शहरं
Join us  
Trending Stories
1
बारामतीची लढत थांबणार? पोटनिवडणुकीत काँग्रेसने उमेदवारी मागे घेण्यासाठी ठेवली 'ही' अट!
2
मेल, एक्स्प्रेस तक्रारी ‘कमी’ दाखवण्यासाठी १३९ हेल्पलाईन ऐवजी व्हॉट्सॲपचा वापर
3
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी घसरण; मोठ्या चढ-उतारादरम्यान पाहा दिल्ली, मुंबई, चेन्नईतील नवे दर
4
"उद्या सुट्टी आहे, माझ्या अंत्ययात्रेला या"; पतीसाठी भावनिक चिठ्ठी लिहून विवाहितेने संपवलं जीवन!
5
सुरक्षित आणि करमुक्त गुंतवणुकीसाठी PPF उत्तम पर्याय; दरमहा ११,००० रुपयांच्या गुंतवणुकीवर मिळवा इतका परतावा
6
जागतिक संकेतांमुळे शेअर बाजारात घसरण; सेन्सेक्स ३८४ अंकांनी तर निफ्टी ११६ अंकांनी कोसळला
7
उन्हाच्या तडाख्यामुळे मुंबईकरांचा जलसाठा १० टक्क्यांनी घटला, आता ३७ टक्केच शिल्लक
8
११५ वर्षे जुना एल्फिन्स्टन पूल अखेर इतिहासजमा; महारेलच्या विलंबामुळे ब्लॉक दीड तासांनी लांबला
9
'तुमच्या तपस्येतच नाही तर फोटोशॉपमध्येही उणीव', हिमंता बिस्वा सरमांच्या पत्नीचा पवन खेडा यांना टोला
10
‘मेट्रो २ बी, मेट्रो ९’ला पुन्हा नवीन तारीख; आता मंगळवारपासून दोन्ही मार्गिका सेवेत
11
वैद्यकीय महाविद्यालयाचा कारभार कसा आहे, फीडबॅक द्या! राष्ट्रीय वैद्यकीय आयोगाची मोहिम
12
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघडतंय सामान्यांचं बजेट
13
मुंबई पालिका क्षेत्रात महिलांकरता मोफत स्वच्छतागृहांच्या सुधारित धोरणासाठी प्रयत्नशील! - महापौर
14
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
15
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
16
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
17
लेख: मुंबईकरांची लोकलराणी वारंवार का अडखळतेय? आजकाल धाप लागल्यासारखी करतेय...
18
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
19
लेख: शिक्षिकेऐवजी नेत्याचा, पोलिसाचा मुलगा असता तर..? चार वर्षांच्या विघ्नेशची उपचारासाठी फरफट
Daily Top 2Weekly Top 5

गांबियातली ही फ्युजन सिंगर सध्या जगभर गाजतेय ती का?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 28, 2019 12:27 IST

गांबिया नावाचा दक्षिण आफ्रिकी देश. अतिशय मागास. तिथली ही गायिका. तिनं कोरा हे वाद्य तर पुनरुज्जीवित केलंच; पण आता तिचं फ्यूझन म्युझिक अनेकांना वेड लावतं आहे.

ठळक मुद्देअरेबिक स्टाइलचाही तिच्या गाण्यावर प्रभाव आहे.  तिचं हे फ्यूझन संगीत आता जगभर गाजतं आहे.

- शिल्पा दातार-जोशी

Hmmmm, suba sayain the darkness of deaththe orphans cryMy mother told me that life is difficultsome are laughingwhile others cry everyday.

‘सुबा साया’ या आपल्या प्रसिद्ध अल्बमचे हे बोल, ती आफ्रिकी भाषेत प्रेक्षकांसमोर सादर करत असते. अर्थातच त्या बोलाचा अर्थ कळत नाही; पण आशिया, आफ्रिकेसारख्या विकसनशील देशांत अज्ञान, गरिबी, प्रथांमुळे माणसाचा रोजच्या जगण्यातला संघर्ष तिच्या गाण्यातून आत झिरपतो. हेच तिच्या गाण्याचं वैशिष्टय़. ग्रीऑट घराण्याचा पारंपरिक संगीत व वाद्याचा सात शतकांचा वारसा तिनं पुनरु ज्जीवित केलाय. सोना जोबार्तेह तिचं नाव.उच्च अभिरुचीचा पेहराव, हाताच्या कोपरार्पयत येणार्‍या बाह्यांचा कुर्ता, आफ्रिकी धाटणीची केश व वेशभूषा, सडपातळ, गडद रंगाची सोना श्रोत्यांसमोर येते. तिच्या हातातून खांद्यावर धरलेलं वाद्य इतकं जड असतं की तिला पेलवेल कसं असं वाटतं. हे वाद्य म्हणजे पश्चिम आफ्रिकेचं पारंपरिक वाद्य कोरा. आपल्या पाच वर्षाच्या मुलाच्या सिद्दिकीच्या बुटांचे बंद जितक्या सहजतेनं लावेल, तितक्या सराईतपणे तिच्या हातांची बोटं कोराच्या 21 तारांवरून लयबद्धतेनं फिरू लागतात. त्यातून स्वर उमटतात, हे स्वर आतून आलेले असतात. या स्वरांबरोबर आपल्या मृदू आवाजाने सोना जोबार्तेह गाऊ लागते. गाण्याचे बोल कळत नाहीत, कदाचित ते मँडिंका भाषेतले असतात किंवा आरबी भाषेतले; पण ते आपल्या हृदयार्पयत पोहोचतात. पुरुषप्रधान असणारं कोरा हे अतिशय जड आणि अवघड वाद्य वादन करणारी सोना ही जगातील पहिली महिला आहे. केवळ हे वाद्य वाजवून ती थांबत नाही, तर त्याच्या प्रचार व प्रसाराचं, शिक्षणाचं मोठं काम ती करते आहे. आफ्रिकी वाद्य परंपरा पुढे नेण्याचा नेटानं प्रयत्न करते आहे.सोना जोबार्तेह ही पश्चिम आफ्रिकी वंशाची गायिका आहे. आफ्रिकी व पाश्चिमात्य विविध वाद्य वाजवणारी उत्कृष्ट वादक आहे. ती 1983 साली लंडनमध्ये जन्माला आली. पश्चिम आफ्रिकेतल्या कोरा वादन करणार्‍या पाच प्रमुख घराण्यांपैकी तिचं एक घराणं. गांबिया या आफ्रिका खंडातील सर्वात छोटय़ा देशाचं प्रतिनिधित्व करणार्‍या सोनाची आई ब्रिटिश, तर वडील आफ्रिकी. तिला आणि गांबियाला जोडलं ते कोरा या तंतुवाद्यानं. कोरा या वाद्यात पारंगत असलेल्या अमानू बनसंग जोबार्ते यांची ती नात. 21 तारा असलेल्या या वाद्याचा वारसा वडिलांकडून मुलाकडे येतो, तसा तो आजोबांकडून सोनाच्या वडिलांकडे आणि त्यांच्याकडून सोनाकडे आला. मँडिंका जमातीतील लोक ड्रम वाजवणं तसंच कोरा या वैशिष्टय़पूर्ण वाद्याचं वादन करत. या वाद्याची परंपरा ग्रीऑट या नावापाशी येऊन थांबते. तो पश्चिम आफ्रिकेतील प्रसिद्ध इतिहासकार, कथाकार, कवी, संगीतकार होता. ग्रीऑट म्हणजे मुखोद्गत परंपरांचं भांडार. शाही खानदानाचा सल्लागार. ग्रीऑट नंतर मालीहून गांबियाला 1915 साली स्थलांतरित झाला. या घराण्यातच पुढं सोना जन्माला आली.घरातच वारसा असल्यानं वयाच्या तिसर्‍या वर्षापासून तिनं आपल्या अकरा वर्षाच्या  भावाकडून कोरावादन, संगीत शिकायला सुरुवात केली. त्याच्याबरोबर व वडिलांबरोबर ती लहानपणी कितीतरी वेळा गांबियाला गेली. गांबियाला आजीनं तिच्या हातात पहिल्यांदा ‘कोरा’ दिलं. ती अवघी चार वर्षाची असताना लंडन येथील जाझ कॅफेमध्ये तिचा पहिला परफॉर्मन्स झाला. तेव्हापासून ती जगभर कार्यक्रम करते आहे. पाश्चिमात्य शास्त्नीय संगीत शिकताना, तिथली वाद्यं वाजवताना काहीतरी अपुरं आहे, असं तिला वाटत असे. जेव्हा तिनं व्यावसायिकदृष्टय़ा कोरा हे वाद्य हातात घेतलं, आफ्रिकी मातीतलं पारंपरिक संगीत सादर करायला सुरुवात केली तेव्हा खर्‍या अर्थाने तिला तिच्या गाण्यातला ‘सोल’ सापडला. ती गांबियाला जात असे तेव्हा तिथल्या वस्त्यांमध्ये फिरताना तिथल्या भाषेचा उच्चार करायला शिकली, अस्खलित बोलायला शिकली. संगीतशैलीच्या मिलाफाने स्वतर्‍ची वेगळी शैली (फ्यूझन) निर्माण केली. अरेबिक स्टाइलचाही तिच्या गाण्यावर प्रभाव आहे. तिचं हे फ्यूझन संगीत आता जगभर गाजतं आहे.ती म्हणते, ‘मायभूमीत आल्यावर एका अर्थानं वाईट वाटलं, माझ्या पिढीला कोरा संगीत माहीत नव्हतं. ते इथल्या तरुण पिढीसह जगभरातल्या तारुण्याला कळावं, गांबियाचा सुंदर सांगीतिक वारसा समजावा म्हणून मी प्रय} करते आहे.’

( शिल्पा मुक्त पत्रकार आहे.)