- स्वप्नाली बनसोडे
दहावी-बारावीचे निकाल लागले की आपल्याकडे विद्याथ्र्याना आपसूक विचारणा होते, काय मग कोणत्या साइडला अॅडमिशन घेणार? सायन्स, कॉमर्स की आर्ट्स? पुन्हा त्यातल्या त्यात भारी म्हणजे सायन्सच. सायन्स घेतलेल्या परिणामी इंजिनिअरिंग अथवा मेडिकलला प्रवेश घेऊ इच्छिणा:या विद्याथ्र्याचं भवितव्य उज्ज्वल, असं आपल्याकडे ठरवून टाकलेलं असतं. यात कॉमर्स आणि आर्ट्सला कमी लेखण्याची चूक तर करतोच; पण या पद्धतीमुळे आपण तरुणांना एका साच्यात बसवून टाकतो. पण एखादा विद्यार्थी म्हणाला, मला इंजिनिअरिंग करायचंय; पण मला नाटय़शास्र जाणून घेण्यातही रस आहे, किंवा एखादी विद्यार्थिनी म्हणाली, मी खरं तर मानसशास्र शिकतेय; पण मला जावा लॅँग्वेजही शिकायची आहे, तर आपल्याकडे कुणीही लगेच म्हणोल, काय गरज आहे?मुळात तशी सोय तरी आहे का? उलट कदाचित या मुलांनाच सांगितलं जाईल की, तुम्हाला तुमचा कल कळत नाहीये, कशाला उगीच नसते लफडे? एकतर वेडय़ात काढलं जाईल आणि शिकायचंच असेल तर दुप्पट वेळ घालवून दोन पदव्या घ्याव्या लागतील.पण ही अशी सोय अमेरिकन शिक्षणपद्धतीत आहे.अमेरिकेत विविध विषय शिकण्याच्या विद्याथ्र्याच्या आकांक्षा मल्टिडिसिप्लीनरी शिक्षण पद्धतीने पूर्ण होऊ शकतात.आपल्याकडे नव्या शिक्षण धोरणात या मल्टिडिसिप्लीनरी शिक्षण पद्धतीचा विचार करण्यात आला आहे, त्यानिमित्त ही चर्चा की इथं अमेरिकेत शिकणा:या विद्याथ्र्याना या पद्धतीचा कसा फायदा होताना दिसतो?मल्टिडिसिप्लीनरी म्हणजेच सर्वसमावेशक शिक्षणपद्धती, ज्यात केवळ एकाच विषयाचे सखोल शिक्षण घेण्यापेक्षा, तुम्हांला एकाहून अधिक विषय निवडण्याची मुभा असते. विशिष्ट अभ्यासक्रमाची सीमा ओलांडणारी, विद्याथ्र्याचे आकलन वाढविणारी ही एक अतिशय शक्तिशाली शैक्षणिक पद्धत आहे.अमेरिकेमध्ये वेगवेगळ्या राज्यातील शिक्षण ही स्थानिक प्रशासनाची जबाबदारी आहे. प्रत्येक राज्याचा स्वत:चा स्वंतत्र शिक्षण विभाग आणि वित्त नियंत्रित करणारे, शैक्षणिक कर्मचा:यांची भरती इ.संबंधी कायदे आहेत. विद्याथ्र्याची उपस्थिती आणि अभ्यासक्रम याविषयीही वेगवेगळे कायदे आहेत. म्हणूनच, प्रत्येक राज्यातील शाळांमध्ये काय शिकवले जाते आणि शिक्षणात काय सुधारणा हव्यात, यावर राज्यांचं बरंच नियंत्रण आहे. सर्वसाधारणपणो पाच ते सहा वर्षापासून ते सोळा अथवा अठरा वर्षे वयापर्यंत शिक्षण सक्तीचं आहे. अमेरिकेत पब्लिक शाळा या सर्व विद्याथ्र्याना मोफत शिक्षणासाठी उपलब्ध आहेत.प्राथमिक/प्राथमिक शिक्षण (वयोगट 6 ते 12), माध्यमिक शिक्षण (वयोगट 12 ते 18), पोस्ट सेकंडरी / उच्च शिक्षण (कॉलेज किंवा युनिव्हर्सिटी, वयोगट 18-22)याशिवाय अमेरिकेतली अनेक राज्यं आणि समुदाय, विशेष गरजा असलेल्या मुलांसाठी स्पेशल शाळा अथवा विशेष वर्ग उपलब्ध करून देतात. उदा. शारीरिक अपंगत्व असलेली, गतिमंद- मतिमंद मुले, संवाद नीट न साधू शकणारी, भावनिक आणि वर्तणुकीशी संबंधित गंभीर किंवा मध्यम समस्या असलेली मुलं. यासा:यातच अमेरिकन शिक्षणपद्धती बहुपर्यायी असणं, शिकताना मेजर-मायनर, डबल मेजर असे अनेक पर्याय असणं इथं शिकण्याचा आनंद आणि करिअरच्या संधीही वाढवतात.
ग्रेडिंग कसं असतं?*अमेरिकन शिक्षणपद्धतीत आणखीन एक महत्त्वाचा फरक म्हणजे, ग्रेडिंग पद्धती.* cumulative GPA म्हणजे पूर्ण डिग्री प्रोग्रामचे सरासरी गुण पकडले जातात. याचा फायदा असा की एखाद्या वर्षी काही कारणांनी विद्यार्थी जर व्यवस्थित अभ्यास नाही करू शकला तर, त्याच्या एक वर्षीच्या निकालावर फरक पडत नाही.* शिवाय अमेरिकेत क्रेडिट सिस्टिम आहे, प्रत्येक वर्गासाठी देण्यात येणा:या क्रेडिट तासांची संख्या ही, सेमिस्टरच्या कालावधीत तो विषय शिकायला किती वेळ लागतो, यावरून निर्धारित केली जाते.*जेव्हा तुम्हाला मेजर विषय बदलायचे असतात तेव्हा क्रेडिट ट्रान्सफरही होऊ शकते. * या सुविधेमुळे विद्यार्थी एखादा विषय शिकून बघून, खरंच आपल्याला त्यात रस आहे का, हे तपासून पाहू शकतात. * अमेरिकेमध्ये व्यावसायिक शिक्षण आणि त्यासाठी वेगळे प्रोग्राम उपलब्ध आहेत.* थोडक्यात प्रत्येक जण आपली आवड आणि शिक्षण याची सांगड घालू शकतो.
(स्वप्नाली नॉर्थ इस्टर्न विद्यापीठ, बोस्टन, मॅसॅच्युसेटस येथे शिकते आहे.)