शहरं
Join us  
Trending Stories
1
लॉरेन्स गँग नाही...! एल्विश यादवच्या घरावर भाऊ गँगने गोळीबार केला; कारणही सांगितले...
2
कोल्हापूर सर्किट बेंचचे थोड्याच वेळात उद्घाटन होणार, पहा कसे बनवलेय कोर्ट चकाचक...
3
पुरंदर विमानतळ : शेतकऱ्यांचा मोबदला प्रलंबित, शरद पवारांची मुख्यमंत्र्यांशी चर्चा होणार
4
“नाशिकमध्ये आमचे ७ आमदार, पालकमंत्रीपद आम्हाला मिळालयला हवे”; छगन भुजबळ स्पष्टच बोलले
5
प्रेयसीच्या लग्नाने प्रियकर संतापला; तिच्या कुटुंबाला उडवण्यासाठी होम थिएटरमध्ये ठेवला बॉम्ब
6
इस्रायली नौदलाचा येमेनवर मोठा हल्ला, क्षणार्धात इमारतीतून येऊ लागले धुराचे लोट; पाहा व्हिडीओ
7
ज्योती चांदेकर यांच्यावर पुण्यात अंत्यसंस्कार, आईला शेवटचा निरोप देताना तेजस्विनी पंडितची भावुक अवस्था
8
महामंडळ वाटपाचं ठरलं, कोणाला मिळणार संधी? अजित पवार म्हणाले...
9
भारताला वेगळा न्याय? तेल खरेदीवरुन भारतावर निर्बंध, पण ट्रम्प यांनी स्वतः रशियासोबत वाढवला व्यापार!
10
निवृत्त झालेल्या आजोबांना मिळाले ३ कोटी, आनंदात पत्नीला सोडून राहू लागले वेगळे! पण पुढे काय झालं वाचाच...
11
'खुदा'ने मला रक्षक बनवले, मला पद..; सत्तापालटाच्या चर्चेदरम्यान असीम मुनीरचे सूचक विधान
12
म्यानमार सैन्याने स्वतःच्याच देशावर केला हवाई हल्ला; २१ जणांचा मृत्यू, १५ घरांचे नुकसान
13
अण्णा, आतातरी उठा! मतांची चोरी होत असताना तुमच्यासारखा ज्येष्ठ गांधीवादी समाजसेवक शांत कसा?
14
ट्रम्प यांना नक्की हवे तरी काय? व्यापारविषयक टीमचा भारत दौरा लांबला; टॅरिफवरील चर्चा रखडणार!
15
१ वर्षांसाठीच FD करायची आहे? जाणून घ्या कोणत्या बँकेत मिळतोय सर्वाधिक व्याजदर!
16
किश्तवाडनंतर कठुआमध्ये ढगफुटीने प्रचंड नुकसान, ४ जणांचा मृत्यू; रेल्वे ट्रॅक आणि महामार्गाचेही नुकसान
17
ज्योती चांदेकर यांची 'ती' भूमिका अन् बाळासाहेब ठाकरेंनी घेतलेली दखल, कोणता होता तो सिनेमा?
18
“मुंबई महापालिका कुणी लुटली, हे मुंबईच्या जनतेला माहिती आहे”; संजय राऊतांचा पलटवार
19
सोन्याच्या किमतीत मोठी घसरण, खरेदी करण्याची सुवर्णसंधी! २४ कॅरेट सोन्याच्या १० ग्रॅमचा नवीन दर काय?
20
आजचे राशीभविष्य, १७ ऑगस्ट २०२५: अचानक धनलाभ, मान-सन्मान; सरकारी कामात यश, शुभ दिवस

शुध्द पाण्याचं एटीएम

By admin | Updated: July 11, 2016 13:56 IST

शहरात राहणाऱ्यांना प्यायच्या पाण्यासाठी इतकं झगडावं लागत नाही जितकी तडफड ग्रामीण भागात राहणाऱ्या लोकांना एक हंडाभर पाणी मिळवण्यासाठी करावी लागते.

 शहरात राहणाऱ्यांना प्यायच्या पाण्यासाठी इतकं झगडावं लागत नाही जितकी तडफड ग्रामीण भागात राहणाऱ्या लोकांना एक हंडाभर पाणी मिळवण्यासाठी करावी लागते. तसं नाही म्हणायला पिण्याच्या पाण्याचं महत्त्वं महाराष्ट्रातल्या शहरी भागांनाही यंदाच्या दुष्काळानं पटवून दिलंच आहे. पण दुष्काळ असो नाहीतर सुकाळ पिण्याच्या पाण्यासाठी मैलोनमैल पायपीट करणं हे ग्रामीण भागातल्या लोकांच्या सवयीचंच झालं आहे. कधीमधी वर्तमानपत्रात याबद्दल वाचल्यावर, वृत्तवाहिन्यांवरील दृश्यांमध्ये पाण्याच्या हालाची दृश्य पाहिल्यानंतर तेवढ्यापुरती हळहळ वाटते. पण तो प्रश्न त्यांचा आहे या मानसिकतेनं अशा बातम्यांमधून चटकन पाहणारे, वाचणारे स्वत:ची सुटकाही करवून घेतात. पण मुंबईमधल्या धीरूभाई अंबानी इंटरनॅशनल स्कूलमध्ये अकरावीत शिकणारी दिया श्रॉफ नावाची विद्यार्थिनी याला अपवादच म्हणावी लागेल. पिण्याच्या पाण्यासाठी ग्रामीण भागातले हाल पाहून दिया अस्वस्थ झाली. तिची अस्वस्थता तेवढ्यापुरतीच मर्यादित राहिली नाही. तिच्या संशोधक बुध्दीनं यावर उपाय शोधायचं ठरवलं.ग्रामीण भागात किमान पिण्याचं काही लिटर शुध्द पाणी तरी प्रत्येक कुटुंबाला हमखास मिळालं तर त्यांचे कष्ट कितीतरी हलके होतील. दीयानं आपल्या या कल्पनेबाबतची चर्चा युरेका फोर्बस कंपनीशी केली. त्यांच्यात झालेल्या विचारविनिमयातून शुध्द पाण्याच्या एटीएमची कल्पना सुचली. पैशाच्य एटीएम मशीनसारखं पाण्याचं एटीएम मशीन बसवण्याचा हा जलजीवन प्रकल्प आहे. संपूर्ण भारतातल्या ग्रामीण भागात हे पाण्याचे एटीएम बसवले तर ग्रामीण भागातल्या लोकांचा पिण्याचा प्रश्न सुटू शकतो असं दीयाला वाटतं. दीयाच्या कल्पनेतून साकार झालेला जलजीवन हा पाण्याचा एटीएम प्रकल्प सोलापूरमधल्या प्रभाग क्रमांक 30 मधल्या रेवणसिध्देश्वर झोपडवस्तीत प्रायोगिक तत्त्वावर सुरू करण्यात आला आहे. अर्थातच तिनं शोधलं आणि ते लगेच साकारालं असं झालं नाही. तिनं वैयक्तिक पातळीवर, सरकारी कार्यालयातून आणि नगर परिषदेकडून देणग्या गोळा केल्या. त्यातून जमलेल्या पैशातून सोलापूरमध्ये हा प्रकल्प आकारास आला. पाण्याचे एटीएम मशीन त्या त्या भागातल्या बोरवेल, विहिर या पाण्याच्या स्त्रोतांशी जोडलेल्या शुध्दीकरण प्रकल्पाशी जोडलेलं असतं. पाणी शुध्दीकरण प्रकल्प विहीर, बोरवेल मधल्या पाण्याचं शुध्दीकरण करतं. या प्रकल्पातलं पाणी मग त्याला जोडलेल्या टाकीत साठवलं जातं. आणि हे साठवलेलं पाणी या टाकीला जोडलेल्या एटीएमद्वारे प्रत्यक्ष लोकांमध्ये वितरित केलं जातं. एटीएमद्वारे लोकांना पाणी मिळण्यासाठी प्रत्येक कुटुंबाला एक एटीएम कार्ड दिलं जातं. जे त्या मशीनवर स्क्रॅच केलं की स्क्रॅच करणाऱ्यांना वीस लीटर शुध्द पाणी मिळतं. दीयाला पाण्याच्या एटीएम प्रकल्प संशोधनासाठी राष्ट्रीय पातळीवरचा पुरस्कारही मिळाला आहे. -माधुरी पेठकर