- प्रगती जाधव-पाटील,
लॉकडाऊनच्या सहा महिन्यांत पबजीने आम्हा मित्रांमध्ये अनोखं नातं रूढ केलं.. वर्षानुवर्षे ज्यांच्यासोबत शिक्षण घेतलं त्यांच्याबरोबर टय़ूनिंग जुळलं ते या खेळामुळेच.. पबजी हा स्ट्रॅटजी गेम आहे. त्याचं व्यसन नाही लागतं. मात्र स्ट्रेस रिलीज करण्याचा आम्हा सर्वाचा उत्तम पर्याय होता.. -तो सांगत असतो. पबजीवर बंदी आल्यानंतर या खेळाचे शौकीन असणारी तरुणाई अक्षरशर् दुर्खात बुडाली होती. या गेमवर उदरनिर्वाह असणारे स्ट्रिमर तर अक्षरशर् उद्ध्वस्त होऊन समाजमाध्यमांद्वारे आपली हतबलता व्यक्त करत आहेत. काहींनी तर कुटुंबीयांशी बंड करून हा खेळ खेळण्यासाठी घर सोडलं होतं. पाश्र्वभूमीवर सातारा तालुक्यातील करंजे गावचा सुमित काळभोर, पबजी तोही खेळायचा. लॉकडाऊन काळात सकाळी 9 र्पयत उठून आवरून 11 ते 1 या वेळेत तो वॉर्मअप मॅच खेळायचा. दुपारी 2 ते सायंकाळी 6 असं चार तास मुख्य गेम खेळली जायची. त्यानंतर डोळ्यांना विश्रांती आणि मोबाइल चाजिर्गच्या निमित्ताने गेम बंद ठेवली जायची. सायंकाळी सातनंतर लॅपटॉपवर सोशल मीडियाद्वारे ‘स्ट्रिमर ट्रीक्स’ बघण्यात तास दीडतास सहज जायचा. घराल्यांबरोबर रात्रीचं जेवण झालं की दहा ते अकरा वॉर्मअप गेम व्हायची. साडेअकरा नंतर पुढं किमान चार तास स्ट्रॅटजी करून ही गेम पहाटेर्पयत असं अनेकांचं रूटीन होतं.
(प्रगती लोकमतच्या सातारा आवृत्तीत उपसंपादक आहे)