शहरं
Join us  
Trending Stories
1
"युद्ध थांबवलं नाही तर…’’, भारत-पाकिस्तानमधील संघर्षाचा उल्लेख करत डोनाल्ड ट्रम्प यांचा थायलंड कंबोडियाला इशारा
2
"...मग आम्हाला जगभर कशाला पाठवलं?"; IND vs PAK क्रिकेट शेड्युलवर संतापल्या प्रियंका चतुर्वेदी
3
मुंबई-पुणे महामार्गावर भीषण अपघात! कंटेनरचे ब्रेक फेल, अनेक वाहने एकमेकांवर धडकली...
4
IND vs ENG 4th Test Day 4 Stumps : साडे चार तासांत ३७३ चेंडूंचा सामना; KL राहुल-गिल जोडी जमली; पण लढाई अजून नाही संपली!
5
"जर 6 महिन्यांत मर्सिडीज अथवा बीएमडब्ल्यू हवी असेल तर..." सरन्यायाधीश गवई यांचा नव्या वकीलांना सल्ला
6
Asia Cup 2025: 'असं' झालं तर तब्बल तीन वेळा रंगणार IND vs PAK क्रिकेट सामना, जाणून घ्या
7
Shubman Gill Record : गिलनं साधला मोठा डाव! इंग्लंडच्या मैदानात पाक दिग्गजाला 'धोबीपछाड'
8
तेव्हा लोक म्हणाले होते जणू दुसरी ऐश्वर्याच, सलमान खानची ही हिरोईन आता दिसते अशी 
9
एलियन्सचं रहस्यमय अंतराळ यान नोव्हेंबरमध्ये करणार पृथ्वीवर हल्ला, शास्त्रज्ञांना धक्कादायक दावा
10
नवरा बायकोमध्ये तुफान भांडण, पतीच्या डोक्यात घातला हातोडा, हत्येनंतर दार लावलं अन्...
11
Video: बंगळुरूच्या महिला प्रोफेसरचा मराठमोळ्या 'वाजले की बारा' लावणीवर भन्नाट डान्स
12
"आम्ही खूप दुःखी..."; दिराने वहिनीला कुंकू लावलं अन् धबधब्यात घेतली उडी, प्रेमाचा भयंकर शेवट
13
IND vs ENG : जसप्रीत बुमराहचं 'शतक'; मँचेस्टर कसोटीतील न पटण्याजोगी गोष्ट
14
Asia Cup 2025 चे वेळापत्रक जाहीर! भारत पाकिस्तान पुन्हा एकाच गटात, 'या' दिवशी सामना
15
१४,२९८ पुरुषांना 'लाडकी बहीण'चा लाभ; अजित पवार म्हणाले, 'वसूल करणार, नाही दिले तर...'
16
"सरकार ही निरुपयोगी यंत्रणा, चालत्या गाडीला पंक्चर करण्याचं काम..."; नितीन गडकरींनी सुनावलं
17
बिहार निवडणुकीसाठी काँग्रेसची मोर्चेबांधणी, महाराष्ट्रातील या महिला खासदाराकडे सोपवली मोठी जबाबदारी
18
"बंदुकीच्या धाकाने बांगलादेशात ढकलले जातेय...!" बांगली भाषिक मुस्लिमांवरील कारवाईवरून ओवेसी भडकले
19
IND vs ENG : यशस्वीच्या पदरी लाजिरवाणा 'भोपळा'! साई आला अन् तोही फक्त 'दर्शन' देऊन गेला
20
"राहुल गांधींच्या नशिबात कायम माफी मागणे लिहीले आहे"; केंद्रीय कृषीमंत्र्यांनी काँग्रेसला घेरलं, "१० वर्षांनी पुन्हा..."

प्रेम परिकथेतल्यासारखंच नसतं! -करण जोहर

By admin | Updated: June 30, 2016 12:34 IST

आपण सर्वजण त्याला ‘कुछ कुछ होता है’चा दिग्दर्शक म्हणून ओळखतो. शाहरुख खानचा सर्वात जवळचा मित्र म्हणूनही त्याची ओळख आहे. तो अवॉर्ड शो होस्ट करतो, तो टीव्ही रिअ‍ॅलिटी शो जज करतो.

- मयूर देवकरआपण सर्वजण त्याला ‘कुछ कुछ होता है’चा दिग्दर्शक म्हणून ओळखतो. शाहरुख खानचा सर्वात जवळचा मित्र म्हणूनही त्याची ओळख आहे. तो अवॉर्ड शो होस्ट करतो, तो टीव्ही रिअ‍ॅलिटी शो जज करतो. तो सिनेमे लिहितो, तो सिनेमे प्रोड्यूस करतो. त्यांच्या लैंगिकतेबद्दल अविरत ‘गॉसिप’ चालते. सगळे सेलिब्रेटी बिनदिक्कत त्याला आपले सगळे ‘सिक्रेट्स’ सांगतात. असा तो करण जोहर. मेलोड्रामा, अतिरोमॅण्टिक, अतिश्रीमंत, एनआरआयसाठी बनवलेला अशी विशेषणे लावून त्याच्या सिनेमांना हेटाळले जाते. तरीदेखील ‘धर्मा प्रोडक्शन’चा एक तरी चित्रपट आपल्याला मिळावा म्हणून स्टार्सची धडपड चालू असते. हिंदी चित्रपटसृष्टीत तो आज आघाडीचा दिग्दर्शक, निर्माता, लेखक आणि कित्येक नवीन कलाकारांचा ‘गॉडफादर’ आहे. पण त्याच्या गुणांची, टॅलेंटची चर्चा होण्यापेक्षा त्याच्या ‘सेक्शुअ‍ॅलिटी’ बद्दलच जास्त बोलले जाते. आज चाळीशीत पोहचलेला करण मात्र याकडे दुर्लक्ष करून त्याला जे हवयं ते करतोय.आता बहुतेक त्याने त्याच्या ‘विषयी होणाऱ्या ‘चर्चांना’ उत्तर देण्याचे ठरवले आहे, असे वाटतेय. नुकतेच एका वेबसाईटवर त्याने लिहिलेल्या स्तंभात अत्यंत निर्भिड आणि प्रामाणिकपणे त्याच्या सेक्स लाईफबद्दल सांगितले. लहानपणापासून ‘सेक्स’ या शब्दापासून तो कशा प्रकारे अनभिज्ञ होता. मुलासोबत याविषयी बोलताना त्यांच्या वडिलांना संकोच वाटायचा तर, आईकडून याबाबत कळण्याचा तर काही प्रश्नच नव्हता. एकुलता एक असल्यामुळे भावंडांकडून समजण्याची शक्यतादेखील नव्हती.अत्यंत लाजाळू असल्यामुळे त्याला मित्रदेखील नव्हते, जेणेकरून त्यांनी तरी त्याला ‘सेक्स’ विषयी सांगितले असते. मोठेपणी त्याला स्वत:चे शरीर आणि रंग-रुपाबद्दल न्यूनगंड निर्माण झाला. आपल्याकडे कोणी आकर्षित होईल याची त्याला शंका वाटायची. तो प्रांजळपणे कबुल करतो की, वयाच्या २६व्या वर्षी ‘कुछ कुछ होता है’मुळे मिळालेल्या प्रसिद्धीमुळे त्याने आयुष्यात पहिल्यांदा सेक्सचा अनुभव घेतला.तो म्हणतो, प्रेम आणि सेक्स विषयी असणाऱ्या बऱ्याचशा संकल्पना या चित्रपटांपासून प्रेरित असतात. पण वास्तव त्याहून फार वेगळे असते याची जेव्हा प्रचीती येते तोपर्यंत खूप उशिर झालेला असतो. म्हणून मी आता अशा खुळचट कल्पनांवर विश्वास देत नाही. स्वत:बद्दल ‘सेक्सी’ न वाटण्यात काहीच गैर नाही. प्रेम साधंदेखील असू शकत. ते परिकथेप्रमाणेच असावे असा मी अट्टहास करत नाही. आपल्या टीकाकारांना निक्षुन सांगताना तो लिहितो, मी कोण? माझी सेक्शुअ‍ॅलिटी काय? हे जाणून घेणाऱ्यांना मी एवढेच सांगू इच्छितो की, माझ्याविषयी गैरसमज पसरविले जातात म्हणून मी काही अपयशी नाही. मी आयुष्याच्या ज्या टप्प्यावर आणि स्थानावर आहे तिथे पोहचणे बहुतेकांचे स्वप्न असते.------------------