शहरं
Join us  
Trending Stories
1
"तीनवेळा 'अल्लाहू अकबर' ओरडून गोळीबार सुरू झाला"; व्हायरल व्हिडीओमधल्या व्यक्तीचा खुलासा
2
नो मॅजिक! क्रिकेटच्या देवाने सांगितले १४ वर्षाच्या पोराच्या वादळी शतकी खेळीत दडलेले 'लॉजिक'
3
पाकिस्तानवर मोठा प्रहार करा! पहलगाम हल्ल्यानंतर जगभरातील भारतीयांची निषेध आंदोलने
4
Vaibhav Suryavanshi : १४ वर्षांच्या पोराचा धुमाकूळ! सिक्सर मारत ठोकली IPL मधील विक्रमी सेंच्युरी
5
विद्यार्थ्यांच्या मनामनात रुजणार भारतीय संविधानाची मूल्ये; नागपूर विद्यापीठाने तयार केला अभ्यासक्रम
6
आनंदाच्या भरात पायाला लागलंय ते विसरला! वैभवच्या शतकी खेळीला द्रविडनं अशी दिली दाद (VIDEO)
7
वेटिंगवाल्या प्रवाशांचा चक्क लिनन बॉक्समधून प्रवास! रेल्वे पोलिसांनी सहा जणांना केली अटक
8
IPL 2025 : वैभव सूर्यंवशीच्या ऐतिहासिक खेळीच्या जोरावर २०० पारच्या लढाईत राजस्थानचा 'रॉयल' विजय
9
विविध रेल्वे गाड्यांमधून दारूच्या एकूण १० हजार बाटल्या जप्त! मद्य तस्करीविरोधात मोठी कारवाई
10
लातूर जिल्ह्यातील हाडोळती येथे युवकाच्या खून प्रकरणी न्यायालयाकडून दाेघांना पोलीस काेठडी
11
नागरिकत्व पाकिस्तानी, मात्र 'दिल हिंदुस्थानी'! उल्हासनगरात २५० जण 'भारतीय' होण्याच्या प्रतीक्षेत
12
'भारतीय सैन्य कधीही हल्ला करू शकते...', पाकिस्तानी संरक्षण मंत्र्याने व्यक्त केली भीती
13
बोगस डॉक्टरांविरोधात प्रशासनाने कसली कंबर; तालुकापातळीवरही समिती सक्षम होणार!
14
जिल्हा पोलिस दलातील सांगलीच्या सहा जणांना महासंचालक सन्मानचिन्ह; १ मे रोजी प्रदान सोहळा
15
हिवराच्या शेंगा खाल्ल्याने २६ मेंढ्यांचा मृत्यू; साताऱ्याजवळील फलटण तालुक्यातील घटना
16
RR vs GT : गिलचा कॅच सुटल्यावर बहिणीने मानले देवाचे आभार; तिची रिॲक्शन होतीये व्हायरल
17
पहलगाम हल्ल्याचा नवीन व्हिडिओ समोर; पर्यटकाच्या कॅमेऱ्यात कैद झाली संपूर्ण घटना, पाहा...
18
Padma Awards: क्रिकेटपटू आर अश्विनला पद्मश्री, हॉकीपटू श्रीजेशला पद्मभूषण; येथे पाहा संपूर्ण यादी!
19
पावसाळ्याआधी मृदा व जलसंधारणाविषयी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी घेतला 'हा' महत्त्वाचा निर्णय
20
'शरिया कोर्ट', 'कोर्ट ऑफ काजी'ला कायदेशीर मान्यता नाही; त्यांचे निर्देश बंधनकारक नाहीत: सर्वोच्च न्यायालय

शट

By admin | Updated: June 19, 2014 21:38 IST

टेक्नॉलॉजी आपल्या आयुष्यातून पूर्णपणे वजा जर करता येणार नसेल तर त्या टेक्नॉलॉजीच्या हातात आपला कण्ट्रोल देण्यापेक्षा आपण स्वत:ला कण्ट्रोल करत तंत्रज्ञानाचा योग्य वापर करायला हवा. स्वत:ला सावरत, कॉम्प्युटर-मोबाइल योग्यवेळी बंद करायला शिकवणारं एक केंद्र

 डॉ. मनोजकुमार शर्मा

टेक्नॉलॉजी आपल्या आयुष्यातून पूर्णपणे वजा जर करता येणार नसेल तर त्या टेक्नॉलॉजीच्या 
हातात आपला कण्ट्रोल देण्यापेक्षा आपण स्वत:ला कण्ट्रोल करत तंत्रज्ञानाचा योग्य वापर 
करायला हवा. स्वत:ला सावरत, कॉम्प्युटर-मोबाइल योग्यवेळी बंद करायला शिकवणारं एक केंद्र
----------
ड्रग किंवा दारूची नशा करणार्‍या माणसांचं जे होतं, जसं होतं तेच सेलफोनच्या, इंटरनेटच्या आणि सोशल नेटवर्किंग साईट्सच्या सतत, अती आणि दीर्घकाळ वापरामुळं ‘वापरणार्‍यांचं’ होतं का?
-तर होतं, हे सगळं ‘अँडिक्टिव्ह’च असतं, असा आजवरचा जगभरातला अभ्यास सांगतो. अवतीभोवतीचे अनेक तरुण आणि किशोरवयीन मुलं अस्वस्थ होत, चुळबुळत सतत आपला मोबाइल कसा चेक करतात हे जरी नीट पाहिलं तरी हे अँडिक्शन लक्षात येईल. ते सतत फोन चेक करतात, सतत फोनवर नवीन मेसेज आलाय की नाही चेक करतात, आला नसेल तर जुनाच मेसेज पुन्हा पुन्हा वाचतात, सोशल नेटवर्किंग साईटवरचे स्वत:चेच फोटो पुन्हा पुन्हा बघतात. सतत स्वत:चेच सेल्फी काढतात, टाकतात. पुन्हा त्यावरच्या कमेण्ट एन्जॉय करत, तिथे कमेण्टस् करत राहतात.
हे चक्र सुरूच राहतं आणि मग ही मुलं निद्रानाश, डिप्रेशन आणि एकटेपणासारख्या व्याधींना बळी पडतात. ते टाळायचं म्हणून पुन्हा आपापल्या व्यसनाचा आधार घेतात. आतून इतके पोकळ, भुसभुशीत बनत जातात की त्यांना स्वत:ला कण्ट्रोल करणं अवघड होऊन बसतं.
अशी मुलं सतत एकच तक्रार करतात, मला ‘बोअर होतंय’, काही जण अटेन्शन सिकिंग करतात, लोकांनी आपल्याकडे लक्ष द्यावं म्हणून मुद्दाम चुकीचंसुद्धा वागतात. फेसबुकवरच्या तमाम फोटोत ते हसरे दिसतात, पार्टी करत असतात, एकदम हॅपनिंग असतं त्यांचं जग पण प्रत्यक्षात मात्र ते उदास-एकेकटेच असतात. त्यांचे पालक मुलाच्या वर्तनाविषयी सतत काळजी करतात, पण घरात मुलांशी एकतर ते बोलू शकत नाही किंवा बोललं तरी मुलं त्यांच्या प्रश्नांना नीट उत्तर देत नाहीत.
हे असं सारं का घडतंय यावर आम्ही संशोधन करत होतो. मुळात कुठलीही टेक्नॉलॉजीच घातक ती बंद करायला हवी हा विचार चुकीचा. टेक्नॉलॉजीचा उत्तम-योग्य आणि कण्ट्रोल्ड वापर आयुष्य सोपं करू शकते. पण तसं झालं नाही की गोष्ट बिघडायला लागतात.
सुरुवातीच्या काळात आमच्याकडे मानसिक समस्या घेऊन येणार्‍या तरुण रुग्णांना आम्ही विचारायचो की इंटरनेट वापरतोस का? किती वापरतो? साधारण २५ टक्के रुग्णांमध्ये एक गोष्ट सारखी होती, एकतर त्यांना आधीपासून मानसिक तणाव होता. इंटरनेटच्या अतीव वापरानं तो वाढला.
मग आम्ही हेही शोधायला लागलो की इंटरनेटच्या अती वापरानं मानसिक तणाव वाढला की मानसिक तणाव होताच म्हणून इंटरनेटचा वापर वाढला.
मग लक्षात यायला लागलं की, जी माणसं इंटरनेट दीर्घकाळ किंवा जास्त वापरतात ते मुख्यत: एकेकटे किंवा एकलकोंडे असतात. त्यांना आपल्या एकटेपणाचा खूप त्रास होतो म्हणून मग ‘माणसं’-गप्पा आणि आधार शोधत ते या आभासी जगात येतात.
१३ ते १८ या वयोगटातल्या मुलांमध्ये तर हा प्रश्न जरा जास्त गंभीर दिसतो. व्हिडीओ गेम आणि फेसबुक यासाठी होणारं या मुलांचं क्रेव्हिंग जबरदस्त होतं. तर १८ ते २५ या वयोगटातही एकेकटे, अबोल असणारे, कुढे असे सारे तरुण इंटरनेटचा हात चटकन पकडताना दिसतात. त्यांच्यासाठी मात्र सोशल नेटवर्किंगबरोबरच पोर्नोग्राफिक साईट्स, तसले व्हीडीओ आणि त्याचं शेअरिंग हे सारं फार एक्सायटिंग असतं. ती एक्साईटमेण्टच त्यांना या व्यसनाची जास्त चटक लावते. आमच्या शहरात आम्ही घरोघर जात मुलांशी या विषयावर बोललो आणि आमच्या लक्षात आलं की मानसिक तणाव, आत्मविश्‍वास कमी आणि इंटरनेटचा अतीवापर यांचा परस्पर संबंध आहेच.
त्यातून या मुलांचा स्वत:वरचा कण्ट्रोल सुटतो. त्यांना इतकं जबरदस्त इंटरनेटचं जबरदस्त क्रेव्हिंग होतं की, त्याक्षणी ते मिळालं नाही तर ते हिंसक होऊ शकतात. आरडाओरडा करतात, चिडतात, अस्वस्थ होतात आणि स्वत:वरचा ताबा सुटत त्यांना भयंकर त्रास होतो.
त्याक्षणी नेट मिळणं, सोशल नेटवर्किंग साईटवर जाणं, चॅट करणं, मेल पाहणं ही त्यांची गरज उरत नाही तर ते त्यांच्यावर कम्पलशनच होतं.
स्वत:साठीच कम्पलसरी होणारी ही गोष्ट त्यांना काचायला लागते. पण तो फंदा गळ्यातून सुटत नाही, सोडवता येत नाही. त्यामुळे चिडचिडी झालेली, अनेकांना भयंकर राग येतो, आईवडिलांशी शत्रू असल्यासारखी वागणारी, मित्रांपासून स्वत:ला तोडणारी अनेक मुलं आम्हाला मग भेटत राहतात. 
मग प्रश्न येतो की यावर उपाय काय? त्यासाठीच आम्ही निम्हांसमध्ये एक ‘शट’ क्लिनिक सुरू केलं आहे. 
‘शट’ म्हणजे सर्व्हिस फॉर हेल्दी युज ऑफ टेक्नॉलॉजी.
टेक्नॉलॉजी आपल्या आयुष्यातून पूर्णपणे वजा जर करता येणार नसेल तर त्या टेक्नॉलॉजीच्या हातात आपला कण्ट्रोल देण्यापेक्षा आपण स्वत:ला कण्ट्रोल करत योग्य वापर करायला हवा. हेच आम्ही इतरांना सांगतो, त्यासाठीचे मार्ग सुचवतो. काही जणांचा मानसिक तणाव कमी करण्यासाठी अन्य औषधोपचार करावे लागतात. पण व्यायाम, आपल्या आवडीचं काम, संगीत ऐकणं, प्रवास हे सारं मदतीला घेत एक उत्तम लाईफस्टाईल चेंज यापलीकडे या प्रश्नावर इलाज नाही.
- खरंतर हा आजार असा आहे की, आपल्याला आजार आहे, तो आपणच बरा करायला पाहिजे हे अनेकांना समजतं, पण त्यांची इच्छाशक्ती कमी पडते. 
ती इच्छाशक्ती वाढवली तरी हे इंटरनेट अँडिक्शन, हे सततच व्यसन आणि ही सततची अस्वस्थता. सारंच संपू शकेल, सुटू शकेल.!
 
(लेखक हे डिपार्टमेण्ट ऑफ क्लिनिकल सायकॉलॉजी,  नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ मेण्टल हेल्थ अँण्ड न्युरो सायन्स येथे  असोसिएट प्रोफेसर पदावर कार्यरत आहेत.)