शहरं
Join us  
Trending Stories
1
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
2
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
3
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
4
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
5
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
6
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?
7
पाकिस्तानला ड्रोन हल्ल्याची भीती! सैनिकांना फोन बंद करण्याचे दिले निर्देश
8
इराणच्या राजाई बंदरात भीषण स्फोट; ४०६ जखमी, अनेकांचा मृत्यू झाल्याची भीती
9
पाकिस्तानींना देश सोडण्याचे आदेश, अदनान सामी सोशल मीडियावर झाला ट्रोल, अखेर संतापून म्हणाला...  
10
"सीमा हैदर भारताची सून, तिला पाकिस्तानात पाठवू नका", राखी सावंतची विनंती, म्हणाली...
11
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’
12
भारताजवळ आहेत दोन शक्तिशाली ब्रह्मास्त्रं, पाकिस्तानमधील लाहोर, कराचीसारखी शहरं क्षणार्धात करू शकतात नष्ट
13
मुंबई: अंधेरीत आठ मजली इमारतीत अग्नितांडव, १ महिलेचा मृत्यू; ६ जण जखमी
14
पाकचे पंतप्रधान आता तटस्थ चौकशीस तयार, CM ओमर अब्दुल्लांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले...
15
पहलगाम हल्ल्याची आधी जबाबदारी घेतली, आता भारताने कारवाई सुरू केल्यावर टीआरएफचा 'यू-टर्न'
16
मनसेकडून प्रतिसभागृह, आदित्य ठाकरेंना निमंत्रण; भाजपा नाराज, सहभागी होण्यास नकार
17
काळजी घ्या! कारमध्ये ठेवलेल्या बाटलीमुळे आग लागू शकते; कारणे जाणून घ्या
18
वडील विनोद खन्ना यांच्यासोबत काम का करायचं नव्हतं? 'छावा' फेम अक्षय खन्नाने सांगितलेलं हैराण करणारं कारण
19
Airtel नं लाँच केला जबरदस्त प्लान; हाय स्पीड डेटासह मिळणार 'इतके' फायदे, जाणून घ्या
20
बदलापूर रेल्वे स्थानकातून येऊ शकते चेंगराचेंगरीची बातमी; 'हा' व्हिडीओ बघून काळजात होईल धस्स!

तरुण मुलं म्हणतात, आपलं डोकं करू प्रयोग!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 10, 2019 15:05 IST

युनिसेक्स सलून असा शब्द तरी होता का पूर्वी? आणि सध्या मुलींच्या पुढे जाऊन मुलं आपल्या केसांचं जे काय करतात, तशी शक्यता तरी होती का याआधी?

ठळक मुद्देकोण काय म्हणेल? ..त्याच्याशी माझा काय संबंध?

प्राची  पाठक 

तरुण  मुलांच्या डोक्यावर हेअर स्टाइल्सच्या रूपात काय काय दिसेल, काही सांगता येत नाही, असा एक सर्रास सूर. मुलींच्या नाही तरुण मुलांच्या हेअर स्टाइलची जणू लाट आली आहे सर्वत्र. डोक्यावर झाड उगवावं असे थेट उभेच केस असतात कोणाचे. कोणी कानापाशी एकदम चकोट केलेला असतो. कोणी वेणी घातलेली असते, केस वाढवलेले असतात, तर कोणी केसांना वेगवेगळे रंग लावलेले असतात. जुन्या नजरांना अत्यंत विचित्र वाटेल, असंच हे सगळं प्रकरण. पूर्वी ‘केश कर्तनालय’ असे बोर्ड असत. अजूनही दिसतात ते कुठे कुठे. तिथे केवळ पुरुषच जात. सिनेमांमध्ये तर अशा जागा म्हणजे गॉसिप अड्डा म्हणूनच दाखवलेल्या असतात. तिथे चालू घडामोडींवर गप्पा ठोकणारा एक कट्टा तयार झालेला असतो. त्यात स्त्रिया नसतातच. ‘ओन्ली मेन्स’ अशा पाटय़ाही दुकानांवर लावलेल्या असतात. स्त्रिया चुकून दिसल्याच तिथं तर त्यांच्या लहान मुलामुलीला घेऊन आलेल्या दिसतात. स्वतर्‍साठी अशा फार कमी. हळूहळू हा ट्रेन्ड बदलला. हे नेमकं काय सुरू आहे आसपास? हा कुठला नवीन ट्रेन्ड? वरवर वाटतो तो हेअर स्टायलिंगचा ट्रेन्ड; पण प्रत्यक्षात तो तसा नाही.  आता तरुण मुलग्यांच्या  विचित्र वाटणार्‍या हेअर स्टाइल्स बघून नाकं मुरडली जातात. इतरही अनेक मुद्दे त्यात घुसडले जातात. त्या मुद्दय़ांमध्ये काही प्रमाणात तथ्य असेलसुद्धा. पण मुलांच्या हेअर स्टाइलकडे बघायचा वेगळा दृष्टिकोन केसांची ‘केस’ पालटवून देतो पार! तरुण मुलांनी केसांना रंगीबेरंगी रंग लावणं चांगलं की वाईट ते नंतर ठरवू. पण तरुण मुलं स्वतर्‍च्या डोक्यावर स्वतर्‍च्या इच्छेने काहीतरी प्रयोग करत आहेत, हा बदल आधी लक्षात घेऊ. नवनवीन ट्रेन्डच्या आकर्षणासाठी आपलं डोकंच प्रयोग करायला देणं, ही तशी मोठी गोष्ट असते. मनात स्पष्टता असल्याशिवाय ही कृती घडत नाही. वेगवेगळ्या प्रकारच्या चित्र-विचित्र हेअर स्टाइल्स अगदी हौस म्हणूनसुद्धा केल्या, तरी त्या प्रत्यक्ष करून झाल्यावर आपल्या आपल्यालाच आवडतील, असंही नसतं. हेअर स्टाइल करून झाल्यानंतर दिसणारा आपला चेहरा आणि ते बरेवाईट केस आपले आपल्याला स्वीकारायला लागतात. त्यामुळे आपल्या डोक्यावरच्या केसांचं जे काही करायचं आहे, त्याची पूर्ण जबाबदारी आपल्यावरच घ्यावी लागते. काय हे करून बसलो अशी फिलिंग नंतर त्या हेअर स्टाइलमुळे आली, तरी केस वाढायला वेळ जायचा तो जाणारच असतो. ते केस काही जसे कापले, तशाच वेगाने झर्रकन वाढणार नसतात. ते मेन्टेनसुद्धा करावे लागतात सतत. त्यातून सातत्य शिकता येतं, अशी स्वतर्‍ची समजून काढायला आपण आपल्यालाच ट्रेन करत असतो. आजकालच्या मुलांना किनई पेशन्सच नाही, त्यांना सगळं इन्स्टन्ट हवं अशी जी एक सर्वत्र ऐकू येणारी तक्रार असते तिच्यासाठी हे हेअर स्टाइलचं उदाहरण म्हणजे सर जो तेरा चकराये होऊ शकतं टीकाकारांसाठी. केसांची स्टाइल निवडायची जबाबदारी, त्यावर होणार्‍या खर्चाचं भान, ते करून झाल्यावर येणारे लई भारी किंवा काय बकवास स्टाइल आहे, हे विचार अशी सगळी जबाबदारी आपल्याच डोक्यावर येऊन पडलेली असते. पेशन्स शिकायची भारी संधी, असंही हे प्रकरण बघता येतंच. अनेकदा आपल्याला स्वतर्‍ला मोठय़ा ग्रुपमध्ये नीटसं प्रेझेन्ट करता येत नसतं. आपण चांगले दिसतो की नाही, लोकांना आपलं दिसणं आवडतं की नाही, असे खूपच प्रश्न मनाला सतत कुरतडत असतात. एकीकडे सटासट सेल्फी काढणारे आपण आपल्या दिसण्याबद्दल कळत नकळत खूप कॉम्प्लेक्स ठेवून वावरत असतो. अशी एखादी फ्रिकी हेअर स्टाइल कधीतरी करून बघण्यात म्हणूनच मजा असते. त्यासोबतच मनातले वेगवेगळे कॉम्प्लेक्सेस एका बाजूला झटक्यात ढकलायची संधीसुद्धा असते! आपल्या डोक्यावरचं असं एक ओझं जे आपलं आपल्याला मनात येईल तेव्हा थोडं फार हलकं करता येतं, बदलता येतं. मजा घ्यावी या सगळ्याची, किमान एकदा तरी. असा हा म्हटलं तर धाडसी अनुभव आहे.असं धाडस करायची का पूर्वी तरुण असलेली पिढी सर्रास?

तरुण मुलं म्हणतात,आपलं डोकं करू प्रयोग!

1. हेअर स्टायलिंगचा ट्रेन्ड फारच झपाटय़ानं बदलला. आता शहरात तरी युनिसेक्स सलून गल्लोगल्ली दिसायला लागली आहेत. नुसतेच लेडीज ब्यूटिपार्लर आणि ओन्ली जेन्ट्स सलून असे प्रकार कमी होत जात आहेत. पुरुष स्त्रियांचे आणि स्त्रिया पुरु षांचे केस कापून देतात. 2. हेअर स्टाइल करणारे आणि करून घेणारे दोघंही तरुण दिसतात. एक जेंडर न्यूट्रल आणि  हेल्दी वातावरण सलूनमध्येही तयार होताना दिसतं. त्यात एक सहजता आहे. वागण्या-बोलण्यात मोकळेपणा आहे. 3.अनेक तरु ण मुलंमुली हेअर स्टायलिस्ट म्हणून करिअर करताना दिसत आहेत.  फुल टाईम जॉब करतात. 4. दुसरीकडे नव्या हेअर स्टाइल करायचं धाडस करणारे कोणी क्लीन शेव्हड असतात, तर कोणी फॅन्सी दाढी, मिशा ठेवतात. डोक्यावरच्या केसांमध्ये एक बारीकशी रेष केस पूर्ण कापून काढलेली असते. 5. मुलींना कपडय़ांची, केसांच्या स्टाइलची केवढी सारी व्हरायटी असते, असं खूप मुलं पूर्वी म्हणत राहायची. त्यांना इतकी व्हरायटी मिळत नसे. पण आजकाल मुलांच्या केसांच्या स्टाइलचा जमाना आहे. इतरांच्या डोळ्यांत ते खुपलं तरी त्याचं कोणाला काही पडलेलं नसतं. 6. नवनवीन प्रयोग स्वतर्‍वर करून बघायचे असतात. अपनी मर्जी, अपनी स्टाइल. आपल्याला काय सूट होतं, काय नाही ते ठरायच्या आतच एक बेदरकारपणासुद्धा असतो अंगात. अमुक ठिकाणचे केस उडवले तर कोणी हसेल, कोणी चिडवेल ही भीती कमी झालेली असते. घरातले काय म्हणतील, लोक नावं ठेवतील, याची तर फिकीरच नसते. प्रयोग स्वतर्‍वर करण्याचं स्वातंत्र्य ते जगतात.