शहरं
Join us  
Trending Stories
1
महिला, बेरोजगारांना ३ हजार; ४५ दिवसांत ‘सातवा वेतन आयोग: बंगालसाठी भाजपचे संकल्पपत्र
2
आजचे राशीभविष्य, ११ एप्रिल २०२६: कुटुंबियांसह महत्त्वपूर्ण चर्चा कराल; मितभाषी राहून मतभेद दूर करा
3
आता यंदाच्या वर्षापासून अकरावीत प्रवेश घेण्यापासून एकही विद्यार्थी वंचित राहणार नाही!
4
महागडे उपचारही आता सरकारी खर्चातून! योजनेसाठी अटी आणि निकष काय?
5
महामुंबईत गिरणी कामगारांसाठी २,५२१ घरांची लॉटरी काढावी; एकनाथ शिंदे यांचे म्हाडाला निर्देश
6
एआयच्या साहाय्याने पार्किन्सनचे निदान करणे होणार अधिक सोपे; आधीच मिळणार इशारा
7
विमानतळावर ३८ कोटींच्या सोने तस्करीचा पर्दाफाश; DRI कडून केनियाच्या २६ नागरिकांना अटक
8
द्रमुकचा उमेदवार निवडणे म्हणजे माझा विजय निश्चित: उपमुख्यमंत्री उदयनिधी स्टॅलिन
9
१० हजारांवरील व्यवहार तासभर लेट! व्यवहार थोडे स्लो, पण खूप जास्त सुरक्षित होतील!
10
सायबर फ्रॉडमध्ये गमावलेले ३८ लाख व्यापाऱ्याला परत करा! न्यायालयाचे HDFC बँकेला निर्देश
11
पीएफचा क्लेम करूनही पैसे अडकले आहेत? धावपळ टाळण्यासाठी नेमके काय कराल?
12
म्युच्युअल फंडाचा ‘धमाका’; इक्विटी गुंतवणुकीत ५६ टक्क्यांची मोठी वाढ!
13
खामेनेईच्या हत्येनंतर इराण बनला आणखी धोकादायक, अमेरिका-इस्रायलचे IDF च्या रिपोर्टने वाढवले टेन्शन
14
हे काय चाललंय! आधी धडक दिली, प्रश्न विचारताच तरुणाला फरफटत नेले, अंबरनाथमधील घटना कॅमेऱ्यात कैद
15
Virat Kohli Clean Bowled : बिश्नोईचा जादूई चेंडू...२०० च्या स्ट्राईक रेटनं धावा काढणारा कोहली फसला
16
RR vs RCB : जोफ्राचा सॉलिड बाउन्सर! पहिल्याच बॉलवर सॉल्टचा 'करेक्ट कार्यक्रम' (VIDEO)
17
‘धुरंधर’ अभिनेता रणवीर सिंगने संघ मुख्यालयात घेतली सरसंघचालक मोहन भागवत यांची भेट
18
"अमेरिकेची जहाजेही होर्मुझ सामुद्रधुनीतून जाऊ शकतात, फक्त त्यांनी...", इराणची ट्रम्प यांच्याकडे मागणी काय?
19
LPG-PNG ची चिंता मिटली! देशभरात गॅस अन् पेट्रोल-डिझेलचा पुरवठा सुरळीत, केंद्राची स्पष्टोक्ती
20
IPL 2026 : RR नं हुषार गोलंदाजाला बसवलं बाकावर; RCB च्या ताफ्यात 'मॅच विनर' परतल्याचा आनंद
Daily Top 2Weekly Top 5

मुलींनो, जरा ऋजुता दिवेकर काय म्हणतेय पहा..

By admin | Updated: April 6, 2017 21:28 IST

दहावी-बारावीच्या परीक्षा आता संपल्या. आता सुटी. आता घरोघर मुलींच्या मागे पालक लकडा लावतील की

दहावी-बारावीच्या परीक्षा आता संपल्या. आता सुटी. आता घरोघर मुलींच्या मागे पालक लकडा लावतील की, हॉबी क्लास लाव, शिवणकामाचा क्लास लाव, टायपिंग शिक, कम्प्युटरचा क्लास लाव, स्वयंपाक शिक..असं बरंच काय काय!या सगळ्यात मुलींना रस असतोच असं नाही.काही मुलींना विचारा की, तुला काय आवडतं?उत्तर हमखास येतं, काही खास नाही तसं, पण टीव्ही पहायला आवडतं. काहीजणी सांगतात, की मला कुकिंग आवडतं. पण चुकून कधी स्वयंपाकघरात जात नाहीत की आईला मदत करत नाही.मग उद्योग काय एकच, फोनवर गप्पा, व्हॉट्सअ‍ॅपवर मेसेजिंग, फेसबुक किंवा मग टीव्ही सिरीअल्सचा रतिब आहे. अर्थात सगळ्याच जणी असं वागतात असं नव्हे. काहीजणी खरंच मनापासून बऱ्याच गोष्टी करतात. वेळेचा सदुपयोग करतात.पण ज्या करत नाहीत त्यांच्यासाठी काही खास टिप्स आहेत.कुणी दिलेल्या?तेच महत्वाचं, कारण टिप्स तर काय कुणीही देतं, पण कोण देतं ते जास्त महत्वाचं!आपल्या फेसबुक पेजवर सेलिब्रिटी डाएटिशियन ऋजूता दिवेकरने दिलेल्या फक्त तीन टिप्स मुलींसाठी फार महत्वाच्या आहेत.ऋजूता लिहिते की दहावी-बारावीच्या परीक्षा दिलेल्या मुलींसाठी एक खास नोट..१. पळा. भरपूर चाला आणि खेळाही. कॉफी शॉपमध्ये बसून गप्पा मारायला पुढेही भरपूर वेळ हाताशी असेलच..त्यापेक्षा आता मेहनत करा. हाडं मजबूत करा. मणक्यांना ताकद द्या. आणि दरमहा येणारी पाळी आयुष्यभर वेदनारहीत असेल यासाठी आताच व्यायामाची मदत घ्या.२. कोकम सरबत प्या, पन्हं प्या, बेल सरबत प्या. बाकी पुढे आयुष्यात कधीही कोल्डड्रिंक पिता येईल असा भरपूर वेळ हाताशी असेलच..हे प्याल्यानं हेल्दी बॅक्टेरीयाची वाढ होईल. आतड्यातल्या त्वचेचं पोषण होईल. आणि उत्तम त्वचा लाभेल.३. रोज रात्री १०.३० च्या ठोक्याला झोपायची शिस्त लावा. रात्रभर पार्टी करायला आयुष्यात पुढे भरपूर वेळ हाताशी असेलच..लवकर झोपल्यानं आपल्या हार्मोन्सवर नियंत्रण राहतं. त्यांचं संतुलन व्यवस्थित असतं. आणि मेंदूलाही त्याचं काम शांतपणे करायला वेळ मिळतो, ती शिस्त तो पुढे आयुष्यभर सांभाळतो.

 

नाशिक, प्रतिनिधी