शहरं
Join us  
Trending Stories
1
Pune Crime: 'किती मुलांसोबत झोपलात?', कोथरुडमधील प्रकरण; रोहित पवार 'त्या' तरुणींसह पोलीस आयुक्तालयात, काय घडलं?
2
IND vs ENG 5th Test Day 4 Stumps : कोण जिंकणार? 'दिल अन् दिमाग' यांची 'टेस्ट' घेणाऱ्या प्रश्नासह थांबला खेळ
3
भगवा दहशतवादी असेल, तर तुम्ही त्याची पूजा करणार का?; शंकराचार्य अविमुक्तेश्वरानंद सरस्वती यांचा सवाल
4
IND vs ENG : टेस्टमध्ये ट्विस्ट; खांदा बांधून बसलेला क्रिस वोक्स एका हाताने बॅटिंग करण्याच्या तयारीत
5
मुलींवर हात टाकणाऱ्यांना हातपाय तोडून पोलिसांकडे दिले पाहिजे; अमित ठाकरे यांचे विधान
6
हा दरोडा भारतातील सर्वात मोठा होता; एका रात्रीत ८० किलो सोने गेले होते चोरीला
7
विमानतळावर मारहाण करणाऱ्या लष्करी अधिकाऱ्याच्या अडचणी वाढणार! भारतीय लष्कराने निवेदन प्रसिद्ध केले
8
महादेवी हत्तीण वनतारामधून परत आणणार?  मुख्यमंत्र्यांनी ५ ऑगस्टला बोलावली बैठक, फडणवीसांनी सांगितला पुढचा प्लॅन
9
Joe Root Century : शतक साजरे करताच हेल्मट काढलं अन् Headband बांधला; जो रुटनं असं का केलं?
10
पत्नी आजारी म्हणून लिव्ह इनमध्ये राहू लागला अन् प्रेयसीनेच केली हत्या; दोघांमध्ये कशावरून बिनसलं?
11
युगेंद्र पवार-तनिष्का कुलकर्णींचा मुंबईत झाला साखरपुडा, कोण आहेत तनिष्का?
12
IND vs ENG : ...अन् सिराजनं कॅच घेऊन दिलेला 'तो' सिक्सर Harry Brook नं सेंच्युरीत बदलला!
13
एका फिचरमुळे ChatGPT चॅट्स लीक होण्याचा धोका! गुगल सर्चमध्ये खाजगी गोष्टी दिसतात?
14
"लोकांचा सहभाग वाढवून...", उद्योजकांसमोर नितीन गडकरींनी मांडले गांधी-नेहरूंचे विचार; नागपूरमध्ये काय बोलले?
15
IND vs ENG : जो रुटनं साधला मोठा डाव! WTC मध्ये ६००० धावांचा पल्ला गाठणारा ठरला पहिला फलंदाज
16
कोल्हापुरात १९३१ मध्ये होते त्याच जुन्या सर्वोच्च न्यायालयाच्या इमारतीत नवे सर्किट बेंच
17
संजय शिरसाटांची मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांकडून पाठराखण; म्हणाले, "मंत्री कधी कधी..."
18
धक्कादायक! मित्रांनी केला मित्राचा घात, बाकाचा वाद बेतला जीवावर; अल्पवयीन गुन्हेगारीचा प्रश्न पुन्हा गंभीर
19
VIDEO : इथंही सिराज ठरला कमनशिबी! हॅरी ब्रूकचा कॅच घेतला; पण सीमारेषेवर अंदाज चुकला अन्...
20
विमानतळावर लष्करी अधिकाऱ्याची गुंडगिरी, स्पाइसजेट कर्मचाऱ्यांना मारहाण; पाठीचा कणा फ्रॅक्चर झाला

आर्थिक तंगीनं इंग्लंडमधल्या तारुण्याचा चेहराच बदलला!

By admin | Updated: June 15, 2016 11:46 IST

इंग्लंडमध्ये असं कधीच घडत नव्हतं. पण तसं घडलं खरं, चांगल्या श्रीमंत माणसाच्या घरी एकदम गरीबी यावी तशी परिस्थिती ओढावली! जगभराला मंदीने झपाटले

इंग्लंडमध्ये असं कधीच घडत नव्हतं.
पण तसं घडलं खरं, चांगल्या श्रीमंत माणसाच्या घरी एकदम गरीबी यावी तशी परिस्थिती ओढावली!
जगभराला मंदीने झपाटले. नोक:या मिळणो कठीण झाले. पगारवाढ थांबल्या. आहे ती नोकरी टिकविणो कठीण झाले. या मंदीने जगणोच बदलून टाकले.  पोट भरण्याचे वांधे तिथे चंगळ कशी करणार? तशीही माणसांना वेळ सारं काही शिकायला भाग पाडते, असे म्हणतात. वेळेनं हा शहाणपणा इंग्लंडच्या तरूणाना शिकविला.  
या मंदीचा सर्वाधिक फटका कोणाला बसला असेत तर तो तरुणांना. हे निरीक्षण आहे  इन्स्टीटय़ूट ऑफ फिस्कल स्टडीचे संचालक रॉबर्ट जाईस यांचे. जागतिक मंदीमुळे इंग्लडमधील तरुणांची मिळकत दहा टक्क्यांनी घसरली. याचा परिणाम असा झाला की, मद्य सेवन न करणा:या पंचविशीतील तरूणांची संख्या 2005 च्या तुलनेत तीनपट वाढली. याच वयोगटातील तरुणांचे ड्रग्ज सेवनाचे प्रमाण 2004च्या तुलनेत निम्म्याने कमी झाले. नाईट क्लबमध्ये जाणा:यांची संख्या अध्र्यावर आली. अल्पवयीन माता होण्याचे प्रमाण 1969 पासून सर्वात कमी नोंदले गेले. 18 वर्षाखाली तरुणांमधील गुन्हेगारीचे प्रमाण तब्बल 7क् टक्क्यांनी घटले. भाडय़ाच्या घरात राहायचे आणि मिळणारा पैसा मौजमौजा उडवायचा हे तरूणांमधले फॅडही बदलले. पंचविशीतला तरूण भाडय़ाचे घर सोडून स्वत:च्या घरात राहणो पसंत करू लागला आहे. आई-वडिलांसोबत राहणा:या तरूणांचे प्रमाणही वाढले. 2क्क्क् सालच्या तुलनेत ही संख्या सहा लाखांनी वाढल्याचे सरकारी आकडेवारी सांगते.  
इंग्लंडमध्ये 2003 ते 2015च्या दरम्यान वय वर्षे 18 ते 21 आणि 22 ते 29 दरम्यानच्या युवकांचे पगार तब्बल 15 टक्क्यांनी कमी झाले. त्याचवेळी विद्याठीठांतील शिक्षणाचे शुल्क मात्र प्रचंड वाढले. अशा स्थितीत हे तरूण मौजमजा काय करणार?  तरूणांचे राहणीमान बदलण्यात पालक आणि जनजागृती हे देखील तेवढेच कारणीभूत ठरत आहेत. आपल्या आई-वडिलांची काळजी घेणारा तरुण मोठय़ा संख्येने वाढत असल्याचे केरी रेस्टीन या महिला मानसशास्त्रज्ञाचे म्हणणो आहे. 
इंग्लंडमधील अनेक शाळांमध्ये मद्य, धुम्रपान, ड्रग्ज आणि लैंगिक संबंधांवर चर्चासत्रे आयोजित केली जातात. चॅलेंज 21, चॅलेंज 25 अशा उपक्रमांद्वारे अनेक धोके समजावून सांगितले जातात. कामाच्या ठिकाणी, सार्वजनिक स्थळी धुम्रपानास बंदी असल्याचाही चांगला परिणाम समोर येत आहे. तरूणांच्या सवयी बदलण्यात सरकार काही प्रमाणात यशस्वी होत आहे, असा दावा सॅन डियागो स्टेट युनिव्हर्सिटीतील मानसशास्त्रचे प्राध्यापक जीन ट¦ेंग करतात. 
एकदा केलेली चूक आयुष्यभर महागात पडू शकते. एका वयानंतर हे कळते. सळसळते रक्त असणा:या तरुणांना ते कसे पटणार? इंग्लंडमध्ये तरूण वयातच हे पटत आहे. इंटरनेट आणि सोशल नेटवर्कमुळे हे घडत आहे. सोशल मीडीयामुळे बदनामी होतेच. नोकरी मिळतानाही ही चूक पाठ सोडत नाही, याची जाणीव या तरूणांना झाली आहे. म्
अर्थात सध्या सर्व युरोपियन देशांमध्ये कमी जास्त प्रमाणात असेच वातावरण आहे. या देशांत नाईटक्लब झपाटय़ाने बंद होत आहेत. 2012 नंतर 15 ते 24 या वयोगटातील धुम्रपानाचे प्रमाण लक्षणीयरित्या घटले आहे. 
आर्थिक तंगी माणसाला काय काय शिकवते, याचंच हे वर्तमानातलं एक रूप!
 
 
- गजानन दिवाण