शहरं
Join us  
Trending Stories
1
तीन विधेयकांवरून तुफान गोंधळ; विराेधकांनी प्रती फाडल्या, विधेयके संयुक्त समितीकडे पाठविली
2
आता जीवन विम्यासह आरोग्य विमा होणार स्वस्त; सरकार मोठा दिलासा देण्याच्या तयारीत
3
'मोनोरेल'कडे आपत्कालीन बचाव यंत्रणाच नाही; क्षमता फक्त गाडी ओढून स्थानकात नेण्याची!
4
मका वाचवण्यासाठी कुंपणातून सोडलेला करंट ठरला काळ; एकाच कुटुंबातील ५ जणांचा मृत्यू
5
तुमच्या आकांसमोर झुकू नका, सॅलरी कापणार नाहीत; सुप्रीम कोर्टाने केली IPS अधिकाऱ्याची कानउघडणी
6
चुकीचा निवडणूक डेटा पोस्ट करणं संजय कुमारांना भोवलं; महाराष्ट्र निवडणूक आयोगाची मोठी कारवाई
7
वासनांध भोंदूबाबाचा प्रताप, महिलेसोबत अश्लील कृत्य; तंत्रमंत्राने कुटुंबियांना भस्म करण्याची धमकी
8
पाकिस्तानची झोप उडणार! ५ हजार किमी रेंज असणाऱ्या 'अग्नी ५' मिसाइलची भारतानं केली यशस्वी चाचणी
9
राजधानी दिल्ली तिहेरी हत्याकांडानं हादरली; एकाच घरात ३ मृतदेह सापडले, कारण समजताच पोलीस हैराण
10
ODI Rankings मध्ये गडबड घोटाळा! ICC चा रिव्ह्यू अन् टॉप ५ मध्ये पुन्हा झळकलं रोहित-विराटचं नाव
11
अमेरिकेत ५ तास थांबणे व्लादिमीर पुतिन यांना महागात पडले! डोनाल्ड ट्रम्प यांनी २.२ कोटी आकारले; नेमके प्रकरण काय?
12
खराब अन् खड्डेमय रस्त्यांसाठी टोल घेणे योग्य नाही; सुप्रीम कोर्टाचा ऐतिहासिक निर्णय
13
रुग्णालयाने भरती करण्यास दिला नकार, 12 वर्षाच्या मुलाने बापाच्या खांद्यावरच सोडला जीव
14
जिओ वापरकर्त्यांसाठी वाईट बातमी! दररोज १.५ जीबी डेटासह ८४ दिवसांचा प्लॅन बंद
15
'मी अटक होण्यापूर्वीच राजीनामा दिला होता', अमित शाहांनी सोडलं मौन; वादाचा मुद्दा काय?
16
थयथयाट होणार! रशियाने भारताला कच्च्या तेलावर ५ टक्के सूट सुरुच ठेवली; पुतीन ट्रम्पना भेटून येताच...
17
एरिया मॅनेजरचा पराक्रम! टारगेट पूर्ण करण्यासाठी रेव्ह पार्टी दिली, ३७ जणांना अडकवलं अन्...
18
'ऑनलाइन गेमिंग विधेयक' लोकसभेत मंजूर; Online Games खेळणाऱ्यांसाठी काय आहे शिक्षेची तरतूद?
19
'मोठा धक्का बसला, पण आता...', हल्ल्यानंतर मुख्यमंत्री रेखा गुप्ता यांची पहिली प्रतिक्रिया
20
'रॅपिडो'ला जबर झटका! १० लाखांचा दंड, ग्राहकांना पैसे करण्याचे कंपनीला आदेश; प्रकरण काय?

चालू आहे ‘स्मार्ट इंडिया हॅकेथॉन’

By admin | Updated: April 1, 2017 18:15 IST

आज दिवसभर भारतातले दहा हजार ‘इनोव्हेटर’ तरुण-तरुणी देशासमोरचे अत्यंत गुंतागुंतीचे, गहन प्रश्न सोडवण्याचे मार्ग शोधण्याच्या धडपडीत व्यग्र आहेत.

 -आॅक्सिजन टीमनव्या आर्थिक वर्षाच्या पहिल्या दिवशी भारतात एक आगळे-वेगळे ‘आयोजन’ घडते आहे. आज दिवसभर भारतातले दहा हजार ‘इनोव्हेटर’ तरुण-तरुणी देशासमोरचे अत्यंत गुंतागुंतीचे, गहन प्रश्न सोडवण्याचे मार्ग शोधण्याच्या धडपडीत व्यग्र आहेत. सकाळी आठ वाजल्यापासून देशभरातल्या एकूण सव्वीस ठिकाणी या तरुण-तरुणींच्या तब्बल 1266 टीम्स कामात जुंपल्या असून आज (शनिवारी) रात्री दहा वाजता पंतप्रधान नरेंद्र मोदी या तरुण संशोधक-अभियंत्यांशी संवाद साधतील.- हे आहे ‘स्मार्ट इंडिया हॅकेथॉन’!‘स्मार्ट इंडिया हॅकेथॉन’ : काय? कशासाठी?पंतप्रधान मोदींच्या ‘स्मार्ट इंडिया’ या महत्वाकांक्षी प्रकल्पाचा एक भाग म्हणून आयोजित केलेल्या या हॅकेथॉनमागे देशासमोरच्या प्रश्नांच्या यशस्वी हाताळणीसाठी नव्या कल्पक तारुण्याला वाव देण्याचा उद्देश आहे.नेमके काय होणार या हॅकेथॉन मध्ये?1. जुन्या प्रश्नांकडे पाहण्याची जुनी नजर बदलण्यासाठी ‘आऊट आॅफ द बॉक्स’ विचार करणार्या तरुण अभियंत्यांना संधी देण्याचे ठरल्यावर केंद्र सरकारच्या 29 मंत्रालयांकडून त्यांना भेडसावणार्या प्रश्नांची/समस्यांची यादी मागवण्यात आली. 2. या सर्व यादया एकत्रित करून त्यातून प्राधान्यक्रमाचे एकूण 598 प्रश्न निवडण्यात आले. हे प्रश्न देशातल्या तरुण अभियंत्यांसमोर ठेवले गेले. 3. त्यावर काम करण्यासाठी 42 हजार तरुण-तरुणींनी उत्सुकता दर्शवली.4. या सर्वांना आपापले पहिले सादरीकरण करायला सांगण्यात आले.5. या सादरीकरणांच्या परीक्षणानंतर उत्सुकांमधून 10 हजार तरुण-तरुणींची निवड करण्यात आली.हे सारे अभियंते आज सकाळपासून या देशव्यापी हॅकेथॉनमध्ये सहभागी झाले आहेत.कशाची उत्तरे शोधणार?आज सकाळी 8 वाजता सुरूझालेले हे स्मार्ट इंडीया हॅकेथॉन सलग 36 तास चालणार आहे. सहभागी गटांपुढे वेगवेगळ्या प्रश्नांवर कल्पक तोडगे शोधण्याचे आव्हाब असून त्यातले काही प्रश्न असे :1. आॅनलाईन परीक्षांंमधली ‘डुप्लीकेटगिरी’ नष्ट करणेशाळा-कॉलेजे आणि स्पर्धा परीक्षांची सत्रे ‘आॅनलाईन’ आयोजित करण्यात अपेक्षित विद्याथर््याऐवजी तिसरेच कुणीतरी परीक्षा देण्याची शक्यता तांत्रिकदृष्ट्या टाळता येणे अजूनही शक्य झालेले नाही. त्यासाठी मानवी सहभाग नसलेला ‘फुलप्रुफ मार्ग’ शोधणे2. इलेक्ट्रॉनिक पर्सनल सेफ्टीसंकटात असलेल्या व्यक्तीपर्यंत पोलीस आणि प्रशासनाला तात्काळ मदत पोचवता ये ईल यासाठी ‘इन्टीग्रेटेड सोल्यूशन’ तयार करणे.3. रेल्वे रुळांची सुरक्षीतता :देशभरातील रेल्वे रुळांच्या सुरक्षेवर ‘रिअल टाईम’ नजरे ठेऊ शकेल अशी सॉफ्टवेअर्स आणि संबंधीत यंत्रणेची रचना सुचवणे. 4. राष्ट्रीय महामार्गांवर रुग्णवाहिकामहामार्गांवरून प्रवास करणार्यांना अपघात प्रसंगी जवळचे रुग्णालय अगर रुग्णवाहिकेशी थेट जोडणारे मोबाईल ऐप तयार करणे.5. संवेदनशील कागदपत्रांची फोटो-प्रत रोखणेसंवेदनशील, अतीमहत्वाच्या कागदपत्रांची फोटो-प्रत तयार करणे अगर मोबाईल कैमेर्याने फोटो घेणे रोखणारे ‘सुरक्षा-कव्हर’ तयार करणे6. माध्यान्ह भोजनाची गुणवत्ता तपासणेविद्याथर््यांची गळती रोखण्यासाठी आणि गरिबी रेषेखालच्या मुलांचे नीट पोषण व्हावे यासाठी देशभरात हजारो शाळांमधल्या लाखो मुलांना पोषक माध्यान्ह आहार दिला जातो. या अन्नाची गुणवत्ता जागच्याजागी तपासणारी आणि रोज किती मुलांपर्यंत प्रत्यक्षात हा आहार पोचला याची ‘रिअल टाईम’ गणती उपलध करणारी ‘साधने’ या हॅकेथॉनमधले तरुण अभियंते सुचवणार आहेत.7. साथीच्या रोगांच्या फैलावाबाबत जागरूकताचिकनगुनिया, डेंग्यू यासारख्या रोगांचा फैलाव रोखता यावा यासाठी देशात सतत व्यापक जनजागरणाची गरज असते. हे ‘जागरण’ नेहमीच्या नीरस सरकारी जाहिरातींऐवजी मनोरंजक अशा ‘मोबाईल गेम्स’ मधून करता येईल का, असा एक प्रश्न या अभियंत्यांसमोर ठेवण्यात आला आहे.