शहरं
Join us  
Trending Stories
1
Plane Crash: पायलट म्हणाला, 'तू फ्यूल बंद का केलं?'; एअर इंडिया विमान अपघाताबद्दल स्फोटक माहिती आली समोर
2
Radhika Yadav : "इथे खूप बंधनं, मला जीवनाचा आनंद घ्यायचाय..."; राधिकाचं कोचसोबतचं WhatsApp चॅट समोर
3
दिल्लीत ४ मजली इमारत कोसळली; ढिगाऱ्याखाली अडकले अनेक लोक, बचावकार्य सुरू
4
Today Daily Horoscope : आजचे राशीभविष्य - १२ जुलै २०२५; नशिबाची उत्तम साथ; यश व कीर्ती लाभेल, आनंदवार्ता मिळेल
5
ड्रोन उडवण्याचा प्रयत्न करत असतानाच झाला स्फोट; पाकिस्तानमध्ये दहशतवाद्याचा बॉम्बस्फोटात मृत्यू
6
शिंदेसेना वादात, विरोधकांना संधी; आमदारांच्या व्हायरल व्हिडिओमुळे एकनाथ शिंदेंची पंचाईत
7
होमिओपॅथीची नोंद एमएमसीमध्ये करायची की नाही?; तज्ज्ञ समिती करणार अभ्यास
8
बीकेसी ते शिळफाट्यादरम्यान बुलेट ट्रेनसाठीचा बोगदा पूर्ण; प्रकल्पाला मिळणार गती
9
अखेर ६ दिवसांनी बोया सापडला पण सर्च ऑपरेशनमध्ये आढळल्या ९२४ बेकायदा मच्छीमार बोटी
10
कुजबुज! उपमुख्यमंत्र्यांच्या कपाटात दडलं काय?; आमदारांचे PA, कार्यकर्त्यांचे लक्ष वेधले
11
कॅनडावरील टॅरिफ वाढवून केला ३५%; अमेरिकेचे राष्ट्रपती डोनाल्ड ट्रम्प यांची घोषणा
12
मतदार याद्यातील घोळ, घुसखोरी आणि गोंधळ; घोळ निस्तरणे निवडणूक आयोगाला शक्य होत नाही
13
...तर गो बॅक टू द थर्ड वर्ल्ड; न्यू यॉर्कमध्ये हाताने बिर्याणी खाल्ली, काय बिघडले?
14
फास्टॅग नीट न लावल्यास चालक ब्लॅकलिस्टमध्ये; तुम्हीही वाहन चालवताना करता का 'ही' चूक?
15
Video : शिवाजीनगर येथे पीएमटी बसला आग;नागरिकांच्या तत्परतेने टळली जीवितहानी
16
Wimbledon 2025: अल्काराझनं सलग तिसऱ्यांदा गाठली फायनल! नदालनंतर अशी कामगिरी करणारा ठरला दुसरा
17
दोन भिन्न वंशावळी न्यायालयात का सादर केल्या गेल्या? सात्यकी सावरकर यांनी याचा खुलासा करावा
18
नवऱ्याने रागाच्या भरात बायकोच्या नाकाचा घेतला चावा, झाले दोन तुकडे... नेमकं घडलं तरी काय?
19
"जनसुरक्षा विधेयका'चं नाव 'भाजप सुरक्षा विधेयक' करायला हवं"; मिसा, टाडाचा उल्लेख करत उद्धव ठाकरेंचा सरकारवर हल्लाबोल
20
Video: तुफान राडा ! आधी 'कॅप्टन' गिल पंचांशी भांडला, मग सिराजचाही पारा चढला, काय घडलं?

दोन शाखातल्या दोन पदव्या, एकाच वर्षी घेता येणं आता  शक्य  आहे !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 28, 2020 14:58 IST

दोन वेगवेगळ्या आंतरशाखांमध्ये विद्याथ्र्याना एकाचवेळी पदवी घेण्याचा प्रस्ताव आता यूजीसीने मंजूर केला आहे. एक नियमित अभ्यासक्रमानुसार आणि दुसरी पदवी मुक्त विद्यापीठ किंवा ऑनलाइन घेता येईल.

ठळक मुद्देदोन विविध शाखांतील पदव्या एकाचवेळी घेतल्याने विद्याथ्र्याना काय फायदा होऊ शकतो? - त्याविषयी.

लीना पांढरे 

परवा एका प्रख्यात स्त्नीरोगतज्ज्ञाकडे गेले होते. समाज म्हणून ते सध्या कोरोना काळात निराश होऊ पाहणा:या तरु ण मुला-मुलींना ऑनलाइन काउन्सिलिंग करतात. ते सांगत होते की,  त्यांचा मुलगा फिलिपाइन्समध्ये मेडिकल कॉलेजात शिकत आहे. त्याला अभ्यासक्र मात मानसशास्त्र आणि संवाद कौशल्य (कम्युनिकेशन स्किल्स) हे विषय प्रथम वर्षापासून नेमलेले आहेत.भारतात मेडिकलच्या विद्याथ्र्याना हे विषय शिकवले जात नाहीत. अॅलोपथीला तर नाहीच नाही. आम्हाला खूप अनुभवातून हळूहळू रु ग्णांचे समुपदेशन कसं करायचं त्यांच्या नातेवाइकांशी कसं बोलायचं या सर्व गोष्टी अनुमानधपक्याने शिकत जाव्या लागतात. या गोष्टी भारतात वैद्यकीय अभ्यासक्र मामध्ये असायला हव्यात.***यश हा विद्यापीठातील सुवर्णपदक विजेता संख्याशास्त्नाचा विद्यार्थी. त्याला मुंबईत रिझव्र्ह बँकेत थेट नोकरी मिळाली. त्याच्या कामाचं स्वरूप काहीसं प्रशासकीय होतं. तो वैतागून सांगत होता की त्याला कॉमर्स शाखेचे बँकिंगसारखे किंवा मॅनेजमेंटसारखे विषय विज्ञान शाखेत स्टॅट्सबरोबर शिकायला मिळाले असते, तर आज त्याला ज्या अनेक अडचणी येत आहेत त्या आल्या नसत्या.***असे अनुभव आजवर अनेकजणांना आले. येतात. अभ्यासक्र मात कला, वाणिज्य, विज्ञान, ललित कला या या वेगवेगळ्या शाखा सोयीसाठी केलेल्या आहेत. पण विद्याथ्र्याना एकमेकांना पूरक असणारे विषय घेऊन शिकता आलं तर त्यांचा फायदा होऊ शकतो. असे विद्यार्थीकेंद्रित आंतरशाखीय अभ्यासक्र म पाश्चात्य विद्यापीठात खूप पूर्वीपासून राबवले जात आहेत. भारत सरकारने कागदोपत्नी ऑक्सफर्ड, हार्वर्डसारख्या विद्यापीठांना भारतात कॉलेजेस सुरू करायला मान्यता दिलेली आहे ही कॉलेजेस सुरू झाली तर आंतरशाखीय अभ्यासक्र म असल्याने बहुसंख्य विद्याथ्र्याचा ओढा तिकडेच असेल आणि मग येथील परंपरागत अनुदान प्राप्त विद्यापीठांचे काय भवितव्य? हा यक्षप्रश्नच आहे.अनेक खासगी विद्यापीठांनी काळाची पाऊलं ओळखून आंतरशाखीय अभ्यासक्र म राबवण्यास सुरु वात केलेली आहे. लंडनस्थित एसओएएस विद्यापीठातून लिबरल आर्ट्समध्ये पदवी घेता येते. येथे आंतरशाखीय अभ्यासक्र म शिकलेले विद्यार्थी बँका, परराष्ट्र मंत्नालय, कॅन्सर ट्रस्टसारख्या धर्मादाय संस्था, ब्रिटिश लायब्ररी, ऑक्सफोर्ड विद्यापीठ, म्युझयिम, युनेस्को, ब्रिटिश आकाशवाणी अशा अनेक ठिकाणी कार्यरत आहेत.स्टीव्ह जॉब्झ म्हणाला होता की अॅपल आयपॅडसारखी उत्पादनं निर्माण करू शकलो कारण आम्ही नेहमीच तंत्नज्ञान आणि ललितकला यांची सांगड घालण्याचा प्रयत्न केलेला आहे.

भारतामधील आंध्र प्रदेशातील क्र ेआ विद्यापीठ, पुणो येथील फ्लेम विद्यापीठ, मुंबईतील नरसी मुंजी इन्स्टिटय़ूट ऑफ मॅनेजमेंट स्टडिजसारखे ए प्लस दर्जा मिळवलेले विद्यापीठ या सर्व ठिकाणी आंतरशाखीय अभ्यासक्र म शिकवले जातात. अशोका युनिव्हर्सिटीमध्ये मानव्यशास्त्न, समाजशास्त्न, वर्तनशास्त्न ज्यामध्ये मानसशास्त्न आणि मानववंश शास्त्नाचा समावेश होतो तसेच नैसर्गिक विज्ञान म्हणजे नॅचरल सायन्सेस ज्यात रसायनशास्त्न, जीवशास्त्न, भौतिकशास्त्न यांचा अंतर्भाव होतो यातून विविध विषय निवडून विद्याथ्र्याना आपली पदवी ग्रहण करता येते. सिम्बॉयसिस स्कूल फॉर लिबरल आर्ट्स या विद्यापीठात सामाजिक न्याय आणि एक सुबुद्ध नागरिक म्हणून आपली जबाबदारी या गोष्टी शिकवत असताना आणि  विद्याथ्र्याचा बौद्धिक विकास घडवून आणताना विद्याथ्र्याचे विचारस्वातंत्र्य, आत्मसन्मान आणि अभिव्यक्ती या गुणांचा विकास घडवून आणला जातो.लिबरल आर्ट्स या सं™ोचे भाषांतर मानविकी असे केले जाते. यामध्ये इतिहास, साहित्य लेखन, तत्त्वज्ञान, मानसशास्त्न, समाजशास्त्न, सर्जनशील कला अशा ब:याच विषयांचा समावेश आहे यामधून अशा प्रकारची उदार कला पदवी (लिबरल आर्ट्स डिग्री) मिळवणारे विद्यार्थी त्यांच्या व्यक्तिगत, व्यावसायिक आणि सामाजिक जीवनात प्रभावी युक्तिवाद करू शकतात. इतरांशी सुसंवाद साधू शकतात. मुख्य म्हणजे कुठल्याही समस्यांचे निराकारण करण्यास शिकतात. एखादा विद्यार्थी भौतिकशास्त्नाचा अभ्यास करताना संगीत, शिल्पकला, ललितकला किंवा परफॉर्मिंग आर्ट्सवर देखील लक्ष केंद्रित करू शकतो. लिबरल आर्ट्समध्ये विज्ञान आणि मानविकी या दोन्हीचा समावेश होतो.     इ.स.पूर्व आठव्या शतकात ग्रीकांनी स्वतंत्नवादी व्यक्तीला नागरी जीवनात सहभागी होण्यासाठी आवश्यक असणारे विषय आणि कौशल्य प्राप्त करून घेण्याकरता उदारमतवादी कला लिबरल हा शब्द निर्माण केला यात पारंगत असणारे विद्यार्थी सार्वजनिक वादविवाद करू शकतात, न्यायालयात स्वत:चा बचाव करू शकतात, लष्करामध्ये ही सेवा करू शकतात. निर्णायक मंडळांमध्येही सेवा देतात.मात्न एक गोष्ट आपल्याला कबूल करायला हवी की लिबरर आर्ट्स पदवीधर जेव्हा स्ट्रगल करून आपली पहिलीवहिली नोकरी/रोजगार येथे रु जू होतात तेव्हा विज्ञान, तंत्नज्ञान, अभियांत्रिकी आणि गणित यांचेच फक्त विद्यार्थी असणा:या मुला-मुलींच्या तुलनेत ते कमी पैसे कमावतात. म्हणून कदाचित लिबरल आर्ट्सकडे पाहण्याचा दृष्टिकोन क्वचितप्रसंगी वक्र  असतो.       पण आज भारतामध्येही लिबरल आर्ट्स घेऊन शिकणा:या विद्याथ्र्याचे भविष्य हे अत्यंत आशादायक आहे. विज्ञान-तंत्नज्ञान अभियांत्रिकी आणि गणित यांना फक्त महत्त्व देण्याचे दिवस आता संपुष्टात आले आहेत.उत्तर औद्योगिक काळात सृजनशीलता, संशोधकवृत्ती, अभिव्यक्त होण्याची संस्कृती या गोष्टींना प्रोत्साहन दिले जात आहे. नूतन, ज्ञानवर्धक अर्थव्यवस्थेची गरज आहे असे बहुआयामी, बहुश्रुत विद्यार्थी निर्माण करणं, विविध विषयात पारंगत होता येणं. विश्लेषणात्मक आणि व्यावसायिक क्षमता विद्याथ्र्यामध्ये जोपासणं आणि त्यांना यशोशिखराकडे नेणारा मार्ग दाखवणं. अशी विद्यार्थिकेंद्रित उद्दिष्टे आंतरशाखीय अभ्यासक्र म शिकवणा:या विद्यापीठांची आहेत.कार्डिनल न्यूमनने त्याच्या आयडिया ऑफ युनिव्हर्सिटी या प्रसिद्ध ग्रंथात म्हटले आहे ...अज्ञानाच्या अंधारातून मला ज्ञानाच्या प्रकाशाकडे घेऊन जा. तमसो मा ज्योतिर्गमय.. विज्ञानाबरोबर कलेचा, विवेकाचा दीप प्रज्वलित ठेवण्याचं काम या आंतरशाखीय अभ्यासक्रमांमधून साध्य होतं. उत्तम होऊ शकतं. आंतरशाखीय अभ्यासक्र म पूर्ण करणा:या विद्याथ्र्याना रोजगाराची संधी ही अधिक प्रमाणात आहे.वेगवेगळ्या विषयांचा अभ्यास केल्यामुळे त्या व्यक्तीमध्ये स्वीकार्हता, लवचिकता आलेलीही असते . ज्याची आज वेगाने बदलणा:या जगाला गरज आहे.  असा आंतरशाखीय अभ्यासक्र म  फक्त एक कुशल व्यावसायिक निर्माण करत नाही तर त्या कुशाग्र व्यावसायिकामधील नैतिक मूल्य मानणारा माणूसही निर्माण करतो. ब्रेन बिहाइंड द मॅन. महत्त्वाचा आहे. माणसाच्या हातात आपण बंदूक दिली पण ती बंदूक चालवायची की नाही आणि कुठे चालवायची अशा योग्य विचाराला चालना देण्याचं कार्य असे आंतरशाखीय अभ्यासक्र म करतात.

( लेखिका प्राध्यापक आहेत.)