- भाग्यश्री मुळे
जगभरातल्या समुद्रांमध्ये विविध प्रकारचे प्लॅस्टिक जमा होत आहे. पाणी प्रदूषित होत आहे. प्लॅस्टिक माशांसह इतर समुद्री जिवांच्या पोटात जात आहे. अन्नसाखळीतून परत ते मानवाच्या पोटात जाते. एका अशाच सागरी प्रवासात महिलांच्या आरोग्यावर या सा:याचा काय परिणाम होतो, हा प्रश्न आणि त्याचे गांभीर्य लक्षात घेऊन लंडन येथील एमिली पेन या 35 वर्षीय तरु णीने या विषयावर काम करायचे ठरवलं.जगाला या समस्येची माहिती व्हावी यासाठी तिने प्रत्यक्ष समुद्रात प्रवास करून संशोधन सुरू केले. या मोहिमेअंतर्गत आतार्पयत एमिलीबरोबर 28 देशांतील 80 महिला संशोधकांनी 10,330 नॉटिकल मैल प्रवास केला. या अंतर्गत 3 वर्षात 38 हजार नॉटिकल मैल प्रवास करून सागरी आरोग्य समजावून घेतले. सध्या जगातील एकूण प्लॅस्टिक उत्पादनाच्या 20 टक्के पुनर्प्रक्रि या होते. जगभरातल्या समुद्रांना प्लॅस्टिकच्या विळख्यापासून कसे वाचवायचे यासाठी धडपड करणो हेच आता या तरुणींच्या जीवनाचे ध्येय बनले आहे.एमिली, त्यांचा चमू, त्यांनी केलेला प्रवास, त्यांना आढळलेल्या गोष्टी, त्यांना पडलेले प्रश्न, त्यातील काही प्रश्नांची आपसूक गवसलेली उत्तरे, उपाययोजना सारे काही अद्भुत आहे. त्यांच्या मोहिमेचे नाव आहे ‘ई - एक्सपिडिशन राउंड द वर्ल्ड’ .आर्किटेक्चरच्या शिक्षणादरम्यान लंडन येथून चीनमधील शांघाय येथे बांधल्या जात असलेल्या एकमेक इको-सीटी येथे तिला डेझरटेशन करण्यासाठी जायचे होते. विमानाऐवजी एमिलीने युरोप, रशिया, मंगोलिया आणि पुढे चीन असा प्रवास रेल्वे, घोडा, उंट अशा साधनांनी करण्याचं ठरवलं. तिच्या आयुष्यातला तो पहिला साहसी प्रवास होता. जैवइंधनावर चालणा:या अर्थरेस बोटीवरून ती 12क् दिवसांच्या सागरी प्रवासाला निघाली. प्रवासात तिची बोट एक दिवस प्लॅस्टिक कच:याला धडकली. ते प्लॅस्टिक बघून ती चक्र ावून गेली. तिने बोटीतून पाण्यात उडी मारली; पण जिकडे तिकडे नुसते प्लॅस्टिकच होते. ती जवळपास 1 मैल पोहत गेली. प्लॅस्टिक समस्येनी ग्रासलेल्या काही बेटाँना या प्रवासात तिने भेटी दिल्या, माहिती घेतली. या प्रश्नातून या प्लॅस्टिकमुक्तीसाठी काहीतरी केले पाहिजे ही भावना तिच्या मनात आली.
( भाग्यश्री मुक्त पत्रकार आहे.)