शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकची कोंडी करण्यासाठी हालचाली; अमेरिकेसह विविध देशांचा पाठिंबा मिळविण्यासाठी संपर्क साधणे सुरू
2
काश्मीरमध्ये मोठे कोंबिंग ऑपरेशन, दहशतवाद्यांना मदत करणाऱ्या ४४६ पेक्षा जास्त लोकांना घेतले ताब्यात
3
पाण्यानंतर आता मेडिसीनसाठीही तरसणार पाकिस्तान? आपत्कालीन परिस्थिती टाळण्यासाठी तयारीला लागलं फार्मा सेक्टर
4
'झेलम'ला अचाकच पूर आला, पाकिस्तानात एकच गोंधळ उडाला; पाक मीडियानं भारतावर मोठा आरोप केला! नेमकं काय घडलं?
5
पर्यटकाच्या व्हिडिओमध्ये कैद झाले दहशतवादी...? देहूरोड येथील सामाजिक कार्यकर्त्याचा दावा
6
चोपड्यात थरार...! प्रेमविवाह केलेल्या मुलीला बापानेच गोळी झाडून संपवलं, जावई जखमी  
7
"...तर आपल्या प्रजेचं रक्षण करणं हा राजाचा धर्म! लोक लक्षात ठेवतील"; मोहन भागवत स्पष्टच बोलले
8
अंबाला गावात लग्नाच्या जेवणातून विषबाधा; आठ वर्षीय बालकाचा मृत्यू, अनेकांची प्रकृती चिंताजनक
9
पाकिस्ताननं बांगलादेशात तैनात केले फायटर जेट? PAK पत्रकाराचा मोठा दावा; म्हणाला, यावेळी...
10
पहलगाम ईफेक्ट : सूक्ष्म नजर ठेवा, सतर्क रहा; भारतीय रेल्वेला अलर्ट!
11
Pahalgam Terror Attack: मोठाच पेचप्रसंग! ‘त्या’ महिला आता पाकिस्तानात जाऊ शकत नाहीत; नेमका काय आहे ‘लाँग टर्म व्हिसा’?
12
सर्वार्थ सिद्धी योगात चैत्र अमावास्या: १० राशींवर धनलक्ष्मीची कृपा, लाभच लाभ; भरघोस भरभराट!
13
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
14
Prabhsimran Singh ची कडक फटकेबाजी; नरेनच्या गोलंदाजीवर 'उलटा' फटका मारला अन्... (VIDEO)
15
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
16
CM पदाबाबत आता खुद्द फडणवीसांनी मनातील इच्छा बोलून दाखवली; बावनकुळेंच्या विधानावर म्हणाले...
17
"एकनाथ शिंदेनी मला पुन्हा जिवंत केलं, कधीच शिवसेना सोडणार नाही"; निलेश राणेंचे विधान
18
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
19
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
20
VIDEO: सीमेवर युद्धाची तयारी? लोकांकडून जमिनीखालील सरकारी तळघरांची साफसफाई

आला मेसेज की ढकल पुढे, कर फॉरवर्ड असं करता तुम्ही? पण खबरदार..

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 16, 2020 16:16 IST

मार फॉरवर्ड- असं प्रत्येकच मेसेजबाबत करणं धोक्याचं आहे.

ठळक मुद्दे तुम्ही गोत्यातही येऊ शकता.

-आवेझ काझी

कोणताही मेसेज मित्र-मैत्रिणींनी पाठवला किंवा एखाद्या ग्रुपवर पडला की तुम्ही काय करता?अनेकदा तर वरवर वाचूनच लगेच  ग्रुपमध्ये ढकलता. फॉरवर्ड मारता.हे फॉरवर्ड मारणं इतकं वेगवान असतं की आपण जी माहिती पुढे पाठवतो आहे, ती खरी आहे की नाही, जी गोष्ट चार लोकांना सांगतोय ती खरंच तशी आहे का, याची खात्रीही करून घेणं अनेकांना गरजेचं वाटत नाही.स्पर्धा असल्यासारखे तेच ते मेसेज लोक इकडून तिकडे ढलकत राहातात.मात्र एखादा मेसेज त्याचा स्नेत, ख:याखोटय़ाची खात्री नसणं, गुगल किंवा इतर स्नेतांच्या माध्यमातून पडताळणी न करणं आणि आला मेसेज केला फॉरवर्ड म्हणून अनेकांना पाठवणं हे महागात पडू शकतं. तुमच्या अंगलट येऊ शकतं. तुमच्यासह तुमच्या व्हॉट्सअॅप ग्रुप, मेसेंजर ग्रुपमधील इतर सदस्यांना त्रस होऊ शकतो. ग्रुपची विश्वासार्हता धोक्यात येऊन परिणामी एखादा गुन्हादेखील दाखल होऊ शकतो. कायदेशीर प्रकियेला सामोरे जाऊ लागू शकतं.हे सारं टाळण्याचा सगळ्यात सोपा उपाय म्हणजे कोणताही मेसेज फॉरवर्ड करण्यापूर्वी विशेषत: सामाजिकदृष्टय़ा संवेदनशील विषयांवरचे मेसेज खातरजमा न करता अजिबात पुढे पाठवू नका. तुम्ही पाठवलेल्या फेक मेसेजविरोधात कोणी फिर्याद दाखल केली आणि तो मेसेज फेक आहे असं सिद्ध झालं तर माहिती तंत्रज्ञान कायदा किंवा भारतीय दंड संहितेतील विविध कलमान्वये तुम्ही शिक्षेसाठी पात्र ठरू शकता. म्हणूनच कोणत्याही ग्रुपवरचा मेसेज, त्यातील मजकुराची खातरजमा, त्यात दिलेले मोबाइल नंबर, मॉर्फ केलेले फोटो हे सगळं बारकाईने पाहा. गरज नसेल तर ते फॉरवर्ड करणं टाळायला हवं. सगळ्यांना कुठून ना कुठून माहिती येते.आपण नाही फॉरवर्ड केलं तर काही फार बिघडत नाही.विशेषत: हल्ली कोविड महामारीच्या काळात गरजूंना मदत करा म्हणून फॉरवर्ड केलेल्या मॅसेजेसमध्ये, व्हिडिओमध्ये किंवा ऑडिओ क्लिप्समध्ये काही संपर्कक्रमांकही देण्यात येतात. हे नंबर जनतेची आर्थिक फसवणूक करण्याकरिता वापरले जात आहेत. असे मेसेज फॉरवर्ड करताना किंवा त्यावर रिअॅक्ट करताना खबरदारी घेणं गरजेचं आहे.सोशल मीडिया अॅप्स, सोशल नेटवर्किगची काळी बाजू म्हणजे खोटय़ा बनावट माहितीचा, असंबद्ध माहिती, फेक न्यूज, बदनामीकारक मजकूर, धार्मिक भावना दुखावणारे  व्हिडिओ, ऑडियो, मेसेजेस हे प्रचंड प्रमाणात आहेत.त्यामुळे फॉरवर्ड करण्याची स्पर्धा न लावता सोशल मीडियावीरांनी थोडी काळजी घ्यायला हवी.

प्रत्येक मेसेज फॉरवर्ड करताना विवेक, विचारबुद्धीने  निर्णय घेणं अत्यावश्यक आहे. कुणाच्या धार्मिक भावना दुखावणं, कोणा एखाद्या व्यक्ती,धर्म, महापुरु ष, प्रथा, भाषा किंवा समूहाबद्दल खोटी माहिती पसरवणं, तसे मेसेज फॉरवर्ड करणं गुन्हा आहे हे लक्षात ठेवा.** लॉकडाऊनच्या काळात राज्यामध्ये समाजमाध्यमांचा गैरवापर करून आक्षेपार्ह पोस्ट्स केल्याप्रकरणी 530 विविध गुन्हे महाराष्ट्र सायबरने दाखल केले असून,  274 व्यक्तींना अटक करण्यात आली आहे, अशी माहिती  महाराष्ट्र सायबरच्या विशेष पोलीस महानिरीक्षकांनी दिली.

( लेखक पोलीस उपनिरीक्षकअसून, सायबर गुन्हा अभ्यासक आहेत.)