शहरं
Join us  
Trending Stories
1
DC vs RCB : भर मैदानात कोहली-केएल राहुल यांच्यात वाजलं? नेमकं काय घडलं? (VIDEO)
2
पाकिस्तानी नागरिकांनी दिलेल्या वेळेत भारत सोडला नाही तर बसणार मोठा दणका, काय होणार शिक्षा?
3
Shocking!! सायबर चौकात दहशत! कोल्हापुरात सराईत गुंडाकडून तलवारीने हल्ला; दोघे जखमी
4
राज्याला हादरवणाऱ्या शिक्षण घोटाळ्याची ईडीने मागविली माहिती; SIT गठीत करण्याच्या हालचालींना वेग
5
ट्रक-बोलेरोच्या भीषण अपघातात चार जण जागीच ठार; एक जण गंभीर जखमी, रुग्णालयात दाखल
6
धक्कादायक! नागपुरातील भोसले घराण्याची ऐतिहासिक तलवार आंतरराष्ट्रीय कंपनीकडून ऑनलाईन विक्रीला
7
"देशाच्या सुरक्षेसाठी शिवसैनिक जवानांसारखा लढेल, ही लढाई..."; DCM एकनाथ शिंदे यांचे वक्तव्य
8
भुवीनं साधला मोठा डाव! IPL च्या इतिहासात सर्वाधिक विकेट्स घेणारा ठरला दुसरा गोलंदाज
9
पाकिस्तानात मोठी कारवाई! खैबर पख्तूनख्वा प्रांतात घुसखोरी करणारे ५४ TTP समर्थक ठार
10
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित एक ओव्हर नाही टिकला; पण दोन चेंडूत विराटची बरोबरी करून परतला
11
मध्य प्रदेशात भीषण अपघात; भरधाव कार विहिरीत कोसळली, 12 जणांचा मृत्यू
12
"शरद पवारांनी जाणीवपूर्वक 'ते' वक्तव्य केले"; पहलगामबाबतच्या 'त्या' विधानावरुन भुजबळांचे स्पष्टीकरण
13
पाकिस्तानात भीतीचे वातावरण; लष्कर प्रमुखानंतर बिलावल भुट्टोचे कुटुंबीय देश सोडून पळाले
14
जसप्रीत बुमराहची रेकॉर्ड ब्रेक स्पेल; मुंबई इंडियन्सकडून 'अशी' कामगिरी करणारा पहिलाच!
15
सीमेवर तणाव वाढताच पाकिस्तानने चीनकडे मागितले १.४ बिलियन डॉलर
16
"लाडक्या बहि‍णी १५०० मध्ये खूष, २१०० रुपये देऊ असं कुणीच म्हटलं नाही"; नरहरी झिरवाळांचे विधान
17
MI vs LSG : बॅटिंग-बॉलिंग सगळ्यात भारी! पुन्हा दिसतोय MI चा चॅम्पियनवाला तोरा
18
IPL 2025: गगनचुंबी षटकार तोही बुमराहला; बिश्नोईचा आनंद गगनात मावेना! पंतची रिॲक्शनही व्हायरल (VIDEO)
19
Suryakumar Yadav : ...अन् सूर्या भाऊ ठरला IPL मध्ये सर्वात कमी चेंडूत ४००० धावा करणारा भारतीय
20
व्हाईट बॉल क्रिकेटमध्ये स्मृती मानधनाची ऐतिहासिक कामगिरी, मेग लॅनिंगचाही विक्रम मोडला!

पावसाळ्यात लडाखची बाईकवारी

By admin | Updated: August 1, 2014 11:27 IST

बायकर्सला ‘चॅलेंज’ देणार्‍या अवघड चढणी आणि पावलोपावली परीक्षा पाहणारा निसर्ग‘लडाख’ सर करायचं तर ही परीक्षा द्यावीच लागते.

उंच आकाशाला भिडणारी उंचच उंच हिमाच्छादित शिखरं.खळाळत वाहणार्‍या, लांबून निळ्याच भासणार्‍या नदीचा खळाळ, माणसाचं अस्तित्वच नसावं इथं असं वाटावं इतकी अबोल शांतता आणि त्या शांततेत एक इवलासा दगड फेकून मारल्यावर तरंग उठावे तसा आपल्याच बाईकचा आवाज. 
आपल्या बाईकवर जिवापाड प्रेम करणार्‍या, तिच्या सोबतीनं कुठलंही आव्हान पेलायला तयार असणार्‍या बायकर्सना लेह-लडाखचे नागमोड्या चढणीचे हे रस्ते अशाच हाका मारतात. बाईक काढून अँडव्हेंचर करत लडाखला जायचंच असं स्वप्न अनेक बायकर्स पाहतात, त्यातलेच दोन नाशिकमधले साहसप्रेमी. जयेश भंडारी आणि मयूर पुरोहित  लडाखपर्यंत बाईक ट्रिपचा प्लॅन त्यांच्या डोक्यात शिजला आणि गेली सात वर्षं हे तरुण ‘द हायकर क्लब‘ नावानं साहसी मोहिमा काढत नव्या चढणवाटा चढू लागले.
त्यांचा ग्रुप नुकताच लडाखची बाईकवारी करून आला. या ट्रिपमध्ये १७  बायकर्स सहभागी झाले होते.  पावसाळ्याच्या ऐन तोंडावर हा प्रवास सुरू झाला. बाईकवर डबलसीट बसल्यासारखा कुठंकुठं पाऊस मग त्यांना भेटत राहिला. भरपावसात, मुसळधार मार्‍यात बाईक रायडिंगच्या थरारानं बायकर्सनाही नवी ताजगी मिळाली. त्याच जोमात ते पुढे निघाले कारगिलकडं. झोजीला पास हा कारगीलकडं जाणारा एकमेव रस्ता. या रस्त्यावरून जाताना मात्र निसर्गानं त्यांना आपलं भीषण रौद्र रूप दाखवलं. बर्फवृष्टी, पाऊस, धुके पण बाईक चालवताना आव्हानात्मक वातावरण या बायकर्सना अनुभवायला मिळालं. मनाली-लेह या रस्त्यावर गाडी चालवण्याची मजा खरंतर बायकिंग केल्यावरच कळते असं म्हणावं लागेल. हिमालयाचा हा भाग मुख्यत्वे अजूनही खूप ठिसूळ आहे. या भागात दरडी कोसळण्याच्या घटना आजही घडतात. याशिवाय मनाली-लेह समुद्रसपाटीपासून अत्यंत उंचावरचा रस्ता. युरोप-अमेरिकेत आठ हजार किलोमीटर उंचीलाही हाय अल्टिट्यूड म्हणतात, आपल्याकडे आशिया खंडात समुद्रसपाटीपासून उंचावर अनेक जागा असल्यानं आपण १३ हजारच्या पुढे हाय अल्टिट्यूड मानतो. अशा इतक्या उंचावर बायकिंग करणं हेच खरंतर एक चॅलेंज आहे. माणसाला जिथं श्‍वास घ्यायला ऑक्सिजन कमी पडतो, दमछाक होते तिथं बाईकसारखं मानवनिर्मित यंत्र घेऊन जायचं आणि चढणीचे रस्ते चढायचे हे सोपं कसं असेल? थंडीत गाडी बंद पडण्यासारखे प्रकार तर सर्रास होतात. त्यात या भागात स्नोफॉलची शक्यता खूप जास्त असते. हे बायकर्स सांगतात, ‘आम्ही या भागात उणे ५ डिग्री सेल्सिअस तपमानात गाडी चालवत होतो. वाटेत स्नोफॉलही काही ठिकाणी होत होता. मुख्य म्हणजे या भागात बायकिंगचं हेच थ्रिल आहे. एरवी मोकळ्या रस्त्यावर सुसाट बाईक चालवण्याची मजा असतेच. पण खरं चॅलेंज या भागात असं, हिमालयातल्या नागमोडी चढणीच्या रस्त्यावर स्वत:ला सांभाळत, स्वत:ची काळजी घेत तुम्ही किती सेफ गाडी चालवता, तुमचा बाईकवर किती कण्ट्रोल आहे, चढणीच्या रस्त्यावर दमछाक होऊनही तुम्ही किती उत्तम ड्राईव्ह करता हे खरंतर सगळ्यात महत्त्वाचं स्किल आहे. थ्रिलही आहे. आणि चॅलेंजही. हे आव्हान या मोहिमेत भरपूर जगता आलं, पेलता आलं.’
- सुयोग जोशी
 
बायकर्सचे चार धाम
 
बायकर्सचे चार धाम असंच त्या रस्त्यांना म्हणायला हवं. तुम्ही सच्चे बायकर असाल तर या चार खिंडीतून तुमची बाईक गेलेली असलीच पाहिजे. निसर्गाचं भव्य दर्शन, रुद्रावतार, त्याची कोमल जडणघडण आणि अवघड चढण, काय नाही दाखवत हे रस्ते तुम्हाला.
१) खारदुंग ला पास 
(समुद्रसपाटीपासूनची उंची १८३८0 फूट)
२) चांग ला पास 
(समुद्रसपाटीपासूनची उंची १७५८६ फूट)
३) तांगलांग ला पास 
(समुद्रसपाटीपासूनची उंची १७५८२ फूट)
४) लाचुलुंग ला पास 
(समुद्रसपाटीपासूनची उंची १६६१६ फूट.
 
ये रास्ता नहीं आसां.
 
मनाली-लेह हा रस्ता म्हणजे बीबीसीनं गौरविलेल्या जगातील पहिल्या पाच रोड ट्रिपमधील एक. जगभरातील राइडर्स या रस्त्यावर आपली दुचाकी हाकण्यासाठी उत्सुक असतात. या ट्रिपमध्ये अप्रतिम निसर्गसौंदर्याचं दर्शन होतं. कडक उन्हाळा, हिमाचलमधील आल्हाददायक गारवा जाणवला.
 
पॅनगोंग लेक 
 
समुद्रसपाटीपासून १३000 फूट उंचीवर असणारे हे लेक म्हणजे भूतलावरील स्वर्गच. सुमारे ९६५00 स्क्वे.मी. इतके क्षेत्रफळ असलेल्या या लेकचा फक्त ४0 % भाग भारतात असून, उर्वरित क्षेत्र चीनमध्ये आहे. सप्तरंगी प्रकाश परावर्तित करणारं इथलं पाणी बघून डोळे दिपून जातात. 
 
झोजीला पास (कॅप्टन मोड) :
 
कारगील - श्रीनगर या रस्त्यावरील सर्वांत महत्त्वाचा व खडतर टप्पा म्हणजे झोजीला पास. या पासची समुद्रसपाटीपासूनची उंची १३000 फूट आहे. या पासमध्ये नेहमीच वाहनांच्या लांबच लांब रांगा लागलेल्या असतात. पाऊस व बर्फवृष्टी नित्याचीच. निसरड्या रस्त्यावरून गाडी चालवताना चालकाचा कस लागतो. एका बाजूला उंचच उंच हिमालय आणि दुसर्‍या बाजूला कठड्याशिवाय असलेली खोल दरी. चुकून नजर खाली गेली तरी छाती दडपून जावी, त्यात पाऊस आणि बर्फाचा मारा. पण ‘तोल’ राखला आणि सेफ ड्राईव्ह केलं तर हा टप्पाच गाडीच चालवण्याचा भरपूर आनंद देतो.
 
लडाख स्वारीत सहभागी झालेले सदस्य
 
जयेश भंडारी, मयूर पुरोहित, आनंद जोशी, परीक्षित चितळे, संजय दंडगव्हाण, महेश पांढरे, रोहित शुक्ल, रोहन बोरावके, राहुल बोरावके, मंगेश वाघ, रवि भावसार, विशाल जेजूरकर, कार्तिक बाफना, पवन शर्मा, मनीष बलवानी, चेतन देवरे, कल्पेश देवरे, अनुभव टंडन.