शहरं
Join us  
Trending Stories
1
शुबमन गिल प्लेईंग ११ बाहेर बसणार, संजू सॅमसनला संधी? भारत-पाकिस्तान सामन्यापूर्वी मोठा बदल होण्याची शक्यता...
2
भारत-पाकिस्तान सामन्याच्या दिवशीच एकनाथ शिंदेंचे X अकाऊंट हॅक; राजकीय वर्तुळात खळबळ
3
Viral Video : चीनला पोहोचलेल्या भारतीय व्यक्तीने दाखवलं असं काही की पाहणारेही झाले थक्क! तुम्हीही कमाल बघाच
4
चिंता वाढली! एलियन्स, AI आणि तिसरे महायुद्ध; बाबा वेंगाची 2026 वर्षाबद्दल भविष्यवाणी काय?
5
मनोज जरांगेंच्या बैठकीत मधमाशांचा हल्ला, सहकाऱ्यांनी अंगावर उपरणी टाकून पाटलांना वाचवलं
6
"माझ्याशी लग्न कर, तुला सगळ्या सिनेमात घेईन...", प्रसिद्ध मराठी अभिनेत्रीने अभिनेत्याला दिलेली ऑफर, नकार देताच करिअर संपवलं
7
हैदराबाद विद्यापीठाच्या निवडणुकीत ABVP चा मोठा विजय; NSUI ला नोटापेक्षा कमी मते...
8
VIRAL : फक्त तिकीटच नाही, तरुणीचे इन्स्टाग्राम अकाऊंटही तपासले! रेल्वेतील टीटीईचा धक्कादायक प्रताप
9
टॅरिफ, H1B व्हिसानंतर अमेरिकेचा आता भारतीय कोळंबीवर डोळा! मच्छीमारांवर संकट येणार?
10
पती, पत्नी आणि तो... वेगळचं प्रकरण! माहेर अन् सासरच्यांनी मिळून केलं विवाहितेचं अपहरण; पुढे जे झालं ते ऐकून व्हाल हैराण
11
लिव्ह इनमध्ये राहणाऱ्या गर्लफ्रेंडची हत्या; सुटकेसमध्ये भरून मृतदेह १०० किमी दूर नदीत फेकला
12
५००० परदेशी लोकांना नोकरीवर बसवले, १६ हजार अमेरिकींना काढले...; ट्रम्प प्रशासनाने H-1B चा पाढाच वाचला...
13
'तुम्ही कुणाला त्रास दिला, तर अजिबात ऐकणार नाही'; अजित पवारांचा इशारा
14
निवडून आलेल्याला २ कोटी मात्र आमदार नसतानाही मला २० कोटी मिळतात; सदा सरवणकरांचं वादग्रस्त विधान
15
पंतप्रधान मोदी आज देशवासियांना संबोधित करणार; पाच वाजता कोणत्या विषयावर बोलणार?
16
शेअर बाजारातील जोखीम घटक काय असतो? तुमची गुंतवणूक वाचवून चांगला नफा कसा कमवायचा?
17
हुंड्यासाठी सुनेला मारहाण, खोलीत कोंडून विषारी साप सोडला; सासरच्यांनी गाठला क्रूरतेचा कळस
18
स्वप्नातील एसयूव्ही खरेदीची संधी! महिंद्रा स्कॉर्पिओ झाली ₹२.१५ लाखांनी स्वस्त; जाणून घ्या नवीन किंमत
19
Nagpur Crime: घरातून बाहेर पडला अन् कारमध्ये मिळाला व्यावसायिकाचा मृतदेह; मृत्यू की हत्या?
20
युद्ध युरोपच्या दाराशी! रशियन ड्रोनची नाटो देशांच्या हद्दीत घुसखोरी, तिसऱ्या महायुद्धाचा धोका वाढला?

माहिती द्या, प्रश्न मुलीच सोडवतील!

By admin | Updated: December 18, 2015 15:30 IST

वयात येणा:या ग्रामीण भागातील मुलींना अजून शरीरविज्ञानही नीट शिकवलं जात नाही, तिथं स्वच्छता, अंधश्रद्धा आणि त्यासाठीचा संघर्ष या फार पुढच्या टप्प्यातल्या गोष्टी आहेत!

आमची युवा मित्र ही सामाजिक संस्था नाशिक जिल्ह्यात काम करते. वयात येणा:या या वयात त्यांना योग्य मार्गदर्शन, सल्ला, माहिती मिळाल्यास त्याचा सर्वागीण विकास होऊ शकतो, याच उद्देशाने युवा मित्रने मागील तीन वर्षापासून किशोरवयीन मुलींच्या विकासासाठी, सुकन्या-किशोरींसाठी जीवन कौशल्य विकास कार्यक्रमाची सुरुवात केली. हा कार्यक्रम राबवत असताना मुलींना त्यांच्यात होणारे शारीरिक व मानसिक बदल, स्त्री-पुरुष समानता, स्त्रियांच्या शरीराबद्दलचे चुकीचे समज, मासिक पाळी याबद्दल शास्त्रीय माहिती देणारे उपक्रम आम्ही करतो.
पण ते करताना आजच्या खेडय़ापाडय़ातल्याच नाही, तर शहरी मुलींचेही अनेक प्रश्न आमच्यासमोर आले. मासिक पाळी हा शब्द उच्चारला तरी मुलींना घाण, किळस वाटते. आजही या विषयासंदर्भात ग्रामीण भागात मुलींच्या मनात अतिशय अंधश्रद्धा आहे. त्या काळात स्वयंपाक करायचा नाही, पाणी भरायचे नाही,  पापड, लोणच्याला हात लावायचा नाही, पापड लाटायचे नाहीत. एकीकडे या समजुती, तर दुसरीकडे भीतीही असतेच मनात.  आमच्या असं लक्षात आलंय की, अगदी घरात देवाची छोटी पूजा, सण, लग्न असलं की अगदी लहान वयाच्या मुलीसुद्धा पाळी लांबवण्याच्या गोळ्या घेतात. विवाहित तरुणींच्या बाबतीत विचारायलाच नको. या गोळ्यांचे आपल्या शरीरावर काही दुष्परिणाम होतात हेसुद्धा अनेकींना माहिती नाही. 
मासिक पाळी ज्या गर्भाशयातून येते, ती ही गर्भापिशवी आपल्या पोटात नक्की कुठे आहे, तिचा आकार किती मोठा आहे हे शालेय शरीरविज्ञानसुद्धा मुलींना माहिती नसतं. मूल होण्यासाठी मासिक पाळी यावी लागते एवढंच अनेकजणी सांगतात.
मासिक पाळीच्या काळातील स्वच्छता या विषयावर तर कुणी बोलतही नाही. खरंतर हा अतिशय महत्त्वाचा विषय आहे. ग्रामीण भागात सतत पाण्याचा दुष्काळ असतो. त्यामुळे कपडय़ांच्या घडय़ा मुलींना बदलायच्या म्हणजे मोठा प्रश्न पडतो. पाणी कुठून आणायचं? एवढी स्वच्छता बाळगायची, काळजी घ्यायची ह्यासाठी घरात स्वतंत्र बाथरूमची व्यवस्था नसते. त्यामुळे अतिशय कुचंबणा होत असते. कपडे वाळवायला जागा नसते त्यामुळे बहुतेक ठिकाणी हे कपडे अडगळीच्या जागी, गोठय़ात, जिथे कुणाचीही नजर पडणार नाही अशा ठिकाणी वाळत घातले जातात. पावसाळ्यात तर कपडे वाळतच नाही तरी ओलसर कपडे वापरतात. ह्या कपडय़ांवर अडगळीत वाळत घातल्याने जीवजंतू बसतात, त्यांना कुबट वास येतो. त्यामुळे या मुलींना/महिलांना किती प्रकारच्या संसर्गाना तोंड द्यावे लागत असेल ह्याची कल्पनाही न  केलेली बरी. पुन्हा ह्याबद्दल कोणीशी बोलायची पंचाईत. पाळीच्या काळात वापरले जाणारे कपडे अनेक घरात सगळ्या बायकांचे एकच असतात. त्यामुळेही लैंगिक आजार वाढतात.
सॅनिटरी नॅपकिनचा विषय तर बराच दूर आहे. कारण एकतर महाग असतात. ते वापरायचे म्हणजे गावात मिळत नाही. तालुक्याच्या ठिकाणून कोण आणून देणार? त्याचबरोबर आणखीन महत्त्वाचा मुद्दा म्हणजे त्यांची विल्हेवाट कशी लावायची? शाळेत कधी-कधी काही कंपन्या जाहिरातीसाठी मुलींना 1-2 नॅपकिनचे पॅकेट देतात. पण ते कसे वापरायचे हेसुद्धा मुलींना माहिती नसतं. अनेक शाळांमध्ये आजही स्वच्छतागृह नाहीत. जिथं आहेत तिथं  मुलींच्या टॉयलेटची परिस्थिती अतिशय घाणोरडी आहे. तिथे कधीच पाणी, डस्टबीन नसतं. पण इलाज नसल्यानं मुलींना तिथंच जावं लागतं. त्यातूनही अनेक जंतुसंसर्ग होतात. 
अशासारख्या अनेक समस्यांना तोंड द्यावे लागत असल्याने व कोणतीच शास्त्रीय माहिती नसल्याने मुली मासिक पाळीविषयी सकारात्मक दृष्टीने कसा विचार करतील? इयत्ता नववी-दहावीच्या विज्ञान  पुनरुत्पादक संस्था हा स्वतंत्र धडा आहे. पण सहसा हा धडा अनेक शिक्षक मुला-मुलींना एकत्र शिकवत नाहीत. कारण कसं शिकवायचं नी काय सांगायचं हा प्रश्न अनेक शिक्षकांनाही सतावतो.  
शालेय शिक्षणात जर या विषयांचा समावेश केला, शास्त्रीय माहिती दिली, मुलामुलींना योग्य ज्ञान वयात येतानाच मिळालं तर अनेक गैरसमजुती दूर होतील आणि नको ते अवाजवी कुतूहलही कमी होऊन चुकीची माहितीही मुलंमुली शोधणार नाहीत.
ग्रामीण भागात तर अशी माहिती पोहचण्याची मोठी गरज आहे.
 
- मनीषा मालपाठक-पोटे
(मनीषा युवा मित्र या संस्थेबरोबर काम करताना ग्रामीण भागातील वयात येणा:या मुलामुलींसाठी जाणीव-जागृतीचे उपक्रम करतात.)