शहरं
Join us  
Trending Stories
1
...अन् यशस्वी जैस्वालची बॅट दांड्यातून निखळली; किती वेगाने आला होता चेंडू? जाणून घ्या बॅटची किंमत
2
गुजरात ATS ची मोठी कारवाई; अल-कायदाशी संबंधित चार दहशतवाद्यांना अटक
3
"तुम्ही लहान होतात, तुमच्या आई-वडीलांच्या सरकारमध्ये..."; नितीश यांनी तेजस्वी यादवांना सुनावलं
4
भारत-नेपाळ सीमेवर एसएसबी जवानांशी झटापट; गोळीबारात जवानाच्या डोक्यात लागली गोळी, हल्लेखोरही जखमी
5
'आम्हाला चुकीचे मृतदेह', अहमदाबाद विमान अपघाताबाबत ब्रिटिश कुटुंबांचा धक्कादायक दावा
6
बॉयफ्रेंडला धोका, उद्योगपतीशी लग्न... आता पतीपासून वेगळी राहते 'ही' बिग बॉस विनर?
7
Maharashtra Rain Alert: मुंबई, पुण्यासह 'या' जिल्ह्यांना अतिवृष्टीचा इशारा, हवामान विभागाकडून रेड अलर्ट
8
पहलगाम हल्ला अन् ऑपरेशन सिंदूरवरील चर्चेची तारीख ठरली; पीएम मोदीही उपस्थित राहणार
9
पहिल्यांदाच शेअर वाटायची तयारी, दोन दिवसांत 40% हून अधिक वधारला हा शेअर, केलं मालामाल!
10
कल्याण मारहाण प्रकरण: मराठी तरूणीला मारणारा गोकुळ झा, भाऊ रणजीत झा यांना २ दिवसांची पोलिस कोठडी
11
मुंबई लोकलचा प्रश्न दिल्लीत; काँग्रेस खासदाराने लोकसभेत मांडली जीवघेण्या प्रवासाची व्यथा
12
सुसाट स्पोर्ट्स बाईक दुभाजकावर आदळली, भीषण अपघातात भाजपा मंत्र्याचा पुतण्या मृत्युमुखी
13
नवी मुंबई: तरुणीने प्रेमसंबंध तोडले अन् तो नैराश्यामध्ये गेला, नंतर थेट घरावरच...
14
लोकसंख्येत होतेय सातत्याने घट! 'या' देशात फक्त ९ हजार लोक उरले
15
नाना पाटेकर यांना होता आणखी एक मुलगा, अडीच वर्षांचा असताना झालं निधन
16
'झिरो फिगर'च्या नादात केलं खतरनाक डाएटिंग, मरता मरता वाचली; तरुणीसोबत घडलं भयंकर
17
क्रिकेटच्या देवानंतर परदेशात असा सन्मान लाभणारे दुसरे भारतीय क्रिकेटर ठरले फारूख इंजिनीयर
18
'या' कारणामुळे UPI पेमेंट अडकू शकतात! १ ऑगस्टपासून ७ बदल होणार, बघा तुम्हाला काय करावं लागेल!
19
विवाहबाह्य संबंधाच्या प्रकरणात मुंबई, दिल्लीलाही टाकलं मागे, भारतातील 'हे' शहर पहिल्या क्रमांकावर
20
मराठी-हिंदी वादावर राज्यपालांचे विधान, CM देवेंद्र फडणवीसांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले...

पाण्याखालचा थरार.

By admin | Updated: May 1, 2014 14:54 IST

बोटीने आपण जात असतो. समोर अथांग समुद्र पसरलेला. जिकडे पाहावं तिकडे पाणीच पाणी. घुंऽऽ घुंऽऽ करीत वारा रोंरावत असतो, एकामागोमाग एक लाटा आपल्या दिशेनं सरकत असतात,

 स्कुबा डायव्हिंगबोटीने आपण जात असतो. समोर अथांग समुद्र पसरलेला. जिकडे पाहावं तिकडे पाणीच पाणी. घुंऽऽ घुंऽऽ करीत वारा रोंरावत असतो, एकामागोमाग एक लाटा आपल्या दिशेनं सरकत असतात, बोट पुढे-मागे हेलकावे घेत असते. जोडीला समुद्रावरची ती गाज.. इतरवेळी रोमँटिक वाटणारी ही गाज अशावेळी भयकारी वाटायला लागतेच.आपल्याला पोहता येत नसतं, बहुधा नसतंच. गुडघाभर पाण्यात स्वीमिंग टँकमध्ये डुबक्या मारणं, दोन-चार हात मारता यायला लागले म्हणजे ‘स्वीमिंग’ यायला लागलं असं वाटायला लागणं आणि ज्याच्या खोलीचा काही थांगपत्ताच लागत नाही, माहीत नाही अशा समुद्राच्या पोटात शिरणं. भीती जाणवतेच.पोटात अक्षरश: खड्डा पडतो. स्कुबा डायव्हिंग करताना समुद्राच्या पोटात शिरून पाण्याखालचं सृष्टीसौंदर्य न्याहाळणं ही गोष्ट हवीहवीशी, थरारक खरीच, पण त्यासाठी काळीजही वाघाचंच हवं.ज्या ठिकाणी आपल्याला समुद्राच्या पोटात शिरायचंय तिथपर्यंत नेण्यासाठी बोट आपल्याला घेऊन जात असते.अनेक गोष्टी अगोदरच नजरेसमोर दिसायला लागतात.लाटांनी हेलकावे खाणारी ही बोट आत्ताच, खरंच इथल्या इथे डुबली तर?आपला श्‍वास गुदमरून इथेच आपली इतिश्री झाली तर?सुसर, मगरीसारख्या प्राण्यांनी आपल्याला ओढून नेलं तर? शार्कसारख्या माशांनी खाऊनच टाकलं तर? समुद्राच्या पोटातली जादुई नगरी प्रत्यक्ष पाहण्याआधीच काळीज धडधडायला लागतं.समुद्राच्या पोटात काही फूट खोल जाऊन तिथली सजीवसृष्टी पाहायची तर त्यासाठी हिंमत हवीच. धाडस हवं, जिगर हवी.पण एकदा का पाण्याखाली गेलं आणि पाण्यातली मायानगरी अनुभवली, की स्वत:लाही विसरायला होतं. समुद्राच्या पोटात शिरण्याची ही ओढ मग जिवाला स्वस्थ बसू देत नाही.अनुभवट्रेकिंग, माऊन्टेनिअरिंग. अशा अँडव्हेन्चरस अँक्टिव्हिटीजमध्ये मी बर्‍याचदा भाग घेतलाय. नदीत, तलावात अनेकदा डुंबलोय. मला स्वीमिंगही तसं चांगलं येतं, त्यामुळे पाण्याची तशी फार भीती नव्हती.आमचा मोठा ग्रुप होता. लहान-मोठे १५-२0 जण तरी होतो. स्कुबा डायव्हिंग करण्यासाठी बोटीनं आम्ही जात होतो. सिंधुदुर्गला समुद्रातून आमची बोट जात होती, पण स्कुबा डायव्हिंगचं ठिकाण जसजसं जवळ येत गेलं, प्रत्येकाच्या काळजातली भीती घट्ट होत गेली. प्रत्यक्ष त्या ठिकाणी गेल्यानंतर तर अनेकांनी ‘नाही’च सांगितलं.माझ्याही पोटात बाकबुक होत होतीच. पण मन घट्ट केलं, भीतीला ढकलून ढकलून सारखं दूर करत होतो. प्रशिक्षकाच्या मदतीनं कॉस्च्युम अंगावर चढवला. मास्क घातला, पाठीवर ऑक्सिजनचं सिलिंडर लटकावलं. करावं की नाही, करावं की नाही. छातीत धडधड आणि पोटात फुलपाखरं उडतच होती. शेवटी मारलीच उडी. तेवढाच एक कसोटीचा क्षण. प्रशिक्षक हाताला धरून पाण्यातली ती जादुई नगरी दाखवत होता. जमिनीच्या वर जशी आपली सृष्टी असते, तशीच सारी सृष्टी. पण कितीतरी अधिक सुंदर. रंगबिरंगी. विविध रंगी, विविध आकारांचे मासे, निरनिराळ्या वनस्पती, झाडं, प्रवाळ. तिथल्या कपार्‍या, वेगवेगळ्या जातीच्या माशांची ‘घरं’. सगळंच स्वत:ला विसरायला लावणारं.माशांबरोबर, त्यांच्यासारखंच आपणही विहार करीत असतो. त्या जादुई मायानगरीत फिरत असतो. एक वेगळीच अनुभूती.त्या अनुभूतीत मीही दंग होतो. स्वत:ला विसरलो होतो. तेवढय़ात. सोबतच्या प्रशिक्षकानं त्याच्या हातातला पाव थोडासा कुस्करला. त्याचे बारीक बारीक कण पाण्यात इतस्तत: विखुरले. आणि.माशांची भलीमोठी झुंड. हजारो, लाखो मासे आमच्या अवतीभोवती. आमच्या अंगाखाली, वर, आजूबाजूला. सगळीकडे रंगबिरंगी माशांची दुनिया आणि त्यांच्या मध्ये आम्ही. तोंड आऽऽ करून आपल्या इवल्याशा तोंडात, पावाचे ते छोटेसे कण पाहता पाहता ते गट्टम करत होते. त्यांचा स्पर्श जाणवत होता. त्यांना हातात पकडण्याचा प्रयत्न केला, तर सुळ्ळकन निसटूनही जात होते.स्कुबा डायव्हिंगचा हा माझा पहिलाच अनुभव. पण त्यातला थरार आणि तो अनुभव. अनावर झालं की माझी पावलं समुद्राच्या दिशेनं आपोआप वळायला लागतात.आतापर्यंत आठ-दहा वेळा मी हा अनुभव घेतलाय. प्रत्येक अनुभव वेगळा आणि प्रत्येक वेळचा तो जलमहालही वेगळा. पाण्यातली ही जादुनगरी मला पुन्हा आता साद घालतेय.शीतल महाजन (आंतरराष्ट्रीय ख्यातीचे स्कायडायव्हर आणि फिनिक्स स्काय डायव्हिंग संस्थेचे संचालक)