शहरं
Join us  
Trending Stories
1
PHOTO: संपूर्ण ठाकरे कुटुंब एकाच व्यासपीठावर एकत्र... खास पोज देत काढला 'फॅमिली फोटो'
2
"हिंदुत्व ही कोणत्याही भाषेची मक्तेदारी नाही, आम्ही मराठी बोलणारे तुमच्यापेक्षा…’’, उद्धव ठाकरेंनी भाजपाला सुनावले
3
भारताच्या शत्रूसोबत अजरबैजानची १७ हजार कोटींची डील, काय आहे त्यांचा प्लान?
4
राज ठाकरेंजवळ आदित्य, उद्धव ठाकरेंजवळ अमित, सुप्रिया सुळेंनी एकत्र आणलं; पाहा Video
5
Uddhav Thackeray pats Raj Thackeray Video : कौतुकाची थाप..!! राज ठाकरे यांच्या भाषणानंतर उद्धव ठाकरे यांच्या कृतीने मराठी माणूस सुखावला...
6
"निवडणुकीत हरणार म्हणून कुटुंब "तहात" जिंकण्याचा प्रयत्न"; भाजपाचा पलटवार
7
"३० वर्ष झाली तरी मराठी माणसासारखी..."; सुशील केडियांनी राज ठाकरेंची जाहीर माफी मागितली
8
Zerodha च्या संस्थापकांचा मोठा इशारा, एक्सचेज आणि ब्रोकर्ससाठी वाईट ठरू शकतं हे वृत्त; का म्हणाले नितीन कामथ असं?
9
Raj-Uddhav Thackeray Vijayi Melava Live Update: ...तर आहोत आम्ही गुंड; उद्धव ठाकरेंचं मुख्यमंत्री फडणवीसांना आव्हान
10
Raj Thackeray : "तुमच्याकडे सत्ता विधान भवनात असेल, आमच्याकडे रस्त्यावर...",हिंदी सक्तीवरुन राज ठाकरेंचा राज्य सरकारला इशारा
11
Uddhav Thackeray : "आमच्या दोघांमधला अंतरपाट अनाजी पंतांनी दूर केला"; उद्धव ठाकरेंचा फडणवीसांना टोला
12
Raj Thackeray : ठाकरेंची मुलं इंग्रजी मीडियममध्ये शिकली, या आरोपावर राज ठाकरेंनी स्पष्टच सांगितलं
13
मराठी कलाकारांसमोर राज ठाकरेंकडून बॉलिवूडच्या ए.आर.रहमानचं कौतुक, सांगितला 'तो' प्रसंग
14
"जे बाळासाहेबांना आणि इतरांना जमलं नाही ते फडणवीसांना जमलं’’, राज ठाकरे यांचं मोठं विधान
15
"एकत्र आलो एकत्र राहण्यासाठी, आमचं एकत्र दिसणं महत्त्वाचं," उद्धव ठाकरेंचं सूचक विधान
16
Raj Thackeray : जास्त नाटकं केली, तर कानाखाली आवाज काढलाच पाहिजे; पण...; राज ठाकरेंचा 'सैनिकां'ना आदेश
17
सुरतेची "स्वारी" आता हुजरेगिरीसाठी उरली...; अमोल कोल्हेंचा एकनाथ शिंदेवर कवितेतून निशाणा
18
'मुंबई आकर सारी हेकडी निकाल दूंगा', पप्पू यादव यांचे राज ठाकरेंना चॅलेंज!
19
खळखट्याक सुरू; मराठीत बोलणार नाही म्हणणाऱ्या सुशील केडिया यांचं कार्यालय फोडलं
20
त्रिनिदाद आणि टोबॅगोच नव्हे, 'या' २५ देशांनी देखील पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना दिलाय सर्वोच्च सन्मान!

गावचा प्रोफेशनल गडी

By admin | Updated: May 22, 2014 16:02 IST

खेड्यापाड्यात काय पोरं छंद जोपासणार? त्यातून काय व्यवसाय करणार? खेड्यात कसला आलाय स्कोप असं काही बुरसटलेलं ज्याच्या कुणाच्या डोक्यात असेल त्यानं बिनधास्त या तरुणाला भेटावं.

किशोर बागडे- कोण म्हणतं खेड्यापाड्यात हाताला काम नाही.कलेतून व्यवसायाचं रुजलं एक बी.

------------------

खेड्यापाड्यात काय पोरं छंद जोपासणार? त्यातून काय व्यवसाय करणार? खेड्यात कसला आलाय स्कोप असं काही बुरसटलेलं ज्याच्या कुणाच्या डोक्यात असेल त्यानं बिनधास्त या तरुणाला भेटावं. छंद हा व्यवसाय बनेल, हे त्याला कधीही वाटलं नव्हतं, मात्र हलाखीच्या परिस्थितीवर मात करून त्यानं आपला छंद जोपासला एवढेच नव्हे तर आता त्याच छंदातून व्यवसाय सुरू करून त्याने पाच युवकांना रोजगारसुद्धा दिला आहे.

कशी सुचली आयडिया?
निर्जीव वस्तूंमध्ये प्राण ओतून सुंदर वस्तू बनवणारा किशोर बागडे. आमगाव या छोट्याशा गावातल्या  मिताराम बागडे यांचा हा मुलगा. वयाच्या बाराव्या वर्षापासूनच टाकाऊ वस्तूत कला शोधण्याचे त्यास वेध लागले. गव्हाच्या दांड्या, गवत, बांबू, भुसा, रेती, गुंजा, फुले, पाने, पराग, शिंपली, तुळशीची मंजिरी गोळा करून त्यापासून निसर्गरम्य सिनेरी बोर्ड व शुभेच्छा पत्रे तयार करणे हा त्याचा नित्यक्रम होता. राजस्थानी आर्ट, प्राचीन कलाकृती, फोटो फ्रेम, नेमप्लेट, जहाज, लेटर बॉक्स तसेच निसर्गाचे हुबेहूब अनुपम सौंदर्य आपल्या कलाकृतीने टिपून कलात्मक वस्तू तो तयार करतो. त्याच्या मनात असलेल्या विषयाला अनुसरून तो निसर्गचित्रे उभारण्याचा प्रयत्न करतो. 
किशोरचे बारावीपर्यंतचे शिक्षण झाले. घरची परिस्थिती हलाखीची. त्यामुळे कुटुंबाचा बोजा किशोरवर आला. त्याला स्वत:चा व्यवसाय सुरू करायचा होता पण पैसा नव्हता. त्यामुळे त्याने सन २00९ मध्ये पंतप्रधान रोजगार निर्मिती कार्यक्रम योजनेंतर्गत कर्ज घेतले. जिल्हा उद्योग केंद्र गोंदिया येथील १0 दिवसीय विशेष प्रशिक्षण घेऊन आपल्या व्यवसायाचे बीज रोवले. सिनेरी बोर्ड, ग्रिटिंग कार्डस् आणि होर्डिंग, फ्लेक्स बोर्ड, नंबर प्लेट, सन कंट्रोल फिल्म, स्टिकर, थर्माकॉल आर्ट, स्टिल लेटर, आयकार्ड, लॅमिनेशन, कव्हरिंग, लग्नपत्रिका, व्हिजिटिंग कार्ड, क्लोजप फोटो, फोटो मिक्सिंग, व्हिडीओ शूटिंग, फोटोग्राफी व रेडियम डिझायनिंग, थर्माकॉल वर्क आदि कलाकृती तयार करण्याचा व्यवसाय त्यानं सुरू केला. त्याच्या हस्तकलेची आदिवासी हस्त विकास संस्था गोंदियाने दखल घेतली आहे. आज त्याच्याकडे प्रेमेंद्र वाटकर, मुकुंद भांडारकर, दिलीप वासनिक, मंगल पाचे व नरेश फुंडे हे पाच युवक काम करीत आहेत. 
आता त्याच्या छोट्या गावात व्यवसायाचा जम बसू लागला आहे.
अडचणी काय आल्या?
१) अपमान होतात, हातात पैसे नसतात तेव्हा कुणी उभं करत नाही. पण आपल्या हातांवर, कष्टांवर विश्‍वास ठेवावाच लागतो.
२) आपल्याला हे काम जमेल, असं इतरांना वाटत नाही. त्यामुळे स्वत:ला सिद्ध करावं लागतं, तो काळ अवघड असतो.
 लक्षात काय ठेवायचं?
१) आपला हात जगन्नाथ एवढंच लक्षात ठेवायचं. शहरं-खेडी असा काही फरक नसतो. आपलं काम प्रोफेशनल असावं लागतं, हेच महत्त्वाचं.
 
- एच. के. फुंडे,कालीमाटी (गोंदिया)