शहरं
Join us  
Trending Stories
1
"तीनवेळा 'अल्लाहू अकबर' ओरडून गोळीबार सुरू झाला"; व्हायरल व्हिडीओमधल्या व्यक्तीचा खुलासा
2
नो मॅजिक! क्रिकेटच्या देवाने सांगितले १४ वर्षाच्या पोराच्या वादळी शतकी खेळीत दडलेले 'लॉजिक'
3
पाकिस्तानवर मोठा प्रहार करा! पहलगाम हल्ल्यानंतर जगभरातील भारतीयांची निषेध आंदोलने
4
Vaibhav Suryavanshi : १४ वर्षांच्या पोराचा धुमाकूळ! सिक्सर मारत ठोकली IPL मधील विक्रमी सेंच्युरी
5
विद्यार्थ्यांच्या मनामनात रुजणार भारतीय संविधानाची मूल्ये; नागपूर विद्यापीठाने तयार केला अभ्यासक्रम
6
आनंदाच्या भरात पायाला लागलंय ते विसरला! वैभवच्या शतकी खेळीला द्रविडनं अशी दिली दाद (VIDEO)
7
वेटिंगवाल्या प्रवाशांचा चक्क लिनन बॉक्समधून प्रवास! रेल्वे पोलिसांनी सहा जणांना केली अटक
8
IPL 2025 : वैभव सूर्यंवशीच्या ऐतिहासिक खेळीच्या जोरावर २०० पारच्या लढाईत राजस्थानचा 'रॉयल' विजय
9
विविध रेल्वे गाड्यांमधून दारूच्या एकूण १० हजार बाटल्या जप्त! मद्य तस्करीविरोधात मोठी कारवाई
10
लातूर जिल्ह्यातील हाडोळती येथे युवकाच्या खून प्रकरणी न्यायालयाकडून दाेघांना पोलीस काेठडी
11
नागरिकत्व पाकिस्तानी, मात्र 'दिल हिंदुस्थानी'! उल्हासनगरात २५० जण 'भारतीय' होण्याच्या प्रतीक्षेत
12
'भारतीय सैन्य कधीही हल्ला करू शकते...', पाकिस्तानी संरक्षण मंत्र्याने व्यक्त केली भीती
13
बोगस डॉक्टरांविरोधात प्रशासनाने कसली कंबर; तालुकापातळीवरही समिती सक्षम होणार!
14
जिल्हा पोलिस दलातील सांगलीच्या सहा जणांना महासंचालक सन्मानचिन्ह; १ मे रोजी प्रदान सोहळा
15
हिवराच्या शेंगा खाल्ल्याने २६ मेंढ्यांचा मृत्यू; साताऱ्याजवळील फलटण तालुक्यातील घटना
16
RR vs GT : गिलचा कॅच सुटल्यावर बहिणीने मानले देवाचे आभार; तिची रिॲक्शन होतीये व्हायरल
17
पहलगाम हल्ल्याचा नवीन व्हिडिओ समोर; पर्यटकाच्या कॅमेऱ्यात कैद झाली संपूर्ण घटना, पाहा...
18
Padma Awards: क्रिकेटपटू आर अश्विनला पद्मश्री, हॉकीपटू श्रीजेशला पद्मभूषण; येथे पाहा संपूर्ण यादी!
19
पावसाळ्याआधी मृदा व जलसंधारणाविषयी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी घेतला 'हा' महत्त्वाचा निर्णय
20
'शरिया कोर्ट', 'कोर्ट ऑफ काजी'ला कायदेशीर मान्यता नाही; त्यांचे निर्देश बंधनकारक नाहीत: सर्वोच्च न्यायालय

कोरोना संशोधनावर हॅकर्सचा हल्ला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 23, 2020 14:56 IST

कोरोनावर लस शोधण्याचं काम सुरूआहे; पण हॅकर्सला मात्र हे संकटही संधी वाटतं आहे म्हणून त्यांनी कोरोनावर रिसर्च करत असलेल्या एका युनिव्हर्सिटीवरच सायबर हल्ला केला आणि खंडणीही वसूल केली.

ठळक मुद्देआता हॅकर्सनी चक्क या संकटालाच धंद्याची संधी समजत भलतंच काम सुरू केलं आहे.

- प्रसाद ताम्हनकर

पूर्ण जगाला कोरोनाने त्रस्त केलं आहे. लोक त्यावर लस शोधत आहेत, उपाय शोधत आहेत. जगण्याची लढाई लढत आहेत. दुसरीकडे आता हॅकर्सनी चक्क या संकटालाच धंद्याची संधी समजत भलतंच काम सुरूकेलं आहे.हॅकर्सने चक्क कोरोनावर  रिसर्च करत असलेल्या एका युनिव्हर्सिटीवरच सायबर हल्ला केला. नुसता हल्लाच नाही, तर त्या बदल्यात त्यांनी या युनिव्हर्सिटीकडून लाखो डॉलर्स खंडणी म्हणूनदेखील वसूल केले आहेत. कोविड-19वर औषध तयार करण्याच्या कामात गुंतलेल्या वैद्यकीय संशोधन संस्थेनेही हे मान्य केलं की त्यांना हॅकर्सनी छुप्या पद्धतीने फसवणूक करून त्यांना खंडणी द्यायला भाग पाडलं आहे.नेटवॉकर नावाच्या डार्क वेबवरती कार्यरत असलेल्या हॅकर ग्रुपचं हे काम आहे. नेटवॉकर हॅकर ग्रुपने दोन महिन्यात आणखी दोन विद्यापीठांवरही मालवेअर सायबर हल्ले केले. सायबर सुरक्षा यंत्रणा तज्ज्ञांचं म्हणणंच आहे की एफबीआय, युरोपोल आणि यूकेच्या नॅशनल सायबर सिक्युरिटी सेंटरच्या इशा:यानंतरही खंडणीसाठी, कधी कधी थोडय़ा प्रमाणात तर कधी मोठय़ा प्रमाणात अशा प्रकारच्या वाटाघाटी जगभर सुरूच असतात. अशा हल्ल्यांना बळी पडलेल्यांची मानसिकता अजूनही कायद्याची मदत मागण्यासाठी उत्सुक का नसते हा प्रश्न आहे. 1 जून रोजी या नेटवॉकर नावाच्या गुन्हेगारी हॅकर्सच्या गटाने सॅन फ्रान्सिस्कोमधील कॅलिफोर्निया विद्यापीठावर सायबर हल्ला केला. विद्यापीठाच्या एका संगणकात मालवेअर सोडण्यात या हॅकर्स ग्रुपला यश मिळालं. हा प्रकार लक्षात येताच त्यानंतर त्या मालवेअरचा इतर संगणकार्पयत होणार प्रसार रोखण्यासाठी विद्यापीठाच्या तांत्रिक कर्मचा:यांनी ताबडतोब विद्यापीठाच्या इतर सर्व संलग्न संगणकांचं कनेक्शन तोडलं. विद्यापीठाला 5 जून रोजी त्यांच्याच संगणकावर लॉग इन होता येईना आणि  त्यानंतर संगणकावरती लॉग इन करण्याची पद्धत - ईमेलद्वारे किंवा संगणकाच्या स्क्रीनवरील दिसत असलेल्या सूचने प्रमाणो हा संदेश दिसायला लागला. सहा तासांनंतर, विद्यापीठाने हॅकर्सना खंडणीची रक्कम भरण्यासाठी अधिक वेळ मागितला आणि त्यांना त्यांच्या सार्वजनिक ब्लॉगवरून या हॅक संबंधित पोस्ट काढण्याची विनंती केली. विद्यापीठाला कोटय़वधी डॉलर्स मिळतात याची हॅकर्सला आधीच माहिती होती आणि म्हणूनच त्यांनी संगणकावरील सूचनेद्वारे 3 दशलक्ष डॉलर्सच्या खंडणीची मागणी केली.  

या हल्ल्यासंदर्भात एक पोस्टदेखील या ग्रुपने आपल्या खासगी ब्लॉगवरती शेअर केली होती. पहिल्या दृष्टिक्षेपात, डार्क वेबवरील या हॅकर गटाचे वेबपेज हे सामान्य ग्राहक सेवा वेबसाइटसारखे दिसते. या पेजवरती इतर वेबपेज सारखाच एफएक्यू अर्थात फ्रिक्वेण्टली आस्क्ड क्वेश्चन्स (सामान्य प्रश्न किंवा वारंवार विचारले जाणारे प्रश्न) असा विभागदेखील आहे. ज्याच्या जोडीलाच काही सॉफ्टवेअरचे विनामूल्य नमुने आणि थेट चॅट सुविधेची ऑफरदेखील आहे. परंतु एका बाजूला एक प्रकारचा काउंटडाउन टाइमरदेखील आहे जो सतत वेळ कमी करतो. वेळ कमी होताना हॅकर्स खंडणीची दुप्पट रक्कम वाढवतात किंवा मालवेअर आणि हॅकिंगद्वारे त्यांनी गोळा केलेला डेटा डिलीट करतात. विद्यापीठाच्या वतीने बोलणा:या एका बाह्य सायबर तज्ज्ञाने या हॅकर्स ग्रुपला सांगितले की, कोरोना विषाणूच्या साथीमुळे विद्यापीठाची आर्थिक परिस्थिती चांगली नाही. विद्यापीठाने हॅकर्सना ते फक्त सात लाख ऐंशी हजार डॉलर्स देऊ शकतात. त्यावर तडजोड व्हावी अशी विनंती केली. दिवसभर चाललेल्या या वाटाघाटीच्या संभाषणानंतर विद्यापीठाने त्यांच्या सर्व संसाधनांचा वापर करून सुमारे 10.2 लाख डॉलर्सची रक्कम गोळा केली असल्याचे कळवले; परंतु हॅकर्सनी 15 लाख डॉलर्सपेक्षा कमी पैसे स्वीकारण्यास नकार दिला. अखेर दुस:या दिवशी, 116.4 बिटकॉइन्स विकत घेऊन नेटवॉकर हॅकर ग्रुपच्या ई-वॉलेटवर पाठविण्यात आल्या, त्यानंतर या हॅकर ग्रुपने विद्यापीठाला रॅन्समवेअर डिस्क्रीप्शन सॉफ्टवेअर पाठवलं आणि त्यांची सुटका केली.एका सायबर सिक्युरिटी तज्ज्ञाने या विषयावर बोलताना सांगितले, की कोविड-19 रोगाच्या तपासणीच्या निकालासारख्या विषयांसह संगणक हॅकिंग करण्याच्या उद्देशाने त्यांना जूनमध्ये जवळपास दहा लाख ई-मेल पाठविण्यात आलं असल्याचे अभ्यासात आढळलं आहे. हे ई-मेल अमेरिका, फ्रान्स, जर्मनी, ग्रीस आणि  इटलीमधील संस्थांना पाठवण्यात आले.