- मयूरी पाथरकर
कॉस्मेटोलॉजीच्या अभ्यासानंतर पार्लर व्यवसायाकडे कल होता. पण त्यातही काहीतरी नवीन करता येईल का हा विचार सतत डोक्यात होता. त्यामुळे विविध क्षेत्रंविषयी जाणून घ्यायचा सपाटा लावला होता. मार्केटमधे फिरून फॅशन ट्रेंड्स समजून घेणं, फॅशन एक्स्पोमधे जाणं सुरू असताना अचानक एका फॅशन प्रदर्शनात जर्मन महिला ‘इंगाबोर्ग फ्रीम्मेल’ यांच्याशी ओळख झाली.
जर्मनीत त्यांचा स्वत:चा ‘कॅथरिन’ हा स्टुडिओ होता. त्या युरोपियन नेल आर्टच्या एक्स्पर्ट आहेत. त्यांनी दाखवलेली युरोपियन नेल आर्टच्या प्रात्यक्षिकांनी भारावून गेले होते. नवीन तंत्र शिकण्याची प्रगल्भ इच्छा जाणवत होती. मग एका नेल आर्ट सेमिनारमधे नेल आर्ट व युरोपियन टेक्निक्स शिकले. भारतात अजूनही या कलेने तितकासा जम धरला नाही, मात्र या कलेचा अभ्यास करून त्यात नवनवे प्रयोग करण्याचा सपाटा सुरू केला आहे.
नेल आर्टच्या शास्त्रशुद्ध उच्च शिक्षणासाठी जर्मनीलाही जाऊन आले. जर्मनीतील ‘कॅथरिन’ या स्टुडिओमधे शिकून मीसुद्धा प्रेरणा घेतली. तिकडच्या नेल आर्टच्या पद्धती, ट्रेंड्स, डिझाइन, टूल्स आणि या कलेला मिळणारा प्रतिसाद पाहून अवाक् झाले. दिवसागणिक कित्येक तरुणी तिथे असलेल्या ‘नेल सलोन’ मध्ये जाऊन नेल डिझाइन करून घेत असतात. जर्मनीच्या विविध शहरांत वेगवेगळ्या स्तराचे नेल स्टुडिओ आहेत.
बाजारात विविधरंगी आणि तसेच विविधढंगी नेल आर्ट करतात. भारतात स्त्रियांना पुरेसा वेळ नसल्यामुळे जे लवकर होईल ते डिझाइन करून हवे असते. त्यात जास्तीत जास्त आवड ज्वेल्स आणि ग्लीटरची, चकचकीत, झगमगीत नेलची. त्याचबरोबर स्टेनसिल्स आणि गाइड्समुळे सगळंच अगदी झटपट होतं. पण माझी नेल आर्टची पद्धत थोडी वेगळी आहे.
मार्केटमधे वापरल्या जाणा:या अॅक्रेलिक टिप्सच्या ऐवजी नैसर्गिक नखांवर जेल एक्स्टेन्शनचा वापर करून अगदी स्वत:ची नखे असल्याचा भाव निर्माण करतो. त्यावर नाजूक, रेखीव आणि आवडीप्रमाणो ‘फ्री हँड वन स्ट्रोक’ पद्धतीने डिझाइन करतो. जेल पॉलिशमुळे तयार केलेले डिझाईन 3-4 आठवडय़ांर्पयत नखांवर सुरक्षित राहते. नखे नाजूक असतात. त्यामुळे बटबटीत कलाकृतीपेक्षा मिनीमेलिस्टीक एलिमेंट्सचा वापर केल्यामुळे हाताचे सौंदर्य जास्त खुलून दिसते.
आजच्या घडीला माङयाकडेही काही मुली ही कला शिकायला येतात. नेल आर्ट आणि युरोपियन तंत्रच्या वाढत्या गरजांमुळे जास्तीत जास्त मुलींना ते शिकवता यावं यासाठी लवकरच ‘संडे नेल क्लब’ ही नवीन संकल्पना राबविण्याचे मी ठरविले आहे. विविध धर्म, भाषा, कलांनी नटलेल्या देशातील विविध चित्रकारींचा समावेश करून नेल डिझाइनमधे भारतीय टच कसा देता येईल यावर जोरदार काम सुरू आहे. येत्या काही काळात खूप नवनवीन प्रयोग होऊन, नव्या संकल्पनांनी हे नेल डिझाइनचं क्षेत्रसुद्धा समृद्ध होईल अशी खात्री आहे.