हुबेहूब सृष्टी निर्माण करण्याचं एक क्रिएटिव्ह आव्हान
सेट डिझायनर हा शब्द सिनेमामुळे बरेचदा तुमच्या आमच्या कामावरून जातो. पण मग वाटतं आपण काही सिनेमात काम करू शकत नाही, आपला काय संबंध?
तर संबंध आहे.
आता सेट डिझाइनिंग हे काम फक्त सिनेमा-नाटक आणि टीव्हीपुरतं र्मयादित उरलेलं. नाही तीन ठिकाणी सर्वाधिक काम मिळतं आणि सर्वाधिक पैसाही मिळतो हे खरं आहे. मात्र छोट्या शहरातले छोटे सांस्कृतिक कार्यक्रम अगदी शाळांचे गॅदरिंग या टप्प्यातही सेट डिझाइनिंगचं काम होऊ शकतं.
म्हणूनच सेट डिझाइनिंग कडे एक नवी क्रिएटिव्ह संधी म्हणून पहायला हवं.
सेट डिझाइनर कोण असतात ?
खरंतर ज्याच्याकडे काही तांत्रक ज्ञान नाही असाही कुणी सेट डिझाइनर होऊ शकतो असं म्हणतात पण ते खरं नाही. ज्याला सुतारकामाचं ज्ञान आहे, कॅडकॅम झालेलं आहे, ज्याचा पेंटिंगवर हात आहे, ज्याला उत्तम स्केचिंग करता येतं, जो चांगला आर्किटेक्ट आहे त्यापैकी कुणीही सेट डिझाइनिंग करण्याचा विचार करू शकतो.
पण हे काम सोपं नाही. एकट्याचं तर नाहीच नाही, त्यासाठी टीम हवी आणि प्रचंड शारीरिक कष्टही हवेत.
विशेषत: बीएफए किंवा एमएफए म्हणजे फाउंडेशन आर्ट्सची डिग्री असलेल्यांना या क्षेत्रात बराच स्कोप आहे.
प्रशिक्षण कुठे?
१) सेट डिझाइनिंगचं थेट प्रशिक्षण मिळू शकत नसलं तरी बीएफए करून या करिअरचा विचार करता येऊ शकतो.
२) ड्राफ्टिंग, फ्री हॅण्ड ड्रॉइंग,
३) सिनिक पेंटिंग
४) मॉडेल मेकिंग याचे अभ्यास करूनही या वाटेनं जाता येऊ शकतं.