शहरं
Join us  
Trending Stories
1
Asha Bhosale: सूरसम्राज्ञी आशा भोसले अनंतात विलीन, दिग्गज गायकांनी गाणं गाऊन दिली अखेरची स्वरांजली
2
होर्मुझ सामुद्रधुनीवर ब्रिटन-फ्रान्सचा 'बिग प्लॅन'; ४० देशांना एकत्र आणणार, ट्रम्प यांना डच्चू
3
दिल्ली, हरयाणा, पंजाबमधील CCTV चे फुटेज थेट पाकिस्तानला, चिनी कॅमेऱ्यातून भारताची हेरगिरी
4
सिंगल चार्जवर ३२० KM रेंज...किंमत फक्त ₹१.२९ लाख! Ola ची नवीन EV स्कूटर लॉन्च
5
Latest Marathi News LIVE: सूरसम्राज्ञी आशा भोसले पंचत्वात विलीन, चाहत्यांनी साश्रू नयनांनी दिला अखेरचा निरोप
6
बालेन शाह यांनी PM मोदींना भेटण्यासाठी ठेवली अट; नेपाळ-भारत संबंध पुन्हा सुधारणार
7
"काही लोकांना ४ लग्नांची सूट, भाजप सत्तेत आल्यास...";  अमित शाह यांनी बंगालमध्ये सभा गाजवली, स्पष्टच बोलले
8
इराणी नेत्यांच्या सुरक्षेसाठी पाकिस्ताननं अख्खी ताकद पणाला लावली; कसं केले होते नियोजन?
9
सीलिंग फॅन की टेबल फॅन? वीज बिल वाचवण्यासाठी कोणता पर्याय सर्वोत्तम? खरेदीपूर्वी नक्की वाचा
10
"US-इराणमध्ये तयार होता अंतिम करार; शेवटच्या क्षणी आला एक कॉल अन् २१ तासांची चर्चा फिस्कटली"
11
श्रीलंकेत भारताची मोठी खेळी; खरेदी केली मोठी शिपबिल्डिंग कंपनी, चीन पाहतच राहिला
12
आशा भोसलेंची नात जनाईला धीर द्यायला पोहोचला 'मानलेला भाऊ' मोहम्मद सिराज, पाहा VIDEO
13
Garud Puran: गरुड पुराणानुसार मृत्यूपूर्वी मिळतात 'हे' रहस्यमयी संकेत; अखेरच्या काळात नेमकं काय घडतं?
14
MPSC भरती प्रक्रियेत मोठा बदल; राज्य मंत्रिमंडळाने घेतले ७ महत्त्वाचे निर्णय, जाणून घ्या
15
आले कधी अन् गेले कधी, समजलंच नाही! आयपीएलमध्ये सर्वात कमी धावसंख्येवर ऑलआउट झालेले संघ
16
८ व्या वेतन आयोगाची बंपर भरती; १.८० लाख रुपये महिना पगार, जाणून घ्या अर्ज करण्याची प्रक्रिया
17
पत्नीला काम सांगायचे म्हणून मुलाने केला पित्याचा खून; गडचिरोलीतील धक्कादायक घटना
18
Kalyan Accident: कल्याण-अहिल्यानगर महामार्गावर भीषण अपघात; ११ जणांचा मृत्यू, दोन गंभीर
19
IPL 2026: "सरळ मैदानाबाहेर जा...!" लाईव्ह सामन्यात सुनील गावस्कर आरसीबीच्या खेळाडूवर भडकले
20
इस्रायलचा महात्मा गांधी हॉस्पिटलवर हल्ला; सगळीकडे विध्वंस, इराणनं शेअर केला Video
Daily Top 2Weekly Top 5

समर इन द बॉटल-उन्हाळातला नवा ट्रेंड

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 9, 2019 17:01 IST

समर कलरचे कपडे घालता येत नाहीत? - ना सही! ते सगळे ब्राइट रंग एका बाटलीतून प्रकटले तर.

प्रिया परदेशी 

समर इन द बॉटल. असा एक भन्नाट ट्रेण्ड सध्या आहे. त्याचंच भावंडं आहे, समर इन द ग्लास!म्हणजे काय तर उन्हाळ्यात ‘कूल’ वाटेल, मूड छान होईल आणि मस्त फ्रेश वाटेल, थकवा पळून जाईल असे रंग बाटलीतून किंवा ग्लासमधून तरी आपल्या आयुष्यात उतरवायचे.- अजिबात वाचून गैरसमज करून घेऊ नका!इथं चर्चा आहे ती गारेगार सरबतांची आणि नेलपॉलिशची.त्यालाच म्हणतात समर इन द बॉटल!प्रत्येक वर्षी समर कलरची चर्चा होते. ज्यांच्याकडे पैसे असतात ते समर शॉपिंग करतात. म्हणजे उन्हाळ्यात छान दिसतील अशा प्रकारचे कपडे विकत घेतात. त्या रंगाचे आणि पोताचे कपडे घालतात. मात्र सगळ्यांनाच काही एवढा खर्च परवडणार नाही.मात्र उन्हाळ्याचे ब्राइट कलर्स तर आपल्या जगण्यात आणायलाच हवेत. ते ही कमी पैशात, खर्चात आणि छान स्टाइलमध्ये!तर त्यासाठी हा समर इन द बॉटल ट्रेण्ड.

उन्हाळ्यातले रंगपिवळा, लिंबू रंग, ऑरेंज, निळ्याच्या विविध छटा, पिच आणि इंद्रधनु विविध रंग आणि पांढरा हे रंग सध्या उन्हाळी रंग अर्थात समर कलर्स म्हणून चर्चेत आहेत.त्या रंगांना आपल्या आयुष्यात स्थान देण्यासाठी हे दोन सोपे फॉम्यरुले!

नेलपेण्टची बाटलीबाटलीत रंग

आपण समर कलर्समध्ये रंगायचं असेल तर हा एक सोपा उपाय. नेलपॉलिश.त्यावरूनच हा समर इन द बॉटल असा ट्रेण्ड आला आहे.नेल आर्ट तसंही सध्या चर्चेत आहे. मात्र तेही न करता विविध रंगांच्या नेलपॉलिशचा वापर करून आपण समर कलर्स वापरू शकतो.1. मुळात पिवळा, केशरी, निळा, किंवा विविध रंगाचे पट्टे हे नेलपेण्ट म्हणून कसं वापरायचं हा किंतू-परंतु मनातून काढून टाका.2. रोजचे कपडे कितीही जुने किंवा तेच ते असले तरी हाताच्या नखांवर आपण ब्राइट रंग वापरू शकतो.3. लेमन कलर, ऑरेंज हे दोन रंग प्लेन लावता येतील.4. निळ्या रंगाच्या विविध छटा एकाचवेळी नखांना लावता येतील.5. निळा, पिवळा, केशरी असं कॉम्बिनेशन करता येईल.6. पिच कलर तर कसाही लावला नखांना तरी सुंदर दिसेल, एखादं फुलंही नखावर काढता येईल.7. नखांवर इंद्रधनुषी रंगही देता येईल.

 

सरबतं- रंग आणि ग्लास

आपली कुठलीही पारंपरिक पेय काढून पाहा. लिंबू सरबत, पन्हं, कोकम सरबत, लस्सी, मॅँगो लस्सी, टरबुजाचा रस, मोसंबीचा रस, खरबुजाचा रस हे सारे रस या उन्हाळी रंगातच येतात. त्यामुळे अधनंमधनं हे सारे रस पिणं हे आरोग्याच्याच नाही, तर आपल्या मूडच्या उत्तम आरोग्यासाठी गरजेचं आहे.आपण जे रंग सतत पाहतो, त्यांचा आपल्या मनावर परिणाम होतोच. त्यामुळे हे सारे ब्राइट रंगाचे पारंपरिक पेय पिणं केव्हाही उत्तम. कोल्ड ड्रिंकला नाही म्हणणं हेही म्हणूनच ‘कूल’ ठरतं!