शहरं
Join us  
Trending Stories
1
भारताची धास्ती घेत पाक लष्कराची सीमेवर मोठ्या प्रमाणात जमवाजमव; सैनिकांची संख्या वाढवली
2
मोठी बातमी: एल्फिन्स्टन ब्रिज सोमवारपर्यंत बंद होणार नाही; नागरिकांच्या आंदोलनाची थेट मुख्यमंत्र्यांनी घेतली दखल!
3
भारत-पाकमध्ये पाण्यावरून युद्ध होईल? तणाव वाढला; पाकिस्तानात हाहाकार, कारण...
4
भारताकडून पाकिस्तानला पाण्याचा थेंबही मिळणार नाही; केंद्र सरकारनं आखली रणनीती
5
आजचे राशीभविष्य, २६ एप्रिल २०२५: शक्यतो आज आर्थिक देवाण-घेवाण करू नका
6
अखेर पाक म्हणाला, होय, आम्ही दहशतवाद्यांना पोसले; संरक्षणमंत्री ख्वाजा आसिफ यांची कबुली
7
एकही पाकिस्तानी भारतात राहणार नाही याची खात्री करा; शाहांचा सर्व राज्यांच्या मुख्यमंत्र्यांना फोन
8
पाकिस्तानी नागरिकांवर महाराष्ट्रात वॉच; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचे पोलिसांना आदेश
9
राहुल गांधी यांना सर्वोच्च न्यायालयाने फटकारले; "स्वातंत्र्यवीर सावरकरांबद्दल..."
10
संसदेने मंजूर केलेला कायदा संवैधानिक, स्थगिती देऊ नका; केंद्र सरकारची मागणी
11
भारतात द्वेषाचा वणवा पेटवण्याचं एक षड्‌यंत्र; ‘बदला’ घेण्याची घाई नको, ‘धडा’ शिकवला पाहिजे
12
नरेंद्र मोदी यावेळी बालाकोटच्याही पुढे जाणार?; पुढच्या दोन आठवड्यांत आणखी कठोर पावले
13
हम सब एक है! अतिरेकी व त्यांच्या सूत्रधारांचा कायमस्वरूपी बंदोबस्त करण्याची मागणी
14
कृषी विकासासाठी ६५ बाजार समित्या; अद्याप राज्यातील ६८ तालुक्यांत समित्याच नाहीत
15
"आणखी किती वेळ सहन करणार..."; चिठ्ठी लिहून नवी मुंबईतील विकासकानं संपवलं आयुष्य
16
मेमध्ये जिल्हा समित्या, जूनमध्ये महामंडळे; भाजपाच्या वरिष्ठांचा कार्यकर्त्यांना शब्द
17
‘साहेब’ होऊ घातलेला बिरदेव म्हणतो, शेळ्या-मेंढ्यांना काय लाजायचं? तीच माझी ताकद
18
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
19
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे
20
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन

दिल दोस्ती और सिनेमा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 1, 2019 19:08 IST

एक लडका और एक लडकी दोस्त हो सकते है? इथपासून सुरूझालेला प्रवास. प्यार क्या है ? प्यार दोस्ती है पर्यंत येऊन पोहचला आणि आता तर फ्रेण्ड्स विथ बेनिफिट या स्वच्छ व्यवहारापर्यंत त्यानं प्रवास केला. पण म्हणून दोस्ती बदलली का? सिनेमाच्या पडद्यावरही आणि आपल्या जगण्यातही? - कशी दिसते दोस्ती?

- अभिजित  पानसे

अमेरिकेतल्या एरिया 51मध्ये नक्की काय होतं, एलिअन्स खरंच अस्तित्वात आहेत का, नोटबंदी यशस्वी झाली की अपयशी ठरली, अत्यंत क्लिशे प्रश्न जो, कोंबडी आधी की अंड आधी? - या प्रश्नांचं ठाम, निश्चित उत्तर जसं कोणाला माहीत नाही तसं एका महान प्रश्नाचं, होमो इरेक्टस ते होमो सेपियन्स वैज्ञानिक, मानसोपचारतज्ज्ञ उत्तर शोधताय; पण ज्याचं ठाम, निश्चित उत्तर मिळत नाहीये तो प्रश्न म्हणजे - ‘क्या एक लडका और लडकी सिर्फ अच्छे दोस्त हो सकते है?’

- या महान, गुंतागुंतीच्या प्रश्नाचं उत्तर कवी, कादंबरीकार, मानसिक सल्लागार याशिवाय अर्थातच महाविद्यालयीन विद्यार्थी आणि सध्या सोशिअल मीडिया अँनिमल्स शोधताहेत. पण. प्रश्न निरुत्तरीतच आहे. शेवटी या प्रश्नाच्या उत्तराच्या शोधात बॉलिवूड दिग्दर्शक आणि डेली सोप लेखक कसे मागे राहतील !जे ना पाहे रवि ते पाहे चित्रपटसृष्टी!करण जोहर या दिग्दर्शकाने या प्रश्नाचं उत्तर हुडकण्याचं सगळ्यात जास्त प्रयत्न केलाय. आपलं संपूर्ण आयुष्यच त्यानं यात वाहिलं आहे, असं म्हणणं गैर ठरणार नाही.

करण जोहरच्या कुछ कुछ होता हैं मध्ये राहुल ‘प्यार दोस्ती हैं!’ हे सांगतो. जेव्हापासून कुछ कुछ होता हैमधील राहुलनामक महाविद्यालयीन विद्यार्थ्यानं सांगितलंय की, प्रेम हीच मैत्री आणि व्हायसे व्हर्सा मैत्नी हेच प्रेम; तेव्हापासून आजवर प्रत्येक दहावी पास होऊन उच्च माध्यमिक वर्गात गेलेल्या सर्व विद्यार्थ्यांनी स्वत:मध्ये राहुल आणि मैत्निणीमध्ये अंजली आणि टीना शोधली आहे.कुछ कुछ होता है बघूनच प्रत्येक दहावीची, अकरावीची बॅच आपल्या प्रेम आणि मैत्री  हे गुंतागुंतीचे समीकरण सोडवायचा र्शीगणेशा करते. याच सिनेमात शाहरूख खानने फ्रेण्डशिप बॅण्डनामक पट्टा मनगटावर चढवून समस्त विद्यार्थ्यांना, मुलांना, तरु णांना एक सुटकेचा खुश्कीचा मार्ग उपलब्ध करून दिला. कारण फ्रेण्डशिप डे आणि शाळा, कॉलेज विद्यार्थ्यांसाठी जालीम रक्षाबंधनही याच काळात येतात. वर्गातील आवडणारी मुलगी मनगट जाळणारी राखी नाही तर फ्रेण्डशिप बॅण्ड बांधेन ही भोळी आशा कुछ कुछ होता हैमुळे निर्माण झाली.

असं जोहरने मुलगा मुलगी फक्त चांगले मित्र होऊ शकतात का या प्रश्नाचं उत्तर सोडविण्यात मोठं योगदान दिलं आहे. दोन हजारच्या दशकाच्या काळात संपूर्ण हिंदी चित्रपट सृष्टी हीच मैत्री  आणि प्रेम, मैत्रीतील प्रेम, प्रेमातील मैत्री  हे रेसिपी वापरून चित्रपट ढोकळा आणि सुरळीच्या वड्या इ. पदार्थ तयार करत होती.बॉलिवूड आणि समाज यांचं साटंलोटं नातं आहे. चित्नपटात जे दाखवलं जातं ते बघून लोक त्यानुसार प्रेरित होतात, आचरणात आणतात. आणि चित्रपटसृष्टीवाले म्हणतात की, जे समाजात घडतंय तेच आम्ही दाखवतो. अशाप्रकारे चित्नपट आणि समाज ही देवाणघेवाण करतो.

पूर्वी लोक भावनिक होते. (लोक आत्ताही भावनिक आहेत; पण ते इतरांसाठी नाही तर स्वत:साठी.) पूर्वी लोक नात्यांसाठी, नात्यांबद्दल भावनिक होते म्हणून तेव्हा मैत्नीही जिगरी होती. याचं प्रतिबिंब तत्कालीन चित्रपटातही दिसून येतं.  कोई जब राह न पाए मेरे संग आए के पग-पग दीप जलाए मेरी दोस्ती मेरा प्यार.हे  दोस्ती या कृष्णधवल सिनेमातील हे प्रसिद्ध आणि लोकप्रिय गाणं अजूनही प्रत्येकाच्या आवडीचं आहे. यांतील तरल भाव, शब्दातील खोली अजूनही मनाला भिडते. माध्यमं कमी होती, स्पर्धा कमी होती, लोक भावनिक होते, त्यामुळे निरागसता होती, यामुळे मैत्री ही तितक्याच पॅशनने केल्या जायची.ये दोस्ती हम नही छोडेंग, यारी है इमान मेरा यार मेरी जिंदगी.तेरे जैसा यार कहा. अशी गाणी, असे चित्रपट तयार व्हायचे.दोस्त के लिये साला कुछ भी, मैत्रीसाठी प्रेमाचा त्याग, दोस्ती के लिए प्यार का बलिदान, या मर्यादेपलीकडे भावना, प्रेम, नातं जुन्या चित्रपटात दिसतात. पण काळ बदलला, दुस-यासाठी असलेली भावनांची खोली कमी होऊ लागली, तशी मैत्रीतील खोली कमी झाली.

दिल चाहता हैमधील सिड आकाशला म्हणतो की, प्रत्येक नात्याची एक र्मयादा असते, ती मैत्रीलाही असते. आपली र्मयादा पाळावी.हा हिंदी सिनेमात दोस्तीनं गिअर बदलल्याची जाणीव करून देणारा डायलॉग ठरावा !पुढे समाज माध्यमं आणि कानात सतत आवाज करत राहणारा कर्णपिशाच्च मोबाइल प्रत्येकाच्या हातात आला, मित्नाची जागा मोबाइलने घेतली. इतरांप्रति असलेल्या मैत्रीच्या भावना आणखी बोथट झाल्यात. समाजाशी साटंलोटं नातं असलेल्या चित्रपटसृष्टीत नसरुद्दीन शाहचा मुलगा, इमाद शाहचा ‘दिल दोस्ती एक्सेट्रा’ दाखवणारा चित्रपट झळकला. तोवर मैत्री ही मैत्री वगैरे झाली होती. यात ‘फ्रेण्ड्स विद बेनिफिट्स’ प्रकार दिसला. कारण तेव्हा समाजात हेही वारे वाहू लागले होते. बाय द वे, दिल दोस्ती इटीसी चित्रपटातील आपल्या पाल्याचा अभिनय बघून नसरुद्दीन शाह यांनी त्यांच्याच शैलीत ‘गुनाह है ये‘ म्हटलं असावं; पण तो विषय वेगळा !मैत्रीच्या संकल्पना, अभिव्यक्ती काळानुसार बदलत गेल्यात. आता तर  सोशल मीडियाच्या वेगवान, उथळ काळात व्यक्ती प्रचंड भावनिक तर राहिला आहे; पण त्या भावना आता फक्त स्वकेंद्रित झाल्या आहेत. मैत्रीसाठी त्या भावना आता खोल नाही.पूर्वी मैत्री ही प्रक्रिया असे. हळूहळू मैत्नीचं लोणचं मुरलं जाई. आता सोशल मीडियावर अनोळखी व्यक्तीला सहज अँड करून फ्रेण्ड बनवलं जातं, थोडं खटकलं की अन्फ्रेण्ड केलं जातं नाहीतर जीवनातून बाद. ब्लॉक केलं जातं.पूर्वी ‘यूज अँण्ड थ्रो’ ही फक्त टेक्नॉलॉजी होती आता ती  मानसिकता  झाली आहे. यामुळे मैत्रीतील निरागसता संपते आहे. पूर्वी मैत्री ही होऊन जायची आता मैत्री केली जाते, बहुतेकवेळा स्वार्थ भावनेने किंवा फक्त वेळ घालवण्याच्या उद्देशाने.आता मैत्रीसाठी मर मिटना. ‘बने चाहे दुष्मन जमाना हमारा, सलामत रहे दोस्ताना हमारा.’ असे गाणी असलेले चित्रपट दोस्ताना चित्रपट नसतात. आता मैत्रीची, प्रेमाची वेगळी छटा दाखवणारा करण जोहरचा दोस्ताना  असतो.पण या सर्व उथळपणात अचानक एक कोटा फॅक्टरीसारखी वेबसिरीज येते, आणि पुन्हा एकदा मैत्री, कॉलेज, महाविद्यालयातील दिवस व्यक्ती जगू लागते. कोटा फॅक्टरीतील शेवटसुद्धा मैत्नीच्या बदललेल्या संकल्पना प्रॅक्टिकल मैत्री दाखवून जातो. एक नक्की की शाळा किंवा कॉलेजचा उंबरठा एकदा कायमस्वरूपी बाहेरच्या दिशेने ओलांडला की त्यानंतर होणार्‍या मैत्रीत ती जान नसते. कुठलाही स्वार्थ नसताना, पॅकेज, नोकरी, व्यवसाय, कुटुंब यांचा कोणताही भार, प्रभाव नसलेल्या वयात, मन लवचिक आणि तरल असताना होणारी मैत्नी ही कायमस्वरूपी हृदयात जतन होते.त्या मित्रांसाठी कोटा फॅक्टरीमधील गाण्याचे बोल आठवतात, म्हणावे वाटतात, ‘किसी गम से ना चिलम से, तेरी रम से नही, बना है यारों से मेरा जहाँ.किताबो में पढा था तब,दिवारो पे लिखा, बना है यारो से मेरा जहाँ.मिले तो कोई हजार पर जिगरी चार यार हैं!सबकी है यही डगर सबकी ये पुकार है वो जिंदगी भी है जिंदगी क्या जिसमे ना यार हैं!