- ऑक्सिजन टीम
स्टिव्ह बॉल्मर मायक्रोसॉफ्टचे माजी सीईओ. ते नुकतेच निवृत्त झाले. निवृत्तीनंतर पुढे ते काय करणार, कुठं राहणार याच्या चर्चा जगभरातल्या मीडियात खूप गाजल्या.मात्र गेल्या महिन्यात वॉशिंग्टन विद्यापीठातल्या पदवीदान सोहळ्यात त्यांचं भाषण झालं. जगभरातून विद्यापीठात शिकायला आलेले विद्यार्थी त्यांचे पालक असे एकूण 4क् हजार लोक त्या सोहळ्याला उपस्थित होते. अत्यंत सकारात्मकता आणि प्रचंड उत्साह यांनी ठासून भरलेल्या शब्दात स्टिव्ह बॉल्मर यांनी यावेळी विद्याथ्र्याना मार्गदर्शन केलं. यशाची काही सूत्रं तर सांगितलीच पण त्यांनी एक गोष्ट वारंवार अधोरेखित केली.
ते म्हणतात, ‘देअर हॅज नेव्हर बीन अ बेटर टाइम.. ऑपॉच्यरुनिटी. ऑपॉच्यरुनिटी.ऑपॉच्यरुनिटी.हे या नव्या काळाचं खरं रूप आहे. इट्स अवेट्स यू, इट्स देअर एव्हरीव्हेअर..’
सगळीकडे संधी आहेत, सगळीकडे यशाच्या शक्यता ठासून भरलेल्या आहेत. नाराज व्हावं, निराशा रहावं असं अवतीभोवती काहीच नाही, अशा काळात तुम्ही जन्माला आला आहात, शिकून पदवी घेऊन काम करायला सज्ज होताहात.’
फक्त अमेरिकेत हे असं चित्र आहे, आणि आपल्याकडे नाही असं काही नाही. संधीचं नवं वारं आपल्याही अंगणात खेळतंय, पण ते आपल्याला जाणवंतय का? हाच खरा प्रश्न आहे. आणि त्या प्रश्नाचं उत्तर देणारं हे स्टिव्ह बॉल्मर यांचं भाषण.
वाचा आणि सांगा,
रडत बसण्यासारखं खरंच काही घडतंय का आपल्या आयुष्यात?
जी भर के जिओ.
शाळा सोडली. शाळेत मन रमत नव्हतं. अभ्यासात काही मजाच येत नव्हती. तिथं शिकायचं म्हणून शिकत बसलो असतो तरी वेळ वायाच गेला असता. मग मी शाळा सोडली. किंवा शाळेनं मला सोडलं असं म्हणा. म्हणजे मी एक साधा स्कूल ड्रॉप आउट. तरी मायक्रोसॉफ्टर्पयत पोहचलो. माङया आई वडिलांना तर वाटत होतंच की माझं डोकं सटकलेलं आहे. त्यांच्या दृष्टीनं मी ‘सटक’च होतो. त्यात माझं नशीब चांगलं म्हणून त्यांनाही शिक्षणातलं फारसं काही कळत नव्हतं. ग्रॅज्युएशन पूर्ण करणं म्हणजे आयुष्याची इतिकर्तव्यता असं त्यांना वाटलं नाही कारण, त्यांच्यापैकी कुणीही ग्रॅज्युएट नव्हतं. त्यामुळे नाही शिकलं पोरगं याचं फार काही वाटण्यापेक्षा, माङयामुळे मायक्रोसॉफ्टचंच काही खरं नाही असं त्यांना वाटत होतं. त्यांच्या दृष्टीनं हे काम म्हणजे सटक माणसांचं काहीतरी अगम्यच होतं. पण माझं नशीब चांगलं, मी माङया मनाचा कौल ऐकला. आय वॉज लकी, आय साईज्ड द डे.
म्हणजे मला हवं तेच मी मन:पूत जगलो.भरभरून जगलो. जे वाटलं ते करून मोकळा झालो, त्याचे परिणाम भोगले हे काय वेगळं सांगायचं.?
हॅव अ पॉईण्ट
ऑफ व्हयू.
संधी काय हे तुम्हाला दिसलं पाहिजे. मुळात तुमच्या नजरेलाच वेगवेगळ्या संधी दिसल्या पाहिजेत. काही माणसांना फक्त अडचणी दिसतात, वाटेतले अडसर दिसतात, काटेकुटे दिसतात. काहींना त्या अडथळ्यातही वाट दिसते, त्या वाटेच्या पलीकडच्या काही गोष्टी दिसतात.
त्यामुळे आव्हान आणि अडचणी यांच्याकडे तुम्ही कसं पाहता हा तुमचा दृष्टिकोन. तो शिकता येत नाही किंवा उसना मागून आणता येत नाही, तो आपला आपल्याला बदलावा लागतो, विकसित करावा लागतो. मला काय हवं हे माहिती असेल तर मी ते कसं शोधणार हा माझा दृष्टिकोन.
अनेकदा तर समोर काहीच संधी नसतात, वाटाही नसतात. पण केवळ तुमच्या दृष्टिकोनातून तुमच्यासाठी त्या वाटा निर्माण होतात. ‘पॉईण्ट ऑफ व्ह्यू क्रिएट्स ऑपॉच्यरुनिटी’. टि¦टरचा सहसंस्थापक जॅक डोर्सी, त्यानं टि¦टरची आयडिया लोकांना सांगितली तेव्हा कुणाला वाटलं तरी होतं का, की हे माध्यम इतकं प्रभावी ठरेल. ती संधी त्यानं स्वत:साठी तयार केली. संधीची वाट पाहत बसणं, ती कुणी देईल म्हणून इतरांकडे पाहणं हे आता नव्या काळात चालणार नाही, आता आपल्याला त्या स्वत:साठी तयार कराव्या लागतील.
बी हार्डकोअर
‘मायक्रोसॉफ्टने आपली सॉफ्टवेअर्स बिझनेसमन्सना, व्यावसायिकांना विकायचा प्रय} केला तेव्हा अनेकांनी आम्हाला सांगितलं होतं की हे चालणार नाही. हे कुणी वापरणार नाही, याचा काही उपयोगही होणार नाही. या सगळ्या नकारात्मकतेचा आमच्यावर इतका मारा होता की, खरंच आपल्याला काहीच व्यावसायिक यश लाभणार नाही असं वाटण्याची शक्यता होती. पण तसं वाटून थांबलो असतो तर मग आपलाच आपल्यावर, आपल्या कामावर विश्वास नाही हे सिद्ध झालं असतं. लोकांना आपल्या कामाविषयी काय वाटतं हे महत्त्वाचं नाही. आपल्याला आपल्या कामाविषयी किती खात्री आहे हे जास्त महत्त्वाचं.
ही पैश्याआडक्याच्या यशाची गणितं थोडी बाजूला ठेवा, आपण एक दुसरं उदाहरण घेऊ. नेल्सन मंडेला. कृष्णवर्णीयांसाठी त्यांनी दक्षिण अफ्रिकेत लढा पुकारला तेव्हा त्यांना लोकांनी सांगितलंच असेल ना की, तुम्ही जे म्हणताय ते या जन्मात होणं शक्य नाही. जमणारच नाही. पण तरी त्यांनी सतत, दीर्घकाळ, अथक लढा दिला. किती र्वष लागली त्यांना, किती अफाट संघर्ष केला. मात्र या संघर्षासाठी त्यांच्याकडे प्रचंड संयम होता. प्रचंड जिद्द होती. खरंतर त्या संयमाची आणि जिद्दीचीच सगळी परीक्षा असते. तुमच्याकडे भरभरून जगण्याची तयारी आहे, तुम्हाला गोष्टी वेगळ्या दिसतात हे कबूल आहे. पण तुमच्याकडे संयम नाही, सातत्यानं काम करण्याची तयारी नाही, चिकाटी नाही. मग काय उपयोग बाकी तुम्ही कितीही गुणवान असण्याचा.?
तुम्ही किती दीर्घकाळ काम करू शकता, किती चिकाटी दाखवता यावर तुमचं यश किती छोटं, किती मोठं हेही ठरतंच. मुख्य म्हणजे हे कायम लक्षात ठेवायला हवं की, पिकलं फळ आयतं आपल्या शर्टाच्या खिशात पडत नसतं. आपण रोप लावून, झाड वाढवून, फळं येण्याची वाट पहायची असते.
बोला, किती वाट पहायची तुमची तयारी आहे?
मुख्य म्हणजे आहे का?
ती असेल आणि सारं जग विसरून आपण जे करतो त्यातला आनंद विलक्षण हावरटपणो जगता येणार असेल तर जग तुमचं.!
पण तुम्ही म्हणाल की, आज आत्ता, एका रात्रीत मला जग जिंकून दाखवायचंय.
तर बघत रहा स्वपA, कुणी अडवलंय?
पण स्वपA अशी पूर्ण होत नसतात. हे तरी निदान आपल्याला माहिती हवं, जस्ट फॉर द इन्फॉर्मेशन.