शहरं
Join us  
Trending Stories
1
Vikram Misri: भारत- पाकिस्तान युद्धविरामानंतर परराष्ट्र सचिव मिस्री ट्रोल, मुलीबद्दल आक्षेपार्ह कमेंट
2
Operation Sindoor : "ऑपरेशन सिंदूरमध्ये IC-814 प्लेन हायजॅक आणि पुलवामा हल्ल्यातील मास्टरमाइंडचा खात्मा"
3
'भारतीय सैन्याने 35-40 पाकिस्तानी सैनिक मारले', ऑपरेशन सिंदूरबाबत DGMO यांची मोठी माहिती
4
India Pakistan Latest Update: भारत पाकिस्तानातील दहशतवादी अड्डे उडवणार, अमेरिकेला आठ दिवस आधीच होती माहिती
5
Eknath Shinde: ...तर जगाच्या नकाशातून पाकिस्तानचं नाव कायमचं गायब केलं जाईल, एकनाथ शिंदे पेटले
6
Operation Sindoor : "दहशतवाद्यांचा खात्मा करणं हे 'ऑपरेशन सिंदूर'चं उद्दिष्ट, १०० हून अधिक दहशतवाद्यांना केलं ठार"
7
...तर पाकिस्तानची खैर नाही, आणखी टेन्शन वाढणार; आता दरवर्षी 100 ब्रह्मोस तयार होणार! 
8
पन्हाळगडावर पावसाची जोरदार हजेरी, पहिल्याच पावसात मुख्य रस्त्यावर २ मोठ्या शिळा कोसळल्या
9
"वहां से गोली चलेगी, यहां से गोला चलेगा"; PM मोदींचा उच्चस्तरीय बैठकीत लष्कराला स्पष्ट मेसेज
10
"२६ जणांच्या मृत्यूचा बदला घेतला, आम्हाला मोदींचा अभिमान..."; आदिल हुसेनच्या भावाचं विधान
11
Operation Sindoor Live Updates: "जर पाकिस्तानने आज रात्री शस्त्रसंधीचं उल्लंघन केलं तर आम्ही त्याला जोरदार प्रत्युत्तर देऊ"
12
कर्जावर जगणारा पाकिस्तान लढाऊ विमानं, ड्रोन अन् बॉम्ब खरेदीसाठी एवढा पैसा आणतो कुठूण? सैन्याचे उद्योगधंदे जाणून थक्क व्हाल!
13
"गर्व वाटतो... जे मी करू शकलो नाही, ते मुलानं करून दाखवलं...!"; हुतात्मा मेजर पवन यांच्या वडिलांचे शब्द वाचून तुमचेही डोळे पाणावतील
14
'...तर पाकिस्तानला विनाशकारी उत्तर दिलं जाईल', अमेरिकेच्या उपराष्ट्राध्यक्षांसोबत PM मोदींची चर्चा
15
लोणावळ्यात गुलाबी सुटकेसमध्ये आढळलेल्या मृतदेहाचे गूढ उकलले, दोघांना अटक, हत्येचे कारण...
16
दहशतवाद्यांना स्थानिकांची मदत; काश्मीरमध्ये 20 ठिकाणी छापे, स्लीपर सेल मॉड्यूलचा पर्दाफाश
17
मंदिरात दिवा लावण्यासाठी गेलेल्या वृद्ध महिलेची 8 ग्रँम सोने व १० ग्रँम चांदीसाठी हत्या
18
Seema Haider : "तुला कोणीही मारणार नाही, तू परत ये"; ढसाढसा रडली सीमाची बहीण, मोदींकडे मागितली मदत
19
१० वर्षांच्या प्रवासानंतर, एकमेकांचे झाले, अक्षय-साधनाचा सुंदर क्षण, पाहा भावूक करणारा Video
20
तिरंगी वनडे मालिकेत टीम इंडियाचा डंका! यजमान श्रीलंकेला पराभूत करत हरमनप्रीत ब्रिगेडनं जिंकली ट्रॉफी

प्रे फॉर. कशाकशासाठी हात जोडायचे.?

By admin | Updated: November 19, 2015 21:47 IST

एखादी अत्याचाराची, दहशतवादाची क्रूर घटना घडली की निघाला मेणबत्ती मोर्चा. सरकारने विरोधात निर्णय घेतला की निषेध मोर्चा.

पवन देशपांडे (लेखक ‘लोकमत’च्या मुंबई आवृत्तीत मुख्य उपसंपादक आहेत.)

एखादी अत्याचाराची, दहशतवादाची क्रूर घटना घडली की निघाला मेणबत्ती मोर्चा. सरकारने विरोधात निर्णय घेतला की निषेध मोर्चा. एखाद्या देशात भीषण आपत्ती ओढवली की काढला सहानुभूती मार्च. 
अन् एखादी दहशतवादी घटना घडली की त्या देशाच्या राष्ट्रध्वजाचा रंग लेपून बदलला फेसबुक प्रोफाइल फोटो.. 
भावना व्यक्त करण्याचा फक्त ट्रेंड बदलत जातोय.. कुणी व्यक्त होतंय, कुणी मूकपणो सहानुभूती दर्शवतोय.. पण ‘प्रे फॉर’ हा शब्द कायम आहे.. मानवतेला काळिमा फासणा:या घटना जोर्पयत घडत राहतील तोवर सारं जग रोजच कोणासाठी तरी ‘प्रे’ करत राहणार आहे.. 
पॅरिसवर दहशवादी हल्ला झाल्यानंतर अशीच एक लाट सोशल मीडियावर येऊन कोसळली. खुद्द मार्क झुकेरबर्गसह कोटय़वधी फेसबुक युजर्सने त्यांचा प्रोफाइल फोटो फ्रान्सच्या राष्ट्रध्वजाच्या रंगाने लेपून टाकला. ‘प्रे फॉर पॅरिस’ असा हॅशटॅग जगभर पोहोचला आणि बघता बघता कोटय़वधी लोकांनी हा शब्द वापरून पॅरिसबद्दल सहानुभूती दर्शविली. काहींनी इसिस या दहशतवादी संघटनेविरोधात चीड व्यक्त केली. काहींनी अमेरिका आणि रशियाच्या धोरणाबद्दल खदखद बाहेर काढली. पण यात अनेक जण असेही होते ज्यांनी केवळ पॅरिस हल्ला आणि इस्लामच्या नावाखाली क्रूर हत्त्या करत सुटलेल्या इसिस या दहशतवादी संघटनेच्या कारवायांच्याही पुढे जाऊन विचार मांडले. 
हवेसारखं मुक्त वातावरण, प्रेमाचा बहर, छायारंगांची उधळण आणि कला-सांस्कृतिकता घेऊन अखंड वाहणारी सीन नदी अशी पॅरिस या शहराची ओळख. निसर्गाने रंगांची बेधडक उधळण करत सुटावे तशी इथली तरुणाई बेधडक आहे. स्वतंत्र विचार, सहिष्णुता आणि असहिष्णुतेच्याही पुढे. म्हणून प्रत्येक जण आपल्या विचाराने जगतो. मन मानेल तसा वागतो. इथली तरुणाई खरं तर धर्माच्याही पुढे गेलेली आढळते.
त्यामुळे या काळात पॅरिसमध्ये राहणा:या तारुण्याला काय वाटत होतं, ते कसं व्यक्त होत होतं हे शोधण्यासाठी इंटरनेट धुंडाळलं, तर पॅरिसमधे राहणारे आणि व्यक्त करणारे काही तरुण दोस्त भेटले.
ज्ॉमी ब्रिस या तरुणानं फेसबुकवर अशीच पोस्ट टाकली. तो म्हणतो, तुमच्या जवळच्या दुकानात काम करणारा एकही मुस्लीम तरुण पॅरिस हल्ल्यात सहभागी नव्हता. एखाद्या बँकेत काम करणारा मुस्लीम नागरिक या कटात सहभागी नव्हता किंवा तुम्ही ज्या टॅक्सीतून विश्वासानं घरार्पयत पोहोचता त्या टॅक्सीचा मुस्लीम चालकही या हल्ल्यात सहभागी नव्हता. कारण यामागे असणारी ही संघटनाच मुस्लीम नाही. ती आहे एक दहशवतवादी संघटना. राक्षसी संघटना. ते मुस्लीम नव्हेत. त्यांना कोणताच धर्म नाही. असेल तर आहे राक्षसी वृत्ती. म्हणूनच इस्लामला बदनाम करणा:या या क्रूर संघटनेमुळे इतर निरपराध मुस्लिमांना वेठीस धरून चालणार नाही. आपण एक कुटुंब आहोत, हे जग एक कुटुंब आहे आणि या हल्ल्याने आपल्याला आणखी जवळ येण्याचा संदेश दिला आहे. ािश्चन आणि मुस्लीम असा भेदभाव आपण उफाळून काढणार असू, तर इसिसच्या राक्षसांचे मनसुबे सार्थकी लागले म्हणून समजा.
बन्ना कुयातेहनेही अशीच पोस्ट टाकली. तो म्हणतो, पॅरिसवर झालेल्या हल्ल्यात जे सहभागी होते ते इस्लामच्या नावाचा वापर करणारे आहेत. खरं तर त्यांचा इस्लामशी संबंधच नाही. निरपराधांचे जीव घेत सुटलेल्या इसिसच्या या कारवाया बघून आम्ही सारेच मुस्लीम बांधव हैराण आहोत. 
थॉमस ािस्तोफर म्हणतो, पाश्चिमात्य देशांनी आता तरी धडा घ्यावा. धर्माधतेच्या नावाखाली सुरू असलेल्या दहशतवादी कारवायांना केवळ शस्त्रस्त्रंच्या बळावर संपवले जाऊ शकत नाही.
आर्ट सेव्हज लाइव्हस या आंतरराष्ट्रीय ऑनलाइन मॅगङिानची संपादक शेरलोट फरहान म्हणाली की, मी पॅरिसची. पण मी फेसबुक प्रोफाइल बदलणार नाही. त्याला फ्रान्सच्या राष्ट्रध्वजाचा रंगही देणार नाही. कारण केवळ पॅरिस हल्ल्यासाठी मी असं करणं मला चुकीचं वाटतं. जगात दररोज कुठे ना कुठे असे होताहेत. मला जर फेसबुक प्रोफाइल बदलायचा असेल तर तो रोज बदलावा लागेल. मी कोणत्याही सीमा मानत नाही. मानवतेला कोणतीही सीमा नसते. जगात होणा:या प्रत्येक दहशतवादी हल्ल्यातील बळींबद्दल मला वाईट वाटतं. हल्ले करणारे त्यांच्या फायद्यासाठी सारं करतात. धर्माधतेच्या नावाखाली बळी घेत सुटतात. त्यांना या जगात एकता नकोय. फूट हवीय. दहशत पसरवण्यामागचे कारणही तेच आहे. 
हल्ल्यानंतर माणुसकीचं दर्शन केवळ सोशल मीडियावर घडलं नाही तर पॅरिसमध्ये ते प्रत्यक्षातही अनुभवायला मिळालं. हल्ला झाल्यानंतर प्रत्येकाने कोण कोणत्या धर्माचा हे न बघता मदतीचा हात पुढे केला. ‘ओपन डोअर्स’ ही मोहीम उघडली. या, तुम्हाला राहायला जागा नसेल तर आम्ही तुमचं आदरातिथ्य करायला तयार आहोत, असं म्हणणा:यांची मोठी फळी काही क्षणांतच उभी राहिली. रोज हजारोंचा गल्ला कमावणा:या टॅक्सीचालकांनी सर्वाना सुरक्षित स्थळी पोहोचवण्यासाठी मोफत सेवा सुरू केली.
हे सारं वाचून वाटतं की, आज जगभरातल्या तारुण्याला प्रश्न पडलाय की, शांततेनं जगायचं कसं? की धर्म असाच आपल्या आयुष्यात उच्छाद मांडत राहणार?