शहरं
Join us  
Trending Stories
1
दिल्ली, हरयाणा, पंजाबमधील CCTV चे फुटेज थेट पाकिस्तानला, चिनी कॅमेऱ्यातून भारताची हेरगिरी
2
Latest Marathi News LIVE: सूरसम्राज्ञी आशा भोसले पंचत्वात विलीन, चाहत्यांनी साश्रू नयनांनी दिला अखेरचा निरोप
3
बालेन शाह यांनी PM मोदींना भेटण्यासाठी ठेवली अट; नेपाळ-भारत संबंध पुन्हा सुधारणार
4
"काही लोकांना ४ लग्नांची सूट, भाजप सत्तेत आल्यास...";  अमित शाह यांनी बंगालमध्ये सभा गाजवली, स्पष्टच बोलले
5
इराणी नेत्यांच्या सुरक्षेसाठी पाकिस्ताननं अख्खी ताकद पणाला लावली; कसं केले होते नियोजन?
6
सीलिंग फॅन की टेबल फॅन? वीज बिल वाचवण्यासाठी कोणता पर्याय सर्वोत्तम? खरेदीपूर्वी नक्की वाचा
7
"US-इराणमध्ये तयार होता अंतिम करार; शेवटच्या क्षणी आला एक कॉल अन् २१ तासांची चर्चा फिस्कटली"
8
श्रीलंकेत भारताची मोठी खेळी; खरेदी केली मोठी शिपबिल्डिंग कंपनी, चीन पाहतच राहिला
9
आशा भोसलेंची नात जनाईला धीर द्यायला पोहोचला 'मानलेला भाऊ' मोहम्मद सिराज, पाहा VIDEO
10
Garud Puran: गरुड पुराणानुसार मृत्यूपूर्वी मिळतात 'हे' रहस्यमयी संकेत; अखेरच्या काळात नेमकं काय घडतं?
11
MPSC भरती प्रक्रियेत मोठा बदल; राज्य मंत्रिमंडळाने घेतले ७ महत्त्वाचे निर्णय, जाणून घ्या
12
आले कधी अन् गेले कधी, समजलंच नाही! आयपीएलमध्ये सर्वात कमी धावसंख्येवर ऑलआउट झालेले संघ
13
८ व्या वेतन आयोगाची बंपर भरती; १.८० लाख रुपये महिना पगार, जाणून घ्या अर्ज करण्याची प्रक्रिया
14
पत्नीला काम सांगायचे म्हणून मुलाने केला पित्याचा खून; गडचिरोलीतील धक्कादायक घटना
15
Kalyan Accident: कल्याण-अहिल्यानगर महामार्गावर भीषण अपघात; ११ जणांचा मृत्यू, दोन गंभीर
16
IPL 2026: "सरळ मैदानाबाहेर जा...!" लाईव्ह सामन्यात सुनील गावस्कर आरसीबीच्या खेळाडूवर भडकले
17
इस्रायलचा महात्मा गांधी हॉस्पिटलवर हल्ला; सगळीकडे विध्वंस, इराणनं शेअर केला Video
18
पाकिस्तानचा दुहेरी डाव! US-इराण शांतता चर्चा निष्फळ ठरताच १३००० सैनिक सौदीत पाठवले, कारण काय?
19
IPL 2026: बॉल बॉयनं पाय धरताच व्यंकटेश अय्यरनं केलं असं काही, सर्वत्र होतंय कौतुक! 
20
'एक अब्ज डॉलर आणि लग्नासाठी एक सुंदर तरुणी द्या, अन्यथा...', या देशाच्या लष्कर प्रमुखाची तुर्कीला धमकी
Daily Top 2Weekly Top 5

भारतीय टेनिसचा ‘आखाडा’

By admin | Updated: April 8, 2017 18:46 IST

लिएंडर पेस आणि महेश भूपती या दोन महान खेळाडूंनी टेनिसला नुसता सुवर्णकाळच मिळवून दिला नाही, तर देशाची पताका सातासमुद्रापार फडकवताना देशाचंही नाव रोशन केलं.

लिएंडर पेस आणि महेश भूपती या दोन महान खेळाडूंनी टेनिसला नुसता सुवर्णकाळच मिळवून दिला नाही, तर देशाची पताका सातासमुद्रापार फडकवताना देशाचंही नाव रोशन केलं. या दोघांच्या जोडीनं अनेक अंतरराष्ट्रीय स्पर्धांत, ग्रॅँड स्लॅम स्पर्धांत विजेतेपद मिळवून टेनिसमध्ये आंतरराष्ट्रीय पातळीवर भारताचा दबदबा निर्माण केला.कालांतरानं दोघांमध्ये मतभेद झाले. दोघंही वेगळे झाले, तेव्हापासून टेनिसच्या क्षीतिजावरचा भारतीय सूर्यही आपलं तेजोवलय गमावून बसला. जोपर्यंत हे दोघं एकत्रित खेळत होते, त्यांच्यातला समन्वय कायम होता, तोपर्यंत ते मैदानावर खेळत असताना त्यांच्याकडून पदकांची अपेक्षा कायम केली जायची, पण हे एक आता स्वप्नच राहिलं आहे.हे दोघं खेळाडू नुसते विभक्तच झाले नाहीत, तर आपापला आपापला अहंकार कायम ठेवून दुसऱ्याला कायम खाली पाहायला लावण्याचाही प्रयत्न त्यांनी केला. त्याचंच एक मूर्तिमंत रुप म्हणजे आताच्या डेव्हिस कपदरम्यान पेस आणि भूपती यांच्यात पुन्हा नव्यानं उफाळून आलेला वाद.उझबेकिस्तानविरुद्धच्या डेव्हिस चषक टेनिस स्पर्धेसाठी न खेळणारा भारतीय कर्णधार महेश भूपतीनं लिएंडर पेसला संघातून डच्चू दिल्यानंतर आणखी एका नव्याला वादाला फोडणी मिळाली आहे आणि त्यांच्यातली खडाजंगी पुन्हा एकदा नव्यानं सुरू झाली आहे. डेव्हिस चषकात गेल्या सलग २७ वर्षांपासून पेस खेळत आहे. हा एक विक्रम आहे. या विक्रमाला पहिल्यांदाच ब्रेक लागला.खरं तर या दोघाही खेळाडूंनी भारतीय टेनिसला केवळ एका नव्या उंचीवरच नेऊन पोहोचवलं नाही, तर अनेक नव्या खेळाडूंसमोर आदर्श ठेवताना त्यांना टेनिस कोर्टवर आणण्यासाठी प्रेरितही केलं, पण दिवसेंदिवस ‘शाळकरी’ होत जाणाऱ्या त्यांच्यातील वादालाही आता ब्रेक लागायला हवा.या दोघांनी एकत्र यावं, एकत्रितपणे खेळावं यासाठी गेल्या काही वर्षांत खूप प्रयत्न झाले. बऱ्याच मनधरणीनंतर ्रकाही वेळा ते यशस्वीही झाले, पण दुभंगलेल्या मनांनी खेळताना मैदानावरची त्यांची कामगिरी फारशी उंचावली नाही हेही खरं.आतापर्यंत दोन्हीही खेळाडूंनी एकमेकांवर यथेच्छ चिखलफेक केली आहे, पण हे करीत असताना आपण आपल्या देशाचंही नाव बदनाम करीत आहोत, नव्या खेळाडूंसमोर चुकीचा पायंडा पाडत आहोत, याचंही भान त्यांना राहिलं नाही. दोघांनीही वारंवार अश्लाघ्य भाषेत एकमेकांवर वार करताना एकमेकांना पाण्यात पाहण्याचाच प्रकार केला. हे कधी थांबणार?हे दोन्हीही खेळाडू अजूनही मैदानावर खेळत असले तरी, त्यांचं वय पाहता त्यांचा सुवर्णकाळ आता संपलेला आहे यात काहीच शंका नाही. यात कोण बरोबर, कोण चूक.. याच्या मुळात जाऊ नये आणि तसा प्रयत्न करण्यातही आता काही अर्थ नाही, पण ज्या खेळाडूंनी भारतीय टेनिसला सुवर्णयुग दाखवलं, तेच आज आपापल्या अहंकारापायी स्वत:ची उंची कमी करताहेत. आपल्या वागणुकीतून एक नकारात्मक उदाहरण तरुणांसमोर ठेवताहेत. यातून खेळाचीही प्रतिमा मलीन होत आहे, निदान याची तरी काळजी या दिग्गजांनी घ्यावी आणि रस्त्यावरचं घोडामैदान आता तरी बंद करायला हवं.तेवढी सूज्ञता ते आता तरी दाखवतील का?- प्रश्नच आहे..- प्रतिनिधी