शहरं
Join us  
Trending Stories
1
एनआयए ऑन द स्पॉट : हल्ल्याचे धागेदोरे तपासणे सुरू, फॉरेन्सिक टीमही घटनास्थळी
2
आजचे राशीभविष्य, २८ एप्रिल २०२५: नोकरीत पदोन्नती अन् व्यापारात व उत्पन्नात वाढ होईल
3
हल्ल्याची छायाचित्रे पाहून भारतीयांचे रक्त उसळते आहे; दहशतवाद्यांना होईल शिक्षा, पीडितांना न्याय मिळेल : मोदी
4
संघर्ष, सीमेच्या ‘आतला’... अंतर्गत संघर्षाचा मुद्दा देशासाठी तेवढाच गंभीर
5
उल्हासनगर शहरात अजूनही १७ सिंधी पाकिस्तानी नागरिक; आज देश सोडून मायदेशात जाणार
6
बडतर्फ पीएसआय कासलेला हर्सूलला हलविले; कराड अन् कासले एकाच कोठडीत होते
7
सुगंध येण्यासाठी तांदळाला लावत होते केमिकल; एफडीएने दाेन दिवसानंतर दिली कारवाईची माहिती
8
सीईटीच्या मॅथ्स पेपरमध्ये घोळ, निम्मे पर्याय चुकीचे; विद्यार्थ्यांचा गोंधळ, सीईटी पर्यवेक्षकांचे कानावर हात
9
भारत-पाक सीमेवरील पीक काढणी दोन दिवसांत पूर्ण करा, सीमा सुरक्षा दलाचे सीमाभागातील शेतकऱ्यांना निर्देश
10
रक्त संतापाने उसळते आहे, आता बास! आम्ही भारतीय लोक पोकळ धमक्या देत नसतो
11
ईडी कार्यालयाला आग; संशयाचा धूर , मुंबई साखर झोपेत असताना दुर्घटना, कारण अस्पष्ट
12
किती अधिकाऱ्यांना मंत्रालयात सुनावणीसाठी बोलावणार?
13
एनसीईआरटीच्या पाठ्यपुस्तकांतून मुघल, दिल्ली सल्तनतचे संदर्भ हटविले
14
गणेश नाईकांचा वारू शिंदेसेना रोखेल काय?; दोघेही एकमेकांना शह देण्याची संधी सोडत नाहीत
15
एकही पाकिस्तानी महाराष्ट्रात राहणार नाही : देवेंद्र फडणवीस
16
भारत-फ्रान्स यांच्यात आज होणार Rafale-M jetsचा करार; भारतीय नौदल होणार अधिक सामर्थ्यवान
17
DC vs RCB : भर मैदानात कोहली-केएल राहुल यांच्यात वाजलं? नेमकं काय घडलं? (VIDEO)
18
पाकिस्तानी नागरिकांनी दिलेल्या वेळेत भारत सोडला नाही तर बसणार मोठा दणका, काय होणार शिक्षा?
19
Shocking!! सायबर चौकात दहशत! कोल्हापुरात सराईत गुंडाकडून तलवारीने हल्ला; दोघे जखमी
20
राज्याला हादरवणाऱ्या शिक्षण घोटाळ्याची ईडीने मागविली माहिती; SIT गठीत करण्याच्या हालचालींना वेग

ऑनलाइन शॉपिंग करताय? -ही सूत्रं पाठच करून ठेवा.

By admin | Updated: July 24, 2014 19:26 IST

ऑनलाइन शॉपिंग तरुण मुलं सर्रास करतात किंवा तरुण मुलंच ऑनलाइन शॉपिंग जास्त करतात कारण ते नेटसॅव्ही असतात.

ऑनलाइन शॉपिंग तरुण मुलं सर्रास करतात किंवा तरुण मुलंच ऑनलाइन शॉपिंग जास्त करतात कारण ते नेटसॅव्ही असतात. आता तर काय हातातल्या मोबाइलनंही चटकन काहीही ऑनलाइन विकत घेता येऊ शकतं. पण तुम्ही कितीही नेटसॅव्ही असा, काही गोष्टी तुम्हाला माहिती नसतील तर तुमची फसवणूक होऊच शकते. अशी फसवणूक होते कारण ऑनलाइन शॉपिंग करताना जी कमीत कमी काळजी तरी घेणं भाग असतं, प्रायव्हसी सेटिंग तपासणं, उत्तम अँण्टीव्हायरस घालून घेणं हे सारं अत्यंत गरजेचं असतं. अनेक जणांना हे सारं माहितीही असतं, पण तरीही ते त्यांच्याकडे क्षुल्लक बाबी म्हणून दुर्लक्ष करतात, मग पस्तावतात.
त्यामुळे ऑनलाइन शॉपिंग करत असाल, करणार असाल तर या काही गोष्टी आवर्जून कराच.
 
१) लिंकमधून लिंक? अजिबात नाही.
तुम्ही फेसबुकवर आहात किंवा दुसर्‍याच एखाद्या साइटवर आहात तिथे जाहिरात म्हणून एखादी लिंक येते, 
पॉप अप विंडो उघडते, तुम्हाला इंटरेस्टिंग ऑफर्स दिसतात म्हणून तिथंच क्लिक करत त्या साइटवर जाता. जायला हरकत नाही, पण या मार्गानं गेला तर त्या साइटवर शॉपिंग करू नका. तुम्हाला शॉपिंग करायचंच असेल तर त्या साइटचं नाव दुसर्‍या नव्या स्वतंत्र अँड्रेसबारमध्ये टाइप करा. स्वतंत्र साइट उघडली तर सगळ्या गोष्टी नीट तपासून पहा. कुठलीही साइट कमालीच्या स्वतंत्र वस्तू विकण्याच्या दावा करत असतील तर सावध व्हा. अतिस्वस्त ऑफर/स्किममध्ये काहीतरी धोका असू शकतो.
 
२) इमेज ऑफ अ लॉक
कुठलीही साइट ओपन झाली की तिच्या तळाशी, बॉटमला अगदी उजव्या कोपर्‍यात एक ‘लॉक’चं चित्र दिसतं. ते दिसतंय का पहा. वेबसाइट सेफ आहे की नाही हे पाहण्यासाठी ब्राऊजरमध्ये बंद घड्याळाचं चित्र आहे की नाही हेही तपासता येईल. त्या आयकॉनवर क्लिक करा. तिथं क्लिक केल्यावर एक सिक्युरिटी सर्टिफिकेट दिसेल. ते असलं तर चिंता नाही, पण नसेल तर आयडेंटिटी थेफ्टच्या मोठय़ा जाळ्यात तुम्ही स्वत:हून तुमची माहिती देताय हे लक्षात घ्या.
 
३) चेक प्रायव्हसी पॉलिसी
आपण कुठं चेक करतो कुठल्याच साइटची प्रायव्हसी पॉलिसी. तुम्ही बॅँकेचे डिटेल्स देता तेव्हा त्या साइटवाल्यांविषयी तुम्हाला भरवसा वाटतो का? ते तुम्ही दिलेली माहिती दुसर्‍याला देणार नाहीत हे कशावरून? त्यामुळे त्या साइटची प्रायव्हसी पॉलिसी चेक करा. त्यात सगळी माहिती मिळते. ऑनलाइन शॉपिंग कुठल्याही साइटवरून करा, पण त्यांची पॉलिसी तपासून पहाच.
 
४) खोट्या ईमेल्स
तुम्ही ऑनलाइन खरेदी करताय यावर ऑनलाइन चोरांचं लक्ष असतं. कधीतरी तुम्ही शॉपिंग केल्यावर तुम्हाला एखादी मेल येऊ शकते. तुमचं ट्रॅन्झ्ॉक्शन अडलंय. त्यासाठी अमुक पासवर्ड, तमुक माहिती द्या. तशी ईमेल आलीच तर अजिबात उत्तर पाठवू नका. आधी त्या साइटच्या कस्टमर केअरला फोन करा. त्यांनी अशी ईमेल पाठवलीये का, खात्री करा. आवश्यक असेल तर तपशील फोनवर सांगा, पण मेलवर पासवर्ड लिहून पाठवून नका.
 
५) सिक्युअर्ड प्रोग्रॅम
एकदा खरेदी झाली, ती तुम्ही डेबिट किंवा क्रेडीट कार्ड कशानंही करा. पण खरेदी केल्यानंतर साईन अप करतानाच  'verified by Visa' किंवा "master secured code program(s)" (२) यापैकी एका ऑप्शनवर क्लिक करा. म्हणजे पुढच्या वेळेस तुम्ही जेव्हा शॉपिंग कराल तेव्हा ते ट्रॅन्झ्ॉक्शन फक्त तुम्हीच ऑथराईज्ड करू शकता.