ग्रामीण भागात महिला/मुलींनी सॅनिटरी नॅपकिन्स वापरावेत म्हणून प्रयत्न होतात. पण वापरून त्यांनी ती टाकायची कुठं? त्याची विल्हेवाट कशी लावायची? - या प्रश्नाचं उत्तर शोधत केतकीनं एक मशीनच बनवलं. झिरोपॅड झिरोपॅड
ठळक मुद्देजे वापरायला स्मार्ट आणि यूजर फ्रेण्डली तर आहेच; पण डिस्पोजलची समस्याच ते संपवून टाकतं.
-केतकी कोकीळ
तुम्ही आपल्या भारतीय समाजातशिकत असता तेव्हा तुम्ही एकतर डॉक्टर व्हावं अशी अपेक्षा असते, की इंजिनिअर व्हावं.मला मात्र सुरुवातीपासून माहिती होतं की, ती वाट आपली नाही. मी रूढीवादी शिक्षणाचं अनुसरण करणार नाही. शिक्षणाचा प्रवाह निवडण्याचं स्वातंत्र्य पालकांनीही मला दिलं. माङया बालपणातही मी सर्जनशीलतेनं अनेक गोष्टी करत होते,भिन्न असलं तरी माझं मत मांडत होते.माङया कुटुंब सामाजिक जाणीव आणि समाजाबद्दलची आपली जबाबदारी यांचा विचार करूनच तसं आयुष्य जगते. ते सारं माङया पाठीशी होतंच.मला शाळेत असतानाच उत्पादनांच्या डिझाइनमध्ये मला रस निर्माण झाला.तेव्हापासून मी माझं शिक्षण त्यादिशेनं केलं आणि आपण याक्षेत्रत काम करायचं असं ठरवलं.उत्पादनांचं/वस्तूंचं डिझाइन करण्याच्या ब:याच संधी मला हाका मारत होत्या. मला त्यांचं आकर्षण होतं असं म्हणा.मात्र आपण जे बनवू, डिझाइन करूत्यानं लोकांचं जीवन सुधारेल. समाजावर त्याचा महत्त्वपूर्ण परिणाम होऊ शकेल असं काहीतरी करावं असं मनात होतं.मी 2क्16 मध्ये एमआयटी इन्स्टिटय़ूट्स ऑफ डिझाइनमध्ये औद्योगिक उत्पादनांच्या डिझाइन या विषयात बॅचलर्स पदवी मिळविली.कॉलेजमधून पदवी घेतल्यानंतर, मी टिकाऊ डिझाइनच्या आमच्या कौटुंबिक व्यवसायात सामील झाले. समाजासाठी काहीतरी करायचं, त्यादृष्टीनं काही डिझाइन करायचं असं मनात होतं; परंतु आत्मविश्वासाचा अभाव होता. मग मला ‘निर्माण’ या उपक्र माबद्दल समजलं. त्याबद्दल माहिती घेतली.योगायोग असा की प्रत्यक्ष राणीताई बंग यांची आमच्याच घरी भेट झाली. खूप गप्पा झाल्या. त्यांचा आदर्श डोळ्यासमोर ठेवून निर्माण मध्ये सहभागी होण्यासाठी मी तयारीला लागले.माझी निवड झाली निर्माण शिबिरासाठी. दहा दिवसासाठी गडचिरोली इथे माझा मुक्काम सुरू झाला. दिवसभर भरपूर उपक्र म असायचे. गटचर्चा, भूमिका नाटय़, खेळ, सृजनात्मक गोष्टी असे खूप कार्यक्र म होते. रोज रात्नी एखादा विषय घेऊन चर्चा व्हायची. त्यामुळे सगळ्यांना बोलायची संधी मिळायची. सगळ्यांनी मिळून काम करण्याची सवय लागली.
ही संपूर्ण प्रक्रि या अत्यंत प्रकाशमय होती कारण यामुळे डोक्यात असलेल्या कल्पना मी नेमक्या सांगू लागले.ज्या गोष्टी आपल्याला ङोप घेण्यापासून मागे ठेवत होत्या त्या समजल्या. कल्पनांची अंमलबजावणी करण्याचा आत्मविश्वास निर्माण झाला.यामुळे मला खूप फायदा झाला. स्वत:कडे बघण्याचा नवा दृष्टिकोन मिळाला. माझातल्या कमतरता मला कळाल्या. त्यावर काम करण्याचं मी ठरवलं.मी पटकन कुणामध्ये मिक्स होत नाही. मला राग लवकर येतो. मला नवीन गोष्टी शिकायचे हेजिटेशन होतं. मला मोकळेपणो संवाद साधता येत नव्हता.निर्माणमुळे हे सारं मागे ठेवून मी मस्त आत्मविश्वासानं कामाला लागले.निर्माणने दिलेली शिदोरी घेऊन मी माङया व्यावसायिक कामाला सुरुवात केली.इकोसेन्स अप्लायन्समध्ये काम सुरूझालं. आपल्या कामाचा समाजासाठी उपयोग झाला पाहिजे म्हणून मी ग्रामीण भागात फिरत होते. गरजा समजून घेत होते.गावोगावी जाऊन महिलांशी बोलले. त्यांचे प्रॉब्लेम्स, प्रश्न समजून घेण्याचा प्रयत्न केला. त्यांना खूप समस्या आहेत याची जाणीव झाली आपण यात काय करू शकतो? असा विचार सुरूकेला. सगळ्यात आधी महिलांच्या आरोग्याचे प्रश्न आणि त्यांच्या आरोग्याची काळजी हे दोन विषय डोळ्यासमोर आले.रोजचा स्वयंपाक हेसुद्धा कष्टाचं काम असतं. चुलीवर अन्न अजूनही अनेकजणींना शिजवावं लागतं.हे पाहून मी आणि माङया टीमने सर्वेक्षण केलं. त्यातूनच ‘इकोचूल’ची निर्मिती झाली.या चुलीचे फायदे असे की धूरविरहित चूल, डोळ्यांना त्नास होत नाही, सरपण गोळा करावं लागत नाही.ती चूल महिलांना उपयोगी ठरेल असं मला, माङया टीमला वाटलं.गावोगावी फिरताना अजून एक मोठी समस्या लक्षात आली. ती म्हणजे सॅनिटरीची नॅपकिन.त्या चार दिवसात सॅनिटरी नॅपकिन वापरा असं सगळेच सांगतात.पण त्याच्या डिस्पोजलची काहीच व्यवस्था नाही.ते मुलींनी/महिलांनी कुठं टाकायचे?त्यातून मुलींची/महिलांची कुचंबणा किती वाढते.मग या समस्येवर उत्तर शोधायला हवं. असं काहीतरी हवं जे गावात वापरता येईल, ज्याचा वापर मुली आणि महिलांसाठी सोपा, सोयीचा असेल असं यंत्र बनवायचं ठरवलं.त्यातून झिरोपॅड नावाचं अजून एक प्रॉडक्ट मी तयार केलं. त्यातून पर्यावरणाला मदत होते. स्वच्छता राखली जाते. त्या वापरलेल्या पॅडची जर योग्य विल्हेवाट लागली तर ते वापरण्यासंदर्भातला मुलींना वाटणारा संकोच कमी होईल. अशा सगळ्या गोष्टी त्यातून साधतील.क्लीन इंडिया मिशन देशात राबवलं गेलं. त्यातून देशभरात अनेक तरुणांमध्येही स्वच्छतेचं भान जागं होत होती. ती सरकारची योजना होती, कुणा राजकीय पक्षाची नव्हे.त्यामुळे झिरोपॅडसारख्या गोष्टी ही गावपातळीवरची गरज बनेल.हे मशीन काय आहे, तर सर्वेक्षणात आम्ही स्थानिक गरज काय याचा विचार केला.त्यानंतर उपाय शोधताना आम्ही संशोधन आधारित दृष्टिकोन ठेवला. त्यातून उत्तरं शोधली.आमचे आरएनडी हेड अक्षरश: कटारिया यांनी वेगवेगळ्या चाचण्या केल्या. सॅनिटरी नॅपकिन कशाचं बनतं, त्यातले घटक याचा अभ्यास केला.सॅनिटरी नॅपकिन विल्हेवाट लावण्यासाठी कोणती उत्तम पद्धत आहे याचा अभ्यास केला. त्यात थर्मल अभियांत्रिकी संदर्भातील ज्ञानाचा उपयोग केला. बाजारपेठेतील उपकरणांपेक्षा डिव्हाइस अधिक सक्षम केलं. आम्ही वापरलेलं तंत्नज्ञान बाजारात कोणत्याही विकसक किंवा विक्रे त्याद्वारे वापरले जात नाही, यामुळे सॅनिटरी नॅपकिन विल्हेवाट लावताना निघणारा धूर कमी होतो.या उत्पादनाचा आम्ही तंत्नज्ञान पेटंट केलं आहे. पेटंट प्रकाशित झालं आहे. आम्ही आता प्रतीक्षा कालावधीत आहोत. आम्ही विचार केला की आम्ही ज्या डिव्हाइस बाजारात दाखल करू ते वापरकत्र्यासाठीअनुकूल असेल. अत्याधुनिक तंत्नज्ञान तसंच डिझाइन केलं आहे जे वापरताना स्रिया आणि मुलींना वापरताना अभिमान वाटेल.ते जाळून टाकतानाही वातावरणाला, पर्यावरणाला हानी पोहचणार नाही, प्रदूषण होणार नाही याचाही आम्ही विचार केला आहे.या प्रवासानं मला खूप काही शिकवलं, आणि नव्या प्रयोगांसाठी, डिझाइनसाठी सज्ज केलं!
गरज काय? शोधलं कसं?
1. सुरुवातीच्या टप्प्यात जेव्हा आम्ही सर्वेक्षण करायचो तेव्हा गावखेडय़ातल्या ब:याच स्रियांनी या विषयावर बोलण्यास नकार दिला. जा म्हणाल्या, नाही बोलणार ! अखेरीस काही स्रिया आमच्याशी बोलल्या. त्यांनी सॅनिटरी नॅपकिन वापरण्याचे अतिशय त्रसदायक अनुभव सांगितले.काहींनी इतके विनोदानं सांगितले की, आम्ही हसून दमलो.आम्ही अभियांत्रिकीच्या मुलींच्या वसतिगृहात गेलो होतो. मला वाटलं शिक्षित मुलींनी मासिक पाळीकडे शास्रीय दृष्टीने पहावे.पण त्या लाजाळू. काही बोलल्याच नाहीत. यामुळे मला तरु ण मुलींमध्ये या विषयाबद्दल जागरूकता निर्माण करण्याची अधिक आवश्यकता आहे हे लक्षात आलं.
2. आम्ही शून्य पॅड डिझाइन करण्यासाठी जाणीवपूर्वक प्रयत्न केले जेणोकरून ते स्थापित करणं सोपं, वापरण्यास सुलभ आणि देखरेखीसाठी सुलभ असावं. वापरकर्तीनं झाकण उघडणं, वापरलेले रूमाल ठेवणं आणि नंतर झाकण बंद करणं प्रेशर कुकर वापरण्यापेक्षा हे मशीन वापरणं सोपं आहे.आम्ही हे उपरकणं इतकं स्मार्ट केलं आहे की ते आत टाकलेल्या नॅपकिन्सची गणना करतं.मोजून, त्याची क्षमता असेल तोर्पयत नॅपकिन्स स्वीकारतं. त्याची हीटिंग सिस्टम विषारी वायूंचं उत्सर्जन न करता नॅपकिन जळतं. एकूणच चक्र सुमारे 30 मिनिटे घेतं. नॅपकिन्सची राख होते. जी बागेत टाकता येऊ शकते, किंवा डस्टबिनमध्येही.
3. ग्रामीण भागातल्या महिलांना, महाराष्ट्रात गावोगावी याचा वापर व्हावा अशी आता माझी इच्छा आहे.