाखाली हा अभ्यास केला.विषय होता, ‘लॉकडाउनमधील तरु णाई’.कट्टय़ावर, नाक्यावर रेंगाळणारी तरुणाई घरात नेमकं काय करते आहे? लॉकडाउनमुळे मिळालेला वेळ कुठे कारणी लावते आहे? या प्रश्नांच्या उत्तरासाठी सर्वेक्षणही केलं. त्यात काही गोष्टी ठळकपणो दिसल्या.1. सहारा सोशल मीडियाचासंचारबंदी, लॉकडाउन याकाळात तरुणांचा सगळ्यात मोठा आधार, जिने का सहाराच म्हणू ते म्हणजे समाजमाध्यमं. युवक आणि समाजमाध्यमं हे समीकरण तसं कोरोनापूर्व काळापासून दृढ आहेच. आता त्यात भर पडली ती ओटीटी प्लॅटफॉर्म्सची. फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, यू टय़ूब, टिकटॉक यांच्या वा:या करून झाल्या की इतरवेळी कॉलेज, जॉब, इतर दुनियादारीमध्ये व्यस्त असल्यानं ज्या वेब सिरीज, चित्नपट पाहायचे राहून गेले होते ते पाहण्याचा सपाटा अनेक तरुणांनी लावला. रामायण, महाभारत बघणं ही तरुणांची नवीन फॅशन ठरली.  

2. नाराज नहीं, परेशान है!एरवी पायाला भिंगरी लागल्यागत सतत बाहेर फिरणारी तरुणाई लॉकडाउन कृपेने घरात बांधली गेली.ब:याच जणांच्या वाटय़ाला त्यातून भावनिक उलथापालथही आली. कुटुंबातील सर्वच सदस्य सतत घरात असल्याने सुरुवातीचा काही काळ गप्पा-गोष्टी, बैठे खेळ खेळणो यामध्ये मजेत गेला मात्न सततच्या सहवासाने लहानसहान गोष्टींवरून वाद-विवाद, चिडचिड, वडीलधा:यांचे सततचे सल्ले, टोमणो सहन करावे लागत असल्याने हैराण झालो आहोत, असं अनेकांनी सांगितलं. सत्तर टक्के तरु णांनी टाळेबंदीमुळे कुटुंबातील जवळीकता वाढली, सामंजस्य वाढल्याचं सांगितले मात्न पंचेचाळीस टक्के तरुण कुटुंबात होणा:या ताणतणावांना सामोरे गेले. स्पेस हा तरुणांच्या आयुष्यातला महत्त्वाचा प्रश्न. या लॉकडाउनमुळे स्पेस हरवली, खासगीपणाच संपला असं अनेकांनी सांगितलं. सर्व कुटुंबीय पूर्णवेळ घरी अशा परिस्थितीत काय करतोस, काय बघतेय, कोणाशी बोलतोस अशा या प्रश्नांनी आपण हैराण झाल्याचो अनेकांनी सांगितलं.थोडासाही खासगीपणा मिळणो लॉकडाउनमुळे अशक्य झाले असल्याची तक्रार तरुणांनी केली आहे.

3. घरकामाला ना नाही !या सर्वेक्षणात सहभागी ऐंशी टक्के तरु णांनी सांगितलं की, आम्ही लॉकडाउनमध्ये घरकाम केलं किंवा घरातल्या कामात मदत केली.घरात झाडलोट, भांडी, कपडे धुणं अशी कामांची विभागणी करून अनेकांनी आपल्या वाटचं तरी काम केलं.अत्यावश्यक सामानाची खरेदी करण्यासाठी बाहेर पडणा:या युवकांचं प्रमाण निम्म्याहून अधिक होतं असंही हे सर्वेक्षण सांगतं.

4. फिटनेसचे ऑनलाइन प्रयोग भविष्यात आपलं काही खरं नाही, कसे होणार पुढे हे प्रश्न तरुणाईच्या मनात थैमान घालत होते. यावर उपाय म्हणून अनेक युवकांनी माध्यमांद्वारे सतत कोरोनाच्या बातम्यांचा आढावा घेतला. कोरोनाची खडान्खडा माहिती घेण्याचा प्रयत्न ऐंशी टक्के तरु णाईने केला.  उपचार घेण्यापेक्षा काळजी घेणं उत्तम असं म्हणत बरेच जण तब्येतीची काळजी घेऊ लागले. अर्थात व्यायाम करायचा तर व्यायामशाळा, जॉगिंग ट्रॅक बंद असल्यानं अनेकांनी ऑनलाइन पाहून पाहून  घरच्या घरी योगासनं, दोरीच्या उडय़ा, झुंबा, एरोबिक्स या व्यायाम प्रकारांद्वारे फिटनेस राखण्याचा प्रयत्न केला. व्यायामासोबत आहाराची तितकीच काळजी घेत असल्याचं अनेकांनी सांगितलं.

5. सोशल मीडिया चॅलेंज ट्रेण्ड सोशल मीडियावर ट्रेंडिंग असलेली डाल्गोना कॉफी बनविण्यापासून अनेक ट्रेण्डसमध्ये अनेकांनी भाग घेतला.विविध पदार्थ बनवणो ते चित्नकला, नृत्यकला, शिल्पकला या छदांना लॉकडाउनमध्ये वाव मिळाला.  वाचण्यापासून खाण्यापिण्यार्पयत अनेक चॅलेंज दिले-घेतले गेले. काहींनी ऑनलाइन कोर्सेसही केले.

(प्राजक्ता नाशिकच्या हंप्राठा महाविद्यालयात पत्रकारितेची विद्यार्थिनी आहे.)