शहरं
Join us  
Trending Stories
1
शिंदे गटाचे नेते तानाजी सावंत यांची प्रकृती बिघडली; रुग्णालयात दाखल, ICUमध्ये उपचार सुरू
2
मुंबईत दीड कोटी अमराठी, त्यांच्याशी‌ बोलताना हिंदी हवी की नको; चंद्रकांत पाटील यांचं विधान
3
“उद्या दुपारी १२ वाजता या, अंतरवाली सराटीतील शेवटची बैठक”; जरांगेंचे मराठा समाजाला आवाहन
4
ENG W vs IND W : स्मृतीच्या नेतृत्वाखाली टीम इंडियाचा मोठा विजय; इंग्लंडवर ओढावली नामुष्की
5
"पृथ्वीवर कोणत्याही सीमा दिसत नाहीत, आपण सर्व एक आहोत"; पंतप्रधान मोदींनी साधला शुभांशू शुक्लांशी संवाद
6
मुंबई महापालिका निवडणुकीसाठी भाजपाची तयारी सुरू; वॉर्डनिहाय आढावा घेणार, संचलन समितीची घोषणा
7
स्मृती मानधनानं पहिल्या टी-20I सेंच्युरीसह रचला इतिहास, असा पराक्रम करणारी ती पहिलीच
8
एअर इंडियाच्या विमानात बसला, दारू प्यायला अन् महिला कर्मचाऱ्यासोबत... ; लँडिंग होताच प्रवासी पोलिसांच्या ताब्यात!
9
"उत्तर भारतीयांना तमिळ शिकायला सांगा"; हिंदी शत्रू नाही म्हणणाऱ्या अमित शाहांना कनिमोळींचे प्रत्युत्तर
10
भारताचा बांगलादेशला मोठा झटका, 'या' गोष्टीवर घातली बंदी! का घेतला मोठा निर्णय?
11
आयआयटीच नव्हे, एलपीयूच्या विद्यार्थ्याला मिळाली २.५ कोटींची विक्रमी प्लेसमेंट ऑफर
12
आता आणखी कोण? काँग्रेसचा मोठ्या पदावरील बडा नेता भाजपात जाणार? निवडणुकीपूर्वी धक्का बसायची चिन्हे
13
पैसे तयार ठेवा! लवकरच येणार Meesho चा IPO, काय आहे कंपनीचा प्लान? पाहा डिटेल्स 
14
मुंबईचे डबेवाले एक दिवसाच्या सुट्टीवर जाणार! काय आहे कारण? जाणून घ्या...
15
“तुमचा वाईट पद्धतीने पराभव केला, तुम्ही आता नरकात...”; ट्रम्प यांचा खामेनी यांच्यावर प्रहार
16
“काँग्रेसचा विचार संपवू शकत नाही, वहिनींना पक्षात घेऊन...”; विशाल पाटलांची भाजपावर टीका
17
मालव्य राजयोगाने जूनची सांगता: ८ राशींना मालामाल होण्याची संधी, यश-पैसा-लाभ; जुलै शुभच ठरेल!
18
महायुती सरकारमध्ये मतभेद! पाचवीपर्यंत हिंदी नको, अजित पवार गटाने मांडली पक्षाची भूमिका
19
पाणी अंगावर उडाले म्हणून कोयता घेऊन धावला; छत्रपती संभाजीनगरात नशेखोराचा धुमाकूळ
20
Shefali Jariwala Funeral: शेफालीच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार, पती पराग त्यागीची रडून वाईट अवस्था, भावुक करणारा व्हिडिओ

स्ट्रेस येतो, तो नक्की कशाचा?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 10, 2019 14:22 IST

आपण नक्की काय शोधतो? कशाच्या मागे पळतो?

ठळक मुद्देआपल्याला 1, 2 आणि 4 क्रमांकाच्या मेंढय़ा मिळाल्या हे आपण विसरून जातो.

- रवींद्र पुरी

सोमवारची सकाळ होती. आठवडय़ाचा पहिला दिवस, त्यामुळे ऑफिसला वेळेवर पोहोचायची घाई. ऑस्ट्रेलियामध्ये वेळेला तसं फार महत्त्व. मला घरातून निघायला थोडा वेळच झाला; पण मुंबईमध्ये ज्याला ट्रेन पकडायची सवय तो जगात कुठेही ट्रेन पकडू शकतो. मी धावत पळत आलो आणि शिस्तीत ट्रेन पकडली. बाहेर तापमान 6 डिग्री सेल्सिअस होतं; पण तरीही मी घामाघूम झालेलो. एक दोन स्टेशन गेल्यानंतर वाटलं मनामध्ये थोडं चलबिचल होतंय. थंडीमध्ये धावल्यामुळे होत असेल असं वाटलं. लक्ष विचलित करण्यासाठी बॅगमधील पुस्तक काढलं आणि वाचायचा प्रयत्न केला. एक पान वाचल्यानंतर जाणवलं की आज वाचायची इच्छा नाही. पुस्तक बंद केलं आणि डोळे मिटून पडलो. कदाचित 15-20 मिनिटे झाली असतील. थोडंसं मळमळल्यासारखं वाटलं. परत डोळे मिटले. अचानक चक्कर आल्यासारखं वाटलं म्हणून डोळे उघडले. ट्रेन कुठल्यातरी स्टेशनवर थांबलेली. मला फक्त लोकांचे पाय दिसत होते आणि क्षणार्धात छातीमध्ये डाव्या बाजूला काहीतरी टोचल्यासारखे झाले. डोळे उघडले तेव्हा स्ट्रेचरवर होतो. हिरव्या कपडय़ातील पॅरामेडिक  माझ्याशी बोलत होता.  त्याने विचारले, हाऊ आर यू फिलिंग नाऊ? मी आय एम गुड म्हणायचा प्रयत्न केला; पण जाणवलं की ओठ व्यवस्थित हालत नव्हते. आजूबाजूला बघितले. मी प्लॅटफॉर्मवर स्ट्रेचरवर होतो आणि बाजूला दोन पॅरामेडिकल होते. छातीला हाताला पायाला इसीजीसाठीचे लेबल लावलेले होते.काहीतरी झाले हे जाणवत होतं. मला अ‍ॅम्बुलन्समधून जवळच्या हॉस्पिटलमध्ये नेण्यात आले. डॉक्टर आले.  इसीजी बघितला. पुढचे 3-4 तास मी हॉस्पिटलमध्ये होतो. त्यांनी काही टेस्ट केल्या. चार तासानंतर नर्सने सांगितले की सगळं व्यवस्थित आहे. घरी आलो. दिवसभर आराम केला त्रास असा काहीच नव्हता. फक्त माझे रिपोर्ट बघून डॉक्टरांनी सांगितल की, स्ट्रेस रिलेटेड अटॅक होता. दुसर्‍या दिवशी पुन्हा ऑफिसला गेलो. नशीब अटॅक हार्ट अटॅक नव्हता. घरच्यांची आठवण येऊन डोळ्यात पाणी आले. ऑफिसमध्ये पोहोचल्याबरोबर माझा जवळचा मित्र लगबगीचे माझ्याकडे आला. मी त्याला काल मेसेज टाकला होता.माझा हा मित्र मूळचा हाँगकाँगचा. दुपारी बोलणं झालं, जे झालं ते त्याला सांगितलं. तो थोडा हसला आणि म्हणाला, तुला एक गोष्ट सांगतो. ती गोष्ट अशी होती. आमच्या दोघांसारखे दोन मित्र होते. लहान होते. खोडकर. त्यांना शाळेमध्ये खोडी करावीशी वाटली. त्या रात्री त्यांनी तीन मेंढय़ा पकडल्या. त्यांच्यावर 1, 2 आणि 4 असे नंबर टाकले. त्या तीन मेंढय़ा त्यांनी त्यांच्या शाळेच्या आतमध्ये सोडल्या आणि गेट बंद केले.दुसर्‍या दिवशी सकाळी नेहमीच्या वेळेनुसार शाळा उघडली. शिक्षकांना सर्वत्र मेंढय़ांच्या लेंडय़ा दिसल्या. आवाज आला. त्यांनी मेंढय़ा शोधल्या. त्यांना 1, 2 आणि 4 नंबर असलेल्या तीन मेंढय़ा मिळाल्या. त्या नंबरकडे बघून सगळ्यांनी असा निष्कर्ष काढला की शाळेमध्ये एकूण चार मेंढय़ा आहेत. त्यातील तिसरी मेंढी अजून सापडलेली नाही. ती शोधायची म्हणून त्यांनी शाळेलाच सुटी दिली.आयुष्यातही असंच होतं. आपल्याला 1, 2 आणि 4 क्रमांकाच्या मेंढय़ा मिळाल्या हे आपण विसरून जातो. तिसरी का मिळाली नाही म्हणत तीच शोधत राहतो.  बर्‍याचवेळी तिसरी मेंढी अस्तित्वातही नसते. पण आपण तीच शोधतो.’मित्रांनो, पुढच्या वेळी जेव्हा केव्हा तुमच्या डोक्यात विचारांचं वादळ येईल किंवा स्ट्रेस वाढेल तेव्हा विचारा स्वतर्‍ला आपण कितवी मेंढी शोधतोय.