शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
3
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
4
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
5
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
6
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
7
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
8
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
9
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
10
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
11
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
12
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
13
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
14
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
15
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
16
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
17
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
18
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
19
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
20
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
Daily Top 2Weekly Top 5

जगाच्या इतिहासाचा नकाशा....भूगोलचे नकाशे आपण पाहतो, इतिहासाचा नकाशा पाहिलाय कधी?

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 30, 2017 03:00 IST

एखादं ठिकाण शोधायला आपण आताशा गूगल मॅप्स वापरतो. जीपीएस लावतो. एखाद्या अनोळखी शहरामध्ये नेमकी जागा शोधायची तर ते अगदीच परफेक्ट टूल आहे. पण हे झाले जागा शोधण्याचे नकाशे. सगळेच नकाशे आपल्याला कोणत्या रस्त्यावर उजवीकडे वळायचं आहे हे सांगण्याइतपत मर्यादित नसतात.

- प्रज्ञा शिदोरे

एखादं ठिकाण शोधायला आपण आताशा गूगल मॅप्स वापरतो. जीपीएस लावतो. एखाद्या अनोळखी शहरामध्ये नेमकी जागा शोधायची तर ते अगदीच परफेक्ट टूल आहे. पण हे झाले जागा शोधण्याचे नकाशे. सगळेच नकाशे आपल्याला कोणत्या रस्त्यावर उजवीकडे वळायचं आहे हे सांगण्याइतपत मर्यादित नसतात. नकाशे आपल्याला एखाद्या नव्या भूभागाची ओळख करून देतात. तिथला भूगोल आणि अर्थातच इतिहासही सांगत असतात. ते आपल्यालाच आपली गोष्ट सांगून भविष्यातल्या प्रश्नांना सामोरं जाण्यासाठी तयार करत असतात. माझं तर अशा वेगवेगळ्या नकाशांवर प्रेम आहे! नकाशे हा एक खरंच विलक्षण प्रकार असतो. मी लहान असताना तर आमच्याकडे एक भलामोठा जगाचा नकाशा होता. अनेकदा मी आणि माझी बहीण त्या नकाशावर बसून वेगवेगळे देश ओळखण्याचा खेळ खेळायचो!असेच काही कमाल नकाशे तयार केले आहेत थॉमस टेल्समन या इतिहास तज्ज्ञाने. त्यातलाच एक म्हणजे त्यानं तयार केलेला भारताचा नकाशा. हा नकाशा साधासुधा नाही. या नकाशामध्ये थॉमसने पहिल्या शतकापासून ते विसाव्या शतकापर्यंतचा भारताचा भूगोल वेगवेगळ्या नकाशांमधून दाखवला आहे. हा भूगोल म्हणजे कोणी, कुठे, कधी राज्य केलं याचं रेखाटन. या नकाशांमधून त्यामुळे आपल्याला भारताचा बदलता इतिहास बघायला मिळतो. थॉमसच्या वीस वर्षांच्या अनुभवांनंतर तो म्हणतो की, त्यानं आजपर्यंत जगातील अनेक देशांचे नकाशे अशाप्रकारे तयार केले आहेत. पण भारताबद्दल मांडणी करणं त्याच्यासाठी सर्वात मोठं आव्हान होतं.थॉमसची ‘वर्ल्ड हिस्टरी मॅप्स’ही वेबसाइट. तिथं भारतासंबंधी तो सांगतो, भारतीय उपखंडाने आजपर्यंत अनेक राजवटी अनुभवल्या आहेत. या भूमीवर अनेक राजवटींनी जन्म घेतला, त्या रु जल्या, मोठ्या झाल्या आणि पुढे लयास गेल्या. पण या प्रत्येक राजवटीने आपल्या या प्रवासात या भूमीवर आपली मोहोर उठवली आणि जाताजाता इथली संस्कृती आणि इथे राहणाºया लोकांच्या अस्मितेला वळण देत गेल्या.भारताचा नकाशा सुरू होतो तो शक, सातवाहन या वंशांपासून. जसे आपण पुढची शतकं पाहत जातो तसं तसं आपल्याला कोणी, कोणाची, किती भूमी काबीज केली याचा अंदाज यायला सुरुवात होते. थॉमसचे हे नकाशे आपल्याला भारताच्या इतिहासाची एका नव्या रूपात ओळख करून देतात.तेव्हा इतिहासात, भूगोलात किंवा आपली जडणघडण कशी होत गेली, यामध्ये रस असलेल्यांनी हे भारताचे नकाशे नक्की वाचा. त्याच्या वेबसाइटवर त्याने जगातल्या वेगवेगळ्या भागांचे असेच नकाशे तयार केले आहेत. भारताचे नकाशे पाहिलेत की तुम्हाला तेही नकाशे नक्कीच पाहावेसे वाटतील.

नक्की वाचावर्ल्ड हिस्टरी मॅप्स - http://www.worldhistorymaps.info/index.html