शहरं
Join us  
Trending Stories
1
'जिनपिंग यांची ही गोष्ट चांगली नाही', ट्रम्प यांची थेट प्रतिक्रिया, जिनपिंग यांनी लगेच हिशेब चुकता केला
2
मोठी दुर्घटना! गेरुआ नदीत गावकऱ्यांना घेऊन जाणारी बोट उलटली; १३ जणांना वाचवलं, ८ बेपत्ता
3
Post Office ची जबरदस्त स्कीम; केवळ व्याजातूनच महिन्याला होईल ₹२०,५००ची कमाई, कर सवलतीचाही फायदा
4
Cyclone Montha : मोंथाचा विध्वंस! २.१४ लाख एकर पिकं उद्ध्वस्त, १८ लाख लोकांना फटका, रेल्वे स्टेशन पाण्याखाली
5
भयंकर! हिट अँड रननंतर कारने बाईकस्वाराला १.५ किमी फरफटतं नेलं; धडकी भरवणारा Video
6
आजचे राशीभविष्य, ३० ऑक्टोबर २०२५: सरकारी मदत, आर्थिक लाभ; जुने मित्र भेटतील, आनंदी दिवस
7
'साईबाबा' फेम अभिनेते सुधीर दळवींना मदत केल्याने रणबीर कपूरची बहीण झाली ट्रोल, नेमकं काय घडलं?
8
"खरं सांगायचं तर..."; फिल्मफेअर पुरस्कार विकत घेतल्याच्या आरोपांवर अभिषेक बच्चन स्पष्टच म्हणाला
9
पती झाला हैवान! लेकासमोरच पत्नीची निर्घृण हत्या, डोळ्यांना, चेहऱ्याला...; अपघाताचा रचला बनाव
10
आता ब्लू इकॉनॉमीकडे झेप, तब्बल १२ लाख कोटींचे करार; शिवछत्रपतींच्या विचारांनी भारत प्रगतीपथावर
11
राज ठाकरेही मेळाव्यात फोडणार मतचोरीचा बॉम्ब? बोगस नावे, मतचोरी, EVM घोटाळ्यांवर सादरीकरण
12
वेतन वाढेल, जबाबदारी? आठव्या वेतन आयोगाने सरकारवरील बोजा २० ते २५ हजार कोटींनी वाढणार
13
मुंबई पालिकेची निवडणूक जानेवारीच होणार? आरक्षण सोडत ११ नोव्हेंबरला, आयोगाकडून सूचना प्रसिद्ध
14
५ नोव्हेंबरपर्यंत पाऊसधारांचा अंदाज; कमी दाबाचा पट्टा ओमानकडे जाण्याऐवजी किनारपट्ट्यांवर रेंगाळला
15
सावध व्हा, ‘कॉल मर्जिंग स्कॅम’ धाेका ! नव्या पद्धतीने केवळ काही अवधीत लाखो रुपयांवर डल्ला
16
Bacchu Kadu Morcha: मुख्यमंत्र्यांसोबत चर्चा करणार, पण नागपुरातील आंदोलन सुरूच राहणार; हायकोर्टाच्या आदेशानंतर काय काय घडलं?
17
हद्दच झाली! उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या स्वाक्षरीचे बनावट पत्र केले सादर, आरोपी कोण?
18
काँग्रेसमध्ये महापालिकेसाठी इच्छुकांची गर्दी; आले ४५० अर्ज, इच्छुकांकडून ५०० रुपये शुल्क
19
आमदार अनिल कुमार यांच्यावर दगडफेक, दगड-विटा मारत गाड्या फोडल्या; प्रचारादरम्यान घडली घटना
20
इंग्लंडचा खेळ खल्लास! दक्षिण आफ्रिकेच्या संघानं पहिल्यांदाच वर्ल्ड कप फायनल गाठत रचला इतिहास

यंदा गणपतीत निसर्गाशी दोस्ती कशी  करता  येईल ?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 20, 2020 16:18 IST

गणोशोत्सव यंदा साधेपणानं साजरा करतानाही अनेक पर्यावरणपूरक समाजोपयोगी कामं करता येतील. गरज आहे ती फक्त मोठय़ा मनानं मदतीचा हात पुढे करण्याची.

-  आनंद पेंढारकर, पर्यावरण चळवळीतले कार्यकर्ते

1) पर्यावरणपूरक गणपतीची संकल्पना रुजवणं-रु जणं महत्त्वाचं आहेच. त्यासह इतरही विविध कुठले प्रयत्न हरेकजण गाव-शहर पातळीवर करू शकतो?

-सेलिब्रेट रिस्पॉन्सिबली असा संदेश देणारे काही उपक्रम आम्ही करतो. अगदी सगळेच सण कसे पर्यावरणाशी सांधा जुळवत, स्नेह कायम राखत साजरे करता येतील हा आमचा प्रयत्न असतो. म्हणजे पाहा ना, संक्रांत असेल, तेव्हा पक्षी पतंगाच्या मांजाने जखमी होतात. होळीला रासायनिक रंगांचा अनेकांना त्नास होतो. भरपूर पाणी वाया जातं. होळी रंगाचा उत्सव आहे, पाण्याचा नाही. शिवाय अनेक विषारी रंग वापरले जातात. निसर्गातून ओरबाडून जे जे बाजारात विकायला ठेवलं जातं ते स्वीकारू नये.आता गणोशोत्सव येतो आहे. पूर्वी घरातलीच मूर्ती उत्सवाच्या काळात ठेवली जायची.  सार्वजनिक गणोशोत्सव पुढे लोकमान्य टिळकांनी सुरू केला. स्वातंत्र्य मिळवण्यासाठी एक प्रबोधन-संघटनाचा मार्ग हा हेतू होता. तेव्हाही मूर्ती लहानच होत्या.आताही आपण घरच्या घरी गणपती बनवले, आपल्याच बागेतून, परसातून माती आणून मूर्ती तयार केली तर होऊ शकतं.शाडूनेही बनवता येते. याचं विसर्जनही घरातच करता येतं. केरळमध्ये नारळाच्या झावळ्यांची विणून मूर्ती बनवली जाते.आणि विसर्जन म्हणजे तरी काय? निसर्गातून जे घेतलंय ते निसर्गाला परत दिलं पाहिजे.प्लास्टर ऑफ पॅरिस हा काही निसर्गाचा भाग नाही हे आपण कधी लक्षात घेणार? शिवाय औरंगाबाद हायकोर्टाने मागे निर्णयही दिला होता, की पाण्याचे स्रोत तुम्ही गणपतीच्या मूर्ती विसर्जित करून दूषित करू शकत नाही. याकडे दुर्लक्ष करायला नको.

2) यंदा गणपतीच्या सणावर कोरोनाचं सावट आहे. त्यामुळे सण साजरा करताना कुठकुठले मध्यममार्ग असू शकतात?सध्या तर पॅनडेमिक अॅक्ट लागू आहे. तुम्ही रस्त्यामध्ये मंडप बनवता. जमाव जमतो. यातून कोरोनाचा संसर्ग झाला तर कोण जबाबदारी घेणार? सध्या सतत रुग्णवाहिका, महापालिकेच्या गाडय़ा फिरत असतात. त्यांच्या वाहतुकीत, रु ग्णसेवेत विघ्न आलं तर ते तुमचं-आमचंच नुकसान ठरणार ना!हे लक्षात घेणं हीच तर सामाजिक जबाबदारी आहे. घराबाहेर न जाता घरच्या घरी आपण सण उत्साहात साजरा करू शकतो.गणपती मंडळांची सामाजिक शक्ती मोठी असते. ही मंडळे यावर्षी डीजे, लायटिंग, मूर्तीचा खर्च टाळून प्लाङमा डोनेशन ड्राइव्ह आयोजित करू शकतील. गणोश मंडळांनी मनावर घेतलं तर ही संख्या वाढू शकते. धान्यवाटपही केलं जाऊ शकतं. या काळात याहून मोठं देवा-धर्माचं काम काही नाही. डॉक्टर्स-पोलिसांचं काम न वाढवणं हीसुद्धा या काळात समाजसेवाच आहे. कित्येक पोलीस, डॉक्टरांनी कोरोनाकाळात जीव गमावलाय.ऑनलाइन शिक्षण सुरू होण्याच्या काळात आमच्या संस्थेकडे अनेक विनंत्या आल्यात, की आम्हाला सेकंडहॅण्ड तरी लॅपटॉप, मोबाइल पाहिजे. अशा काही गोष्टी गरजू विद्याथ्र्याना दान करता येतील. गणपती तर बुद्धीची देवता आहे.तंत्नज्ञानाचा असा विधायक उपयोग करता येईल.केरळमध्ये टीव्हीवर लोकल चॅनल्सच्या माध्यमातून एकाचवेळी सगळ्या विद्याथ्र्याना ऑनलाइन शिक्षण देण्याची योजना यशस्वीपणो राबवली जातेय. आपण असे टीव्ही वस्त्यांमध्ये दान करून हे आपल्या राज्यातही सुरू करू शकतो.या काळात आत्महत्या खूप वाढल्यात. आम्ही समुपदेशनाचं कामही करतो. एक-दोन केसेसमध्ये आम्ही लोकांचे जीवही वाचवू शकलो. असे काही उपक्र म गणोशोत्सवानिमित्त हाती घेता येतील. रोजगारासंबंधीचे उपक्रम आयोजित केले जाऊ शकतात.अनेक गरजू माणसं, पण ती स्वाभिमानी आहेत, त्यांना सतत मदत घेणं नको वाटतं. ते म्हणतात, आमच्या हाताला काम द्या. काही महिलांना आम्ही मास्क बनवण्याचं काम उभं करून दिलं. हे मंडळेही करू शकतात. विवाहेच्छुक मुला-मुलींचं जेनेटिक काउन्सेलिंग आयोजित करता येऊ शकेल. अर्थात सध्या ऑनलाइन आणि येत्या काळात प्रत्यक्ष करता येईल.गणोशोत्सव मंडळे ज्या स्पर्धा घेतात त्याही ऑनलाइन आयोजित केल्या जाऊ शकतात. गणपतीचे ई-दर्शन हा एक खूप चांगला पर्याय या काळात असू शकतो. तो सगळ्यांकडून अंमलात आणला गेला पाहिजे.

3) पर्यावरणपूरक जीवनशैलीकडे यानिमित्तानं जाता येईल, असं तुम्ही म्हणताय, ते अधिक तपशीलवार सांगा.यावर्षी कोरोना आहे, आपत्ती येतात.  कोरोनाकाळात जगणं बदललंय तर त्याचा चांगला फायदा घ्या. घरून काम करणं, आरोग्याची काळजी घेणं, कार पुलिंग यासारख्या अनेक गोष्टी आहेत ज्या एरव्हीही कायम करत राहाता येतील. त्यातून प्रदूषण कमी होईल, क्वॉलिटी ऑफ लाइफ सुधारेल. आपल्याला सोशल डिस्टन्सिंग नकोय. फिजिकल डिस्टन्सिंग मात्न पाहिजे. जगणं साधं-सोपं, निसर्गाला हानी न पोहोचवणारं बनवणं हा कोरोनासारख्या संकटांना रोखण्याचा एक उपाय असू शकतो.त्याचा पुढेही अंगीकार करायला पाहिजे. निसर्ग जपायला पाहिजे.

मुलाखत आणि शब्दांकन-शर्मिष्ठा भोसले