- गार्गी आष्टेकर
शाळेत असताना चित्रकलेत फारसा रस नव्हता; पण मग आठवीत असताना पहिल्यांदा एलिमेंटरीची परीक्षा दिली होती. त्यानंतर हळूहळू कलेत रस वाढायला लागला. दहावीच्या परीक्षेनंतर चित्रकलेत आवड निर्माण झाली आणि याच शाखेत काहीतरी करायचं असं ठरवलं. मग ‘गूगल’चे धडे गिरवत डेकोरेशन, छोटे इव्हेंट्समधे चित्रकला, कॅलिग्राफी करायला सुरुवात केली.
दोन र्वष अशाच पद्धतीने सगळीकडे पाहत, धडपडत काम करणं सुरू होतं. सुलेखनाचा वापर करता येईल, अशी माध्यमं शोधणं हादेखील प्रत्यक्ष सुलेखनकलेइतकाच सर्जनशील प्रवास होता. लग्नपत्रिका, कॉर्पोरेट कंपन्यांचे लोगो, पुस्तकांची मुखपृष्ठे अशा नानाविध माध्यमांतून सुलेखनाचा आविष्कार दाखवला. मग सुरुवातीला अजित लोटलीकर यांच्याकडे कॅलिग्राफीची अक्षरांची ओळख झाली. त्यांच्याकडे पहिल्यांदा सुलेखनाच्या प्राथमिक शिक्षणाचे धडे गिरवले.
बारावीला असताना पहिल्यांदा अच्युत पालव सरांशी भेट झाली. पहिल्याच भेटीत जणू कॅलिग्राफीचे ‘विद्यापीठ’च माङयासमोर होते, याची जाणीव झाली. कॅलिग्राफी, अक्षरांच्या पलीकडचे विश्व या सर्वामधून हळुवार अक्षरांशी असलेलं नातं उलगडायला लागलं. ही कॅलिग्राफी शिकण्याची प्रकिया म्हणजे वेगळाच आनंद होता. त्यावेळी दादरच्या मॉडेल आर्ट इन्स्टिटय़ूटमधून फाउंडेशन कोर्स करत होते. मग पालव सरांनी पोर्टफोलिओ पाहिला, त्यानंतर अजून मेहनत घ्यावी लागेल, असं सांगितलं. सुलेखनकार हीच आपली ओळख बनवायची हे निश्चित झालं.
‘सुलेखनावर प्रेम करणारी नवी पिढी घडवायची आहे’ असं पालव सर नेहमी म्हणतात. या पिढीची प्रतिनिधी म्हणून या कॅलिग्राफीचा भाग होण्याची संधी मिळाल्याचा अभिमान वाटतो. नवीन शिकण्याची प्रेरणा कायम जगण्याला बळ देते. त्याचप्रमाणो, कॅलिग्राफीच्या दुनियेत मुशाफिरी करणं हेच ध्येय आहे. आणि त्यासाठी पडत, धडपडत का होईना अजूनही शिकतेय.
सध्या सोफय्या कॉलेजमधून कमर्शिअल आर्ट्सच्या तिस:या वर्षाला आहे. कॉलेजमधेही प्रा. कल्पेश गोसावी यांच्या मार्गदर्शनामुळे कॅलिग्राफीत नव-नवे प्रयोग करण्यासाठी प्रोत्साहन मिळते. आता कॅलिग्राफी, टायपोग्राफी, ग्राफिटी अशा वेगवेगळ्या कलांमध्ये जम बसवतेय. त्यातही मराठी, इंग्रजी सुलेखन आणि गॉथिक शैलीत कॅलिग्राफी करायला खूप आवडतं. विशेष म्हणजे, गॉथिक शैलीत ‘ओल्ड इंग्लिश’चा समावेश असतो. त्यात प्रत्येक अक्षराचं स्वतंत्र व्यक्तिमत्त्व असतं, ते ओळखून त्या अक्षरात जिवंतपणा ओतणो, हा कॅलिग्राफरचा धर्म. अक्षरांच्या विश्वाशी एकरूप झाल्यामुळे ‘बाजी’ या सिनेमात कॅलिग्राफी करण्याची संधी मिळाली. या सिनेमात ‘असिस्टंट आर्ट डायरेक्टर’ म्हणून काम केलंय. या सिनेमातील सर्व कॅलिग्राफी मी केली आहे. या अनुभवाने वेगळा आत्मविश्वास दिला, यातून बरंच शिकायलाही मिळालं. आणि व्यावसायिक व्यासपीठावर कॅलिग्राफीचा सन्मान झाला, ही भावना सुखावणारी होती.
गोव्यात होणा:या ‘डिझायन यात्र’ या इव्हेंटमधे सध्या सहभाग घेतला असून, यात प्रसिद्ध तज्ज्ञांकडून वेगवेगळ्या क्षेत्रंचे मार्गदर्शन मिळते. आंतरराष्ट्रीय स्तरावर कॅलिग्राफी क्षेत्रत काय सुरू आहे, त्यात नवनवीन काय घडामोडी सुरू आहेत, याविषयी ‘डिझाइन यात्र’मधून मार्गदर्शन मिळते. त्यामुळे कलाक्षेत्रतील अशा वेगवेगळ्या कार्यक्रमात सहभागी होऊन नव्या गोष्टी जाणून घेण्याची धडपड सुरूच असते.